5G Smartphone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:31:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 25000 रुपयांच्या आत बेस्ट 5G स्मार्टफोन; Oppo F23, iQOO Neo 6 सह हे आहेत बेस्ट ऑप्शन (मे 2023) https://www.91mobiles.com/marathi/best-5g-smartphone-under-rs-25000/ https://www.91mobiles.com/marathi/best-5g-smartphone-under-rs-25000/#respond Wed, 24 May 2023 12:38:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21160 इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्ससह स्मार्टफोन लाँच करत आहेत. जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी ह्या रेंजमध्ये काही चांगले स्मार्टफोन घेऊन आलो आहोत. हे स्मार्टफोन लेटेस्ट टेक्नॉलॉजी, पावरफुल प्रोसेसर, हाय क्वॉलिटी कॅमेरा आणि दमदार बॅटरीसह येतात. 25000 रुपयांच्या बजेट […]

The post 25000 रुपयांच्या आत बेस्ट 5G स्मार्टफोन; Oppo F23, iQOO Neo 6 सह हे आहेत बेस्ट ऑप्शन (मे 2023) first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्ससह स्मार्टफोन लाँच करत आहेत. जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी ह्या रेंजमध्ये काही चांगले स्मार्टफोन घेऊन आलो आहोत. हे स्मार्टफोन लेटेस्ट टेक्नॉलॉजी, पावरफुल प्रोसेसर, हाय क्वॉलिटी कॅमेरा आणि दमदार बॅटरीसह येतात.

25000 रुपयांच्या बजेट मधील 5G स्मार्टफोन

Oppo F23 5G

  • डिस्प्ले : 6.72 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 256GB
  • बॅटरी : 5000mAh
  • प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 695 (SDM 695)
  • रियर कॅमेरा : 64MP + 2MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 32MP
  • किंमत : 24,999 रुपये

ओप्पोचा हा स्मार्टफोन 25 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लाँच झाला लेटेस्ट स्मार्टफोन आहे. Oppo F23 5G स्मार्टफोन बोल्ड गोल्ड आणि कोल ब्लॅक आशा दोन कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. ओप्पोचा हा स्मार्टफोन 67W SUPERVOOCTM फ्लॅश चार्जिंगसह येतो. कंपनीचा दावा आहे की हा फक्त 18 मिनिटांत झिरो ते 50 टक्के चार्ज होतो. ह्या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळते, जी 39 तास कॉल आणि 16 तास व्हिडीओ व्यूविंग एक्सपीरियंस देऊ शकते.

iQOO Neo 6 5G

  • डिस्प्ले : 6.62 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 128GB
  • बॅटरी : 4700mAh
  • प्रोसेसर : Snapdragon 870 5G
  • रियर कॅमेरा : 64MP + 8MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 16MP
  • किंमत : 24,999 रुपयांपासून सुरु

जर तुम्हाला गेमिंग आवडत असेल तर iQOO Neo 6 5G तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. हा फोन क्वॉलकॉम प्रोसेसरसह येतो, ज्याचा प्रायमरी कोर A77 आर्कचेक्टर आहे, जो 3.2GHz स्पीडवर क्लॉक करण्यात आला आहे. हा अल्ट्रा फास्ट, सुपर स्टेबल आणि स्मूद गेमिंग एक्सपीरियंस देतो. फोनमध्ये E3 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M53 5G

  • डिस्प्ले : 6.7 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 128GB
  • बॅटरी : 5000mAh
  • प्रोसेसर : मीडियाटेक डायमेनसिटी 900
  • रियर कॅमेरा : 108MP + 8MP + 2MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 32MP
  • किंमत : 23,990 रुपयांपासून सुरु

Samsung Galaxy M53 मिड रेंजचा बेस्ट ऑप्शन आहे. फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर ह्या फोनमध्ये सॅमसंगनं गॅलरी अ‍ॅपमध्ये फोटोमधून वस्तू हटवण्याचं फीचर देण्यात आलं आहे. जर तुम्हाला सोशल मीडियावर फोटो शेयर करायला आवडत असेल तर हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. हा फोन मीडियाटेकच्या प्रोसेसरसह येतो.

Redmi K50i 5G

  • डिस्प्ले : 6.6 इंच
  • रॅम : 6GB
  • स्टोरेज : 128GB
  • बॅटरी : 5080mAh
  • प्रोसेसर : MediaTek Dimensity 8100
  • रियर कॅमेरा : 64MP + 8MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 16MP
  • किंमत : 20,999 रुपयांपासून सुरु
Redmi K50i

रेडमी के50आय 5जी स्मार्टफोनमध्ये 144Hz IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट आहे. ह्या फोनच्या डिस्प्लेची मॅक्सिमम ब्राइटनेस 650 निट्झ आणि अ‍ॅस्पेक्ट रेश्यो 20.5:9 आहे. रेडमीच्या ह्या फोनमध्ये 3.5mm चा हेडफोन जॅक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

OnePlus Nord CE 3 Lite 5G

  • डिस्प्ले : 6.72 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 256GB
  • बॅटरी : 5000mAh
  • प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 695 5G
  • रियर कॅमेरा : 108MP + 2MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 16MP
  • किंमत : 19,990 रुपये

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन फ्लॅट एज डिजाइनसह येतो. वनप्लसचा हा अफोर्डेबल 5G स्मार्टफोन SUPER VOOC Endurance Edition चार्जिंग आणि बॅटरी हेल्थ इंजिन टेक्नॉलॉजीसह येतो, जी ह्या फोनची बॅटरी लाइफ सुधारते. ह्या फोनमध्ये बिल्ट इन टेंप्रेचर सेन्सर आणि स्मार्ट चार्जिंग चिप देण्यात आली आहे.

Oppo F21s Pro

  • डिस्प्ले : 6.43 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 128GB
  • बॅटरी : 4500mAh
  • प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 695
  • रियर कॅमेरा : 64MP + 2MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 32MP
  • किंमत : 21,999 रुपये

जर तुम्हाला फोटोग्राफी आवडत असेल तर Oppo F21s Pro तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. फोनमध्ये कॅमेरा क्वॉलिटी सुधारण्यासाठी AI चा वापर करण्यात आला आहे. ओप्पोचा हा फोन यूनीक डिजाइन आणि स्लिम बॉडी डिजाइनसह येतो, ज्याची जाडी फक्त 0.766cm आहे. फोनचे वजन फक्त 181g आहे.

Xiaomi 11i 5G

  • डिस्प्ले : 6.67 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 128GB
  • बॅटरी : 5160mAh
  • प्रोसेसर : Mediatek Dimensity 920 5G
  • रियर कॅमेरा : 108MP + 8MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 16MP
  • किंमत : 24,490 रुपये

Xiaomi 11i 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर झालेला सर्वात फास्ट चार्जिंग फोन आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 120Hz स्मूद रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे जो शानदार स्क्रोलिंग आणि अ‍ॅप स्विच एक्सपीरियंस देतो. शाओमीच्या ह्या फोनमध्ये प्रो-ग्रेड कॅमेरा आणि दमदार बॅटरी देण्यात आली आहेत.

Vivo Y100 5G

  • डिस्प्ले : 6.38 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 128GB
  • बॅटरी : 4500mAh
  • प्रोसेसर : MediaTek Dimensity 900
  • रियर कॅमेरा : 64MP + 2MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 16MP
  • किंमत : 23,999 रुपये

Vivo Y100 5G स्मार्टफोन ट्विन लेन्स रिफ्लॅक्स कॅमेऱ्यासह येतो. विवोचा हा फोन आपल्या शानदार प्रोफेशनल कॅमेरा क्वॉलिटीसाठी पॉपुलर आहे. त्याचबरोबर फोनची स्लिम डिजाइन प्रीमियम लुक देते. हा फोन मीडियाटेकच्या प्रोसेसरसह जबरदस्त परफॉर्मन्स देतो.

realme 10 Pro 5G

  • डिस्प्ले : 6.72 इंच
  • रॅम : 8GB
  • स्टोरेज : 128GB
  • बॅटरी : 5000mAh
  • प्रोसेसर : Snapdragon 695 5G
  • रियर कॅमेरा : 108MP + 2MP
  • फ्रंट कॅमेरा : 16MP
  • किंमत : 18,999 रुपयांपासून सुरु

realme 10 Pro 5G स्मार्टफोन 93.76% स्क्रीन टू बॉडी रेश्यो सह येतो. रियलमीच्या ह्या फोनमध्ये 1mm चे बेजल्स मिळतात जे युजर्सच्या व्यूविंग एक्सपीरियंसची शोभा वाढवतो. तसेच हा फोन आतून व्हॅक्युम सील करण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनचा डिस्प्ले ग्लूविना चिटकवण्यात आला आहे. ह्यात थिन बेजल्स पॉलिश डिजाइन मिळते.

The post 25000 रुपयांच्या आत बेस्ट 5G स्मार्टफोन; Oppo F23, iQOO Neo 6 सह हे आहेत बेस्ट ऑप्शन (मे 2023) first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-5g-smartphone-under-rs-25000/feed/ 0
नवीन 5G Phone घेताय? मग हे 10 पॉईंट कायम ठेवा लक्षात https://www.91mobiles.com/marathi/10-points-for-best-5g-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/10-points-for-best-5g-smartphone/#respond Sun, 26 Mar 2023 03:30:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18129 सध्या स्मार्टफोन घेताना सर्वप्रथम हाच विचार येतो की तो फोन 5G असावा. परंतु फक्त 5G आहे म्हणून कोणताही फोन घेणं योग्य नाही. कारण सध्या बाजारात बजेट सेगमेंटमध्ये देखील 5जी फोन आले आहेत आणि प्रत्येक कंपनी बेस्ट 5G एक्सपीरियंसचा दावा देखील करत आहे परंतु यातील बेस्ट 5जी फोन कोणता हा महत्वाचा प्रश्न आहे. आज इथे आम्ही […]

The post नवीन 5G Phone घेताय? मग हे 10 पॉईंट कायम ठेवा लक्षात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या स्मार्टफोन घेताना सर्वप्रथम हाच विचार येतो की तो फोन 5G असावा. परंतु फक्त 5G आहे म्हणून कोणताही फोन घेणं योग्य नाही. कारण सध्या बाजारात बजेट सेगमेंटमध्ये देखील 5जी फोन आले आहेत आणि प्रत्येक कंपनी बेस्ट 5G एक्सपीरियंसचा दावा देखील करत आहे परंतु यातील बेस्ट 5जी फोन कोणता हा महत्वाचा प्रश्न आहे. आज इथे आम्ही तुम्हाला 5जी फोनची लिस्ट दिली नाही परंतु 10 पॉईंट्स सांगितले आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही योग्य 5G स्मार्टफोनची निवड करू शकता.

10 पॉईंट: कसा असावा तुमचा 5G स्मार्टफोन

  • जास्तीत जास्त 5जी बँडचा सपोर्ट
  • प्रोसेसर फॅब्रिकेशन
  • हीट डिस्पेशन सिस्टम
  • UFS मेमरी
  • 8GB रॅम असावा
  • मोठी बॅटरी
  • हाय रिजोल्यूशन स्क्रीन
  • 90 किंवा 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट
  • फास्ट चार्जिंग
  • डॉल्बी इंटीग्रेशन

जास्तीत जास्त 5जी बँडचा सपोर्ट

भारतात 5G सर्व्हिसची घोषणा जियो, एयरटेल आणि वोडाफोन-आयडियानं केली आहे. Jio आणि Airtel ची 5G सर्व्हिस अनेक शहरांमध्ये सुरु झाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार उसनुसार एयरटेलकडे 5G सर्व्हिससाठी 900 MHz (n8), 1800 MHz (n3), 2100 MHz (n1), 3300 MHz (n78) आणि 26 GHz (n258) बँड आहेत. तसेच कंपनी 5G सर्व्हिससाठी एन8 आणि एन3 बँडचा वापर करत आहे. Jio 5G bands पाहता कंपनीकडे 700 MHz (n28), 3300 MHz (n78) व्यतिरिक्त 26 GHz (n58) बँड आहे आणि कंपनी एन28 आणि एन78 बँडचा मोठ्याप्रमाणावर वापर करत आहे. राहिला प्रश्न वोडाफोन-आयडियाचा तर कंपनीकडे 5Gसाठी 3300 MHz (n78) आणि 26 GHz (n258) स्पेक्ट्रम बँड उपलब्ध आहेत. भारतात तुम्हाला 5G सर्व्हिस याच बँड्सवर मिळेल. तुम्ही 5जी फोन घेण्याचा विचार करत असाल तर या बँड्सचा सपोर्ट त्यात आहे की नाही ते पाहा. शक्य असल्यास ज्यात जास्ती जास्त 5G बँडचा सपोर्ट असेल असाच फोन घ्या. एक-दोन 5G बँड असलेल्या फोन्स पासून दूर राहिलेले चांगले.

प्रोसेसर फॅब्रिकेशन

आतापर्यंत त्या फोनची निवड करायला सांगितली जायची ज्याच्या प्रोसेसरचा स्पीड जास्त असेल. परंतु स्मार्टफोनमधील टेक्नॉलॉजी बदलत आहे त्यामुळे त्या फोनची निवड करावी ज्याच्या प्रोसेसरचं फॅब्रिकेशन सर्वात बेस्ट असेल. सध्या बाजारात 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशन प्रोसेसवर तयार झालेल्या प्रोसेसरसह फोन येत आहेत जर तुम्ही त्यांची निवड केली तर बेस्ट आहे परंतु ते महाग वाटत असतील तर निदान 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन असलेला 5जी फोन घ्यावा. चांगल्या फॅब्रिकेशनचा फरक तुम्हाला हीटिंग, बॅटरी ऑप्टिमाइजेशनसह परफॉर्मन्समधून दिसेल.

हीट डिस्पेशन सिस्टम

साहजिक आहे तुम्ही 5जी फोन घेण्याचा विचार करत असाल तर त्यावर इंटरनेट ब्राउजिंग सोबतच ऑनलाइन गेमिंग आणि हेव्ही अ‍ॅप्सचा वापर कराल. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये हीट डिस्पेशन आणि व्हेपर कूलिंग चेंबर सारखे फीचर्स आवश्यक आहेत. त्यामुळे इंटरनेट वापरताना किंवा ऑनलाइन गेमिंग दरम्यान जर प्रोसेसर गरम झाल्यास हीट डिस्पेशन आणि व्हेपर कूलिंग चेंबरसारखे फीचर्स तापमान संतुलित करतात आणि फोनची परफॉर्मन्स कायम ठेवतात.

UFS मेमरी

तुम्हाला माहित आहे की फोनमध्ये फास्ट डेटा ट्रांसफरसाठी जितका चांगला प्रोसेसर आणि रॅम टेक्नॉलॉजी लागते तेवढीच महत्वाची फ्लॅश मेमरी म्हणजे इंटरनल मेमरी टेक्नॉलॉजी देखील आहे. जर तुमच्या फोनच्या मेमरीमध्ये यूएफएसचा सपोर्ट असेल तर उत्तम. सध्या बाजारात 4.0 यूएफएसचे फोन आहेत परंतु जर तुम्ही 3.0 किंवा 3.1 यूएफएस टेक्नॉलजीचे फोन घेतले तरी चालेल.

8GB रॅम असावा

जर तुम्हाला तुमचा 5G फोन दीर्घकाळ नीट वापरायचा असेल तर कमीत कमी 8GB रॅम असेलेल्या 5जी फोनची निवड करा. कारण 5जी फोनमध्ये फास्ट नेटवर्क स्पीड प्रोसेस करण्यासाठी जास्त मेमरीचा वापर होतो त्यामुळे 4GB आणि 6GB सह तुम्हाला काही दिवसांनी समस्या येऊ शकते. त्यामुळे कमीत कमी 8GB रॅम असलेल्या फोनची निवड करा. तसेच शक्य असल्यास रॅम टेक्नॉलॉजी DDR5 असेल तर उत्तम.

मोठी बॅटरी

5जी फोनमध्ये बॅटरी वेगानं संपते, हे तुम्हाला कदाचित माहित असेल. त्यामुळे माझ्यामते कमीत कमी 4500mAh पेक्षा जास्त बॅटरी असलेला फोन घ्या. जर 5000mAh पेक्षा जास्त बॅटरी असेल तर अतिउत्तम. हे देखील वाचा: दगडासारखा दणकट फोन! Doogee S100 मध्ये 10800mAh बॅटरी आणि 12GB रॅम

हाय रिजोल्यूशन स्क्रीन

5G सर्व्हिस फास्ट नेटवर्क आहे आणि या नेटवर्कचा वापर तुम्ही तुमच्या ऑफिसचं काम, अभ्यास किंवा इंटरटेनमेंटसाठी करता. त्यामुळे तुमचा फोन हाय रिजोल्यूशनचा असेल तर फास्ट इंटरनेटचा वापर करताना मजा येईल. त्यामुळे मोठी स्क्रीनसह हाय रिजोल्यूशन पिक्सलकडे देखील लक्ष असू द्या. तसेच अ‍ॅमोलेड किंवा ओएलईडी स्क्रीन पॅनल असेल तर एकच नंबर.

90 किंवा 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट

जर तुम्ही 5जी फोन घेत असाल तर कमीत कमी 90 हर्ट्ज स्क्रीन रिफ्रेश रेट असलेला फोन निवडा. तसेच यापेक्षा जास्त 120 किंवा 144 हर्ट्जचा रिफ्रेश रेट असेल तर बेस्टच. म्हणजे फास्ट स्क्रॉलिंगमध्ये तुम्ही अडकणार नाही.

फास्ट चार्जिंग

हा एक महत्वाचा पॉईंट आहे जो बऱ्याचदा मिस होतो. कारण 5जी फोनमध्ये बॅटरी खूप वेगानं संपते. इंटरनेट किंवा ऑनलाइन गेमिंगमध्ये कधी संपेल ते तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे फास्ट चार्जिंग आवश्यक आहे. जर 44 वॉट किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर बेस्ट. हे देखील वाचा: Vivo V27 Pro Price in India: लाँचपूर्वीच समोर आली माहिती, इतकी असेल किंमत

डॉल्बी इंटीग्रेशन

तुम्हाला तर माहित असेलच की डॉल्बी आपल्या साउंड टेक्नॉलॉजीसाठी ओळखली जाते. त्यामु जर तुम्ही 5जी फोनचा विचार करत असाल आणि मोठा डिस्प्ले आणि सुपर फास्ट इंटरनेट असेल तर टेक्नॉलॉजीवर देखील लक्ष द्या. खास करून जर तुम्ही फोन इंटरटेनमेंट किंवा गेमिंगसाठी घेत असाल तर डॉल्बी इंटीग्रेशन नक्की पाहा.

The post नवीन 5G Phone घेताय? मग हे 10 पॉईंट कायम ठेवा लक्षात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/10-points-for-best-5g-smartphone/feed/ 0
New 5G Smartphone Guide: 5G नेटवर्क दारात आलं म्हणून घाई नको; नवीन 5G स्मार्टफोन घेताना या 7 गोष्टींची काळजी घ्या https://www.91mobiles.com/marathi/new-5g-smartphone-guide-dont-miss-these-7-impotent-things/ https://www.91mobiles.com/marathi/new-5g-smartphone-guide-dont-miss-these-7-impotent-things/#respond Mon, 10 Oct 2022 12:48:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13850 New 5G Smartphone Guide: भारतात 5G ची प्रतीक्षा संपली असून दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क सादर केलं आहे. Airtel नं सर्वप्रथम 1 ऑक्टोबरपासून दिल्ली, वाराणसी, नागपुर, बेंगळुरू, हैद्राबाद, मुंबई, चेन्नई आणि सिलिगुरी या आठ शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली आहे. तर रिलायन्स जियोनं मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G ची सुरुवात केली […]

The post New 5G Smartphone Guide: 5G नेटवर्क दारात आलं म्हणून घाई नको; नवीन 5G स्मार्टफोन घेताना या 7 गोष्टींची काळजी घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
New 5G Smartphone Guide: भारतात 5G ची प्रतीक्षा संपली असून दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क सादर केलं आहे. Airtel नं सर्वप्रथम 1 ऑक्टोबरपासून दिल्ली, वाराणसी, नागपुर, बेंगळुरू, हैद्राबाद, मुंबई, चेन्नई आणि सिलिगुरी या आठ शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली आहे. तर रिलायन्स जियोनं मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G ची सुरुवात केली आहे. पुढील काही वर्षांमध्ये संपूर्ण भारतात 5G सेवेचा विस्तार होईल. परंतु 5G नेटवर्कचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणं आवश्यक आहे. म्हणून घाईत 5G स्मार्टफोन खरेदी करून पुढील 7 चुका करू नका.

New 5G Smartphone Guide: Dont Miss These 7 Impotent Things

सर्व 5G स्मार्टफोन सारखेच नसतात

5G चिपसेट असलेले स्मार्टफोन युजर्सना एक सारखा 5G इंटरनेट स्पीड देत नाहीत. त्यामुळे 5G स्मार्टफोन विकत घेताना थोडा रिसर्च करा. चांगला 5G स्मार्टफोन विकत घेण्याआधी प्रोसेसर, mmWave आणि sub-6GHz नक्की चेक करा. mmWave 5G बँडवर चांगला 5G स्पीड मिळणं अवलंबून आहे. तर sub-6GHz बँड देखील 4G पेक्षा चांगला स्पीड ऑफर देऊ शकतो, परंतु ह्याचा मुख्य वापर कव्हरेजसाठी होतो. हे देखील वाचा: मिस करू नका ही संधी! 8,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 6GB रॅम असलेला Realme चा दमदार 5G स्मार्टफोन

New 5G Smartphone Guide Don’t Miss These 7 Impotent Things

5G बँडला सपोर्टची माहिती घ्या

सर्वात महत्वाची बाब म्हणजे नवीन 5G फोन किती बँड्सना सपोर्ट करतो, ते पाहा. टेक्नीकल बाब सोडली तर फोनमध्ये जितके जास्त 5G बँड सपोर्टेड असतील तितके चांगले. भारतात 5G स्मार्टफोनमध्ये 11 5G बँड किंवा त्यापेक्षा जास्त बँड देखील मिळतात.

New 5G Smartphone Guide Don’t Miss These 7 Impotent Things

लेटेस्ट तेच बेस्ट

भारतात गेल्या दोन वर्षांपासून 5G स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर लेटेस्ट लाँच झालेला 5G स्मार्टफोन घेणं केव्हाही चांगलं. लेटेस्ट लाँच फोनमध्ये जुन्या फोनच्या तुलनेत चांगला प्रोसेसर, सुधारित 5G स्पीड आणि कव्हरेज मिळेल. जुना 5G स्मार्टफोन कमी किंमतीत मिळेल परंतु 5G सर्व्हिस तेवढी चांगली देणार नाही.

New 5G Smartphone Guide Don’t Miss These 7 Impotent Things

बॅटरी देखील महत्वाची

5G स्मार्टफोनमध्ये इंटरनेट स्पीड खूप जास्त मिळतो, परंतु फोनमध्ये पावर कंज्मशन वाढतं. त्यामुळे स्मार्टफोन विकत घेताना जास्त बॅटरी कपॅसिटी असलेला ऑप्शन बघा. जर तुम्ही 6.5 इंच किंवा त्यापेक्षा मोठा डिस्प्ले असलेला हँडसेट घेत असाल तर 5000mAh पेक्षा जास्त मोठी बॅटरी असणं आवश्यक आहे.

New 5G Smartphone Guide Don’t Miss These 7 Impotent Things

बजेट 5G स्मार्टफोनला कमी समजू नका

सुरुवातीला 5G सपोर्टसह महागडे आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन उपलब्ध झाले होते. परंतु आता 5G सपोर्टसह बजेट स्मार्टफोन देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सध्या बाजारात 15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G फोन उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनमध्ये शानदार डिस्प्ले रिजोल्यूशन, कॅमेरा सेन्सर आणि 5G स्पीड मिळतो. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.

रेग्युलर अपडेट देखील आवश्यक

5G सध्या खूप नवीन टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे यात स्टेबिलिटी आणि कनेक्टिव्हिटीसाठी सॉफ्टवेयर अपडेट मिळू शकतात. त्यामुळे नवीन 5G स्मार्टफोन विकत घेताना अशा ब्रँडची निवड करा जिथे रेग्युलर आणि वेळेवर सॉफ्टवेयर अपडेट मिळतात. हे देखील वाचा: Airtel 5G Plus: फक्त ‘या’ स्मार्टफोन्सवर चालेल एयरटेल 5जी, पाहा तुमचा फोन आहे का या यादीत

5G मुळे तुमच्या गरजा विसरू नका

5G स्मार्टफोन विकत घेताना तुमच्या गरजा देखील लक्षात ठेवा. फक्त 5G आहे म्हणून महागडा स्मार्टफोन घेऊ नका, त्यातील बॅटरी, कॅमेरा आणि डिस्प्ले क्वॉलिटीकडे देखील लक्ष असू देत. काही बजेट फोन देखील 5G सह चांगले स्पेसिफिकेशन्स देतात, त्यांची माहिती घ्या.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post New 5G Smartphone Guide: 5G नेटवर्क दारात आलं म्हणून घाई नको; नवीन 5G स्मार्टफोन घेताना या 7 गोष्टींची काळजी घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-5g-smartphone-guide-dont-miss-these-7-impotent-things/feed/ 0
इंडियन मोबाइल काँग्रेसच्या मंचावरून Lava Blaze 5G लाँच; पाहा किंमत https://www.91mobiles.com/marathi/most-affordable-5g-smartphone-of-india-lava-blaze-5g-launched-at-10000-price-check-feature-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/most-affordable-5g-smartphone-of-india-lava-blaze-5g-launched-at-10000-price-check-feature-specifications/#respond Mon, 03 Oct 2022 10:04:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13655 5G नेटवर्क भारतात सक्रिय झालं आहे आणि देशातील आठ शहरांमध्ये एयरटेलनं 5G Network सुरु केलं आहे. लवकरच जियोची 5G सेवा देखील प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होईल. आता भारतात 5G चा विस्तार होण्याच्या मार्गात 5G स्मार्टफोन्स हाच एक मोठा अडथळा आहे. जरी 5जी सेवा येण्याआधीच मोबाइल कंपन्यांनी आपले 5जी स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत, परंतु India’s first […]

The post इंडियन मोबाइल काँग्रेसच्या मंचावरून Lava Blaze 5G लाँच; पाहा किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G नेटवर्क भारतात सक्रिय झालं आहे आणि देशातील आठ शहरांमध्ये एयरटेलनं 5G Network सुरु केलं आहे. लवकरच जियोची 5G सेवा देखील प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होईल. आता भारतात 5G चा विस्तार होण्याच्या मार्गात 5G स्मार्टफोन्स हाच एक मोठा अडथळा आहे. जरी 5जी सेवा येण्याआधीच मोबाइल कंपन्यांनी आपले 5जी स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत, परंतु India’s first most affordable 5G smartphone म्हणजे भारतातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन आज देशात लाँच झाला आहे. हा फोन भारतीय कंपनी लावानं बनवला आहे तसेच रेल्वे, संचार आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्या हस्ते लाँच करण्यात आला आहे. इंडिया मोबाइल कांग्रेस (IMC 2022) India Mobile Congress च्या मंचावरून Lava Blaze 5G phone लाँच झाला आहे.

Lava Blaze 5G ची किंमत

India’s most affordable 5G smartphone Lava Blaze 5G आहे जो आयएमसी 2022 दरम्यान लाँच करण्यात आला आहे. लावा ब्लेज 5जी फोनची किंमत 10,000 रुपयांच्या आसपास आहे, विशेष म्हणजे या प्राइस रेंजमध्ये आतापर्यंत कोणताही 5जी मोबाइल फोन भारतीय बाजारात आला नाही. Lava Blaze 5G दिवाळीच्या निमित्ताने भारतात सेलसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन 8 5G bands ला सपोर्ट करतो ज्यात 1/3/5/8/28/41/77/78 चा समावेश आहे. हे देखील वाचा: कामालाच झाली! 108MP Camera असलेला Moto G72 भारतात लाँच; किंमत 15 हजारांपेक्षा कमी

Most Affordable 5G Smartphone Of India Lava Blaze 5G Launched At 10000 Price Check Feature Specifications

Lava Blaze 5G चे स्पेसिफिकेशन्स

लावा ब्लेज 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या फोनचा डिस्प्ले Widevine L1 ला सपोर्ट करतो जो ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग दरम्यान देखील एचडी क्लॉलिटी व्हिज्युअल आउटपुट देईल.

Lava Blaze 5G अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह येतो. हा लावा मोबाइल 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटवर चालतो. लावा ब्लेज 5जी स्मार्टफोन 4 जीबी रॅम सोबतच 3जीबी व्हर्च्युअल रॅमला पण सपोर्ट करतो त्यामुळे यात एकूण 7जीबी रॅमची पावर मिळते. तसेच फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हे देखील वाचा: 15 हजारांत लॅपटॉप! वायफायची गरज नाही 4G सिम स्लॉटसह येईल स्वस्त JioBook लॅपटॉप

5G Launch India 1st October PM Narendra Modi Airtel Jio Vi 5G Sim 5G Recharge Plan Price

फोटोग्राफीसाठी Lava Blaze 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे पावर बॅकअपसाठी या लावा स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

The post इंडियन मोबाइल काँग्रेसच्या मंचावरून Lava Blaze 5G लाँच; पाहा किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/most-affordable-5g-smartphone-of-india-lava-blaze-5g-launched-at-10000-price-check-feature-specifications/feed/ 0
iPhone 14 पासून स्वस्त OnePlus पर्यंत हे आहेत पुढील महिन्यात भारतात येणारे 5G स्मार्टफोन, पैसे ठेवा तयार https://www.91mobiles.com/marathi/september-2022-upcoming-5g-smartphone-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/september-2022-upcoming-5g-smartphone-in-india/#respond Mon, 29 Aug 2022 05:09:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12551 भारतात 5G नेटवर्क लवकरच सुरु होणार आहे. भारतात 5G सेवा सुरु होण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम (DoT) नं यासाठी स्पेक्ट्रमचा लिलाव केला आहे. स्पेक्ट्रम मिळाल्यानंतर भारतीय टेलीकॉम कंपन्या वेगानं 5G सेवा सुरु करण्यासाठी काम करत आहे. बातम्यांनुसार देशातील प्रमुख टेलीकॉम कंपनी जियो भारतात 29 ऑगस्टला भारतात 5G सेवेची घोषणा करू शकते. 5G सेवा सुरु झाल्यानंतर स्मार्टफोन […]

The post iPhone 14 पासून स्वस्त OnePlus पर्यंत हे आहेत पुढील महिन्यात भारतात येणारे 5G स्मार्टफोन, पैसे ठेवा तयार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात 5G नेटवर्क लवकरच सुरु होणार आहे. भारतात 5G सेवा सुरु होण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम (DoT) नं यासाठी स्पेक्ट्रमचा लिलाव केला आहे. स्पेक्ट्रम मिळाल्यानंतर भारतीय टेलीकॉम कंपन्या वेगानं 5G सेवा सुरु करण्यासाठी काम करत आहे. बातम्यांनुसार देशातील प्रमुख टेलीकॉम कंपनी जियो भारतात 29 ऑगस्टला भारतात 5G सेवेची घोषणा करू शकते. 5G सेवा सुरु झाल्यानंतर स्मार्टफोन फास्ट डाउलोडिंग, लो लेटेंसी, सुधारित नेटवर्क, जास्त नेटवर्क कव्हरेज आणि चांगली परफॉर्मेंस देतील. त्यामुळे ही एक चांगली संधी आहे 4G फोनवरून 5G वर जाण्याची. आज आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये लाँच होणाऱ्या 5G स्मार्टफोनबाबत माहिती देत आहोत जे पुढील महिन्यात भारतात लाँच होऊ शकतात.

Upcoming 5G Smartphone

Apple iPhone 14

Apple चे नवीन मॉडेल्सची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. यंदा कंपनी 7 सप्टेंबरला आपला लाँच इव्हेंट आयोजित करणार आहे. म्हणजे या दिवस Apple iPhone 14 लाइनअप लाँच केली जाईल. या सीरीजचे iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max हे चार मॉडेल्स लाँच केले जातील. iPhone 14 सीरीजचे सर्व मॉडेल 5G सपोर्टसह बाजारात येतील.

Vivo V25 5G

Vivo नं भारतात अलीकडेच आपल्या स्टायलिश Vivo V25 सीरीज अंतर्गत Vivo V25 Pro 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. आता कंपनी Vivo V25 5G लाँच करण्याची तयारी करत आहे. विवोचा हा फोन मिड रेंजमध्ये 5G कनेक्टिव्हिटीसह लाँच केला जाईल. या फोनमध्ये 64MP क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि 50MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. विवोचा हा फोन MediaTek Dimensity 900 प्रोसेसरसह येईल, अशी चर्चा आहे.

OnePlus Nord 3 5G

OnePlus लवकरच आपला प्रीमिमय अफोर्डेबल स्मार्टफोन OnePlus Nord 3 5G लाँच करणार आहे. वनप्लसची नॉर्ड सीरीज खूप लोकप्रिय आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या OnePlus Nord 2T 5G नंतर आता कंपनी Nord 3 स्मार्टफोन बाजारात सादर करेल. वनप्लसच्या आगामी फोन बाबत दावा केला जात आहे की MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम आणि 50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो.

Xiaomi 12S Ultra 5G

शाओमीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 12S Ultra 5G लवकरच भारत आणि ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. शाओमीचा हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाल्यापासून चर्चेत आला आहे. Xiaomi 12S Ultra स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर केला गेला आहे. फोनमध्ये 6.73 इंचाचा LTPO 2.0 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2K आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो Leica Summicron लेन्स सिस्टमला सपोर्ट करतो.

Moto Edge 30 Ultra 5G

Moto Edge 30 Ultra 5G स्मार्टफोन देखील लवकरच भारतात लाँच होणार आहे. मोटोरोलाचा आगामी स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झालेल्या Motorola X30 Pro 5G चा रिब्रँड व्हर्जन असेल. Motorola X30 Pro स्मार्टफोन 200MP कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये Samsung च्या ISOCELL HP1 200MP सेन्सरचा वापर करण्यात आला आहे, ज्यात 12.5MP रिजोल्यूशनचा फोटो 16-टू-1 पिक्सल बायनिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीनं 200MP च्या रिजोल्यूशनमध्ये रूपांतरित केला जातो.

iQOO Neo 7

iQOO भारतात पुढील महिन्यात आपला प्रीमियम मिड रेंज स्मार्टफोन iQOO Neo 7 लाँच करण्याची योजना बनवत आहे. आयकूचा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. सध्या या फोनच्या लाँच डेटबद्दल माहिती कंफर्म नाही. आगामी iQOO Neo 7 स्मार्टफोन बाबत बोलले जात आहे की यात 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिला जाईल, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल.

Samsung Galaxy A23 5G

सॅमसंग देखील भारतात सप्टेंबरमध्ये नवीन बजेट 5G स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. सॅमसंगचा अपकमिंग Galaxy A23 5G स्मार्टफोन 16 सप्टेंबरला लाँच होऊ शकतो, अशी चर्चा आहे. सॅमसंगचा हा फोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. या फोनमध्ये 6.6-इंचाचा IPS LCD पॅनल दिला जाईल. रिपोर्ट्सनुसार फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 695 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

The post iPhone 14 पासून स्वस्त OnePlus पर्यंत हे आहेत पुढील महिन्यात भारतात येणारे 5G स्मार्टफोन, पैसे ठेवा तयार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/september-2022-upcoming-5g-smartphone-in-india/feed/ 0
वनप्लसचा आणखी एक स्वस्त स्मार्टफोन भारतात; 50MP कॅमेरा, 80W फास्ट चार्जसह OnePlus Nord 2T ची एंट्री https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-2t-launched-in-india-know-price-specification-and-more/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-2t-launched-in-india-know-price-specification-and-more/#respond Fri, 01 Jul 2022 09:53:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11046 OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity प्रोसेसर, Android 12 आणि आमोलेड डिस्प्लेसह भारतात आला आहे.

The post वनप्लसचा आणखी एक स्वस्त स्मार्टफोन भारतात; 50MP कॅमेरा, 80W फास्ट चार्जसह OnePlus Nord 2T ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus नं आपल्या किफायतशीर नॉर्ड सीरिजचा विस्तार केला आहे. जागतिक बाजारात लाँच झालेल्या OnePlus Nord 2T स्मार्टफोनची भारतात एंट्री झाली आहे. कंपनीचे चाहते गेले कित्येक दिवस या मिडरेंज स्मार्टफोनची वाट पाहत होते. हा फोन गेल्यावर्षी लाँच झालेल्या Nord 2 ची जागा घेईल. OnePlus Nord 2T 5G मध्ये मीडियाटेकचा Dimensity 1300 प्रोसेसर देण्यात आला आहे.

OnePlus Nord 2T चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन Full HD+ आहे. सुरक्षेसाठीसाठी स्क्रीनला Corning Gorilla Glass 5 ची कोटिंग देण्यात आली आहे. वनप्लसच्या या फोनमध्ये अलर्ट स्लाइडर देण्यात आला आहे. त्याचबरोबर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. फोनमध्ये X-अ‍ॅक्सिस लीनियर मोटर, 4×4 MIMO, 5G, 4G LTE, Bluetooth 5.2, ड्युअल बँड Wi-Fi, NFC, आणि ड्युअल रियर स्टीरियो स्पिकर देखील मिळतो.

वनप्लसच्या या फोनमध्ये MediaTek चा Dimensity 1300 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 12GB पर्यंतचा LPDDR4X RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. वनप्लसचा हा फोन अँड्रॉइड 12 आधारित OxygenOS 12 वर चालतो. OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 80W SUPERVOOC चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.

OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा सेन्सर OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP ची मोनो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा Sony IMX615 कॅमेरा मिळतो.

OnePlus Nord 2T 5G ची किंमत

OnePlus Nord 2T स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात लाँच करण्यात आले आहेत, ज्यात 8GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 256GB व्हेरिएंटचा समावेश आहे. यातील 8GB RAM ची किंमत 28,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12GB RAM मॉडेल 33,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. खरेदीसाठी आयसीआयसीआय बँकेच्या कार्डचा वापर केल्यास 1,500 रुपयांची सूट मिळेल. हा फोन 5 जुलै पासून Amazon, OnePlus.in, आणि OnePlus च्या स्टोरवर ग्रे शॅडो आणि झेड फॉग कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.

The post वनप्लसचा आणखी एक स्वस्त स्मार्टफोन भारतात; 50MP कॅमेरा, 80W फास्ट चार्जसह OnePlus Nord 2T ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-2t-launched-in-india-know-price-specification-and-more/feed/ 0
भारतातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत 20,000 रुपयांपेक्षा पण कमी https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-5g-smartphone-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-5g-smartphone-in-india/#respond Mon, 08 Feb 2021 12:19:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9935 आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही भारतीय बाजारातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची यादी बनवली आहे हे आकर्षक लुक सोबतच पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह पण येतात. या 5G Phone ची किंमत 19,999 रुपयांपासून सुरु होते.

The post भारतातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत 20,000 रुपयांपेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G ची सुरवात तर गेल्या वर्षीच झाली होती पण साल 2021 5जीच्या क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. भारतात 5जी नेटवर्क सुरु नाही झाले पण मोबाईल ब्रँड्सनी या सर्विससाठी आधीपासूनच कंबर कसली असल्याचे दिसत आहे. अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी भारतीय बाजारात आपले 5G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे शानदार स्पेसिफिकेशन्ससह आले आहेत. इंडियन युजरच्या गरजा जाणून या मोबाईल कंपन्या असा प्रयत्न करत आहेत कि कमीत कमी किंमतीत 5जी कनेक्टिविटी असलेले मोबाईल फोन घेऊन यावे. आज भारतीय बाजारात अनेक 5जी स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत जे मिडबजेट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही भारतीय बाजारातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची यादी बनवली आहे हे आकर्षक लुक सोबतच पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह पण येतात. या 5G Phone ची किंमत 19,999 रुपयांपासून सुरु होते.

Realme X7 5G

रियलमी एक्स7 5जी भारतीय बाजारात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 19,999 रुपये आहे तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे आणि हा फोन 21,999 रुपयांमध्ये 12 फेब्रुवारीपासून विकत घेता येईल.

Realme X7 कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड 6.4 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल एमोलेड डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. रियलमी एक्स7 अँड्रॉइड 10 ओएसवर लॉन्च झाला आहे जो रियलमी युआय सह चालतो. प्रोसेसिंगसाठी रियलमी एक्स7 मध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला मीडियाटेक डायमनसिटी 800यू चिपसेट देण्यात आला आहे त्याचबरोबर माली-जी57 जीपीयू आहे.

हे देखील वाचा : लॉन्चच्या आधी समोर आली 64MP चा कॅमेरा असलेल्या Vivo S9 5G ची महत्वाची माहिती, जाणून घ्या याची खासियत

हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.5 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या सोनी आईएमएक्स471 सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Realme X7 मध्ये 4,310एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 50वॉट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजी सह येते.

Xiaomi Mi 10i 5G

शाओमीने साल 2021 ची सुरुवात मी 10आय सोबतच केली आहे. भारतात हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 20,999 रुपये आहे. तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 21,999 रुपये आहे. सर्वात मोठा वेरिएंट 12 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजवर लॉन्च झाला ज्याची किंमत 23,999 रुपये आहे. हा फोन Midnight Black, Atlantic blue आणि Pacific Sunrise कलर मध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Mi 10i 5G कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च केला आहे जो 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येते. मी 10आय 5जी कंपनीने अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला आहे जो मीयुआय 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये र्कोटेक्स ए-77 सीपीयूवर काम करणारा क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट देण्यात आला आहे जो 5जी कनेक्टिविटीसह येतो.

हे देखील वाचा : Aadhaar Card हरवल्यावर किंवा खराब झाल्यावर चिंता करण्याचे कारण नाही, आधार कार्डची नवी कॉपी अश्याप्रकारे मिळवा मोफत

xiaomi mi 10i

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Mi 10i 5G क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा HM2 sensor देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा शाओमी फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,820एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Moto G 5G

मोटोरोलाचा हा 5जी फोन भारतात 6 जीबी रॅमसह लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. नोव्हेंबर 2020 मध्ये मार्केट मध्ये आलेल्या या फोनची किंमत फक्त 20,999 रुपये आहे. जो Volcanic Grey आणि Frosted Silver कलर मध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. मोटो जी 5जी आईपी52 रेटिंग सह बाजारात आला आहे त्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो.

Moto G 5G स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो एचडीआर 10ला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750 5जी चिपसेटवर चालतो. हा चिपसेट फोनला डुअल मोड 5G (SA/NSA) कनेक्टिविटी देतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Motorola पण घेऊन येत आहे स्वस्त 5G फोन, 6 जीबी रॅमसह झाला वेबसाइटवर लिस्ट

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एक एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा पंच-होल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 20वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Vivo V20 Pro 5G

वीवो वी20 प्रो 5जी डिसेंबर मध्ये भारतात लॉन्च झाला होता जो 8 जीबी रॅमसह मार्केट मध्ये आला होता. फोन मध्ये 128 जीबी इंटरनल मेमरी आहे तसेच या फोनची किंमत 29,990 रुपये आहे. मार्केट मध्ये हा फोन Midnight Jazz आणि Sunset Melody कलर मध्ये विकत घेता येईल. हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 6.44 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. वीवो वी20 प्रोची स्क्रीन 408पीपीई आणि 3000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करते.

Vivo V20 Pro अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट डुअल मोड 5जी (SA/NSA) वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी वीवो वी20 प्रो एड्रेनो 620 जीपीयूला सपोर्ट करतो. हा फोन 4,000एमएएच बॅटरीवर लॉन्च केला गेला आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करते.

हे देखील वाचा : काहीशी अशी असेल रियलमीच्या आगामी ताकदवान फ्लॅगशिप फोन Realme Race ची डिजाइन

वीवो वी20 प्रोच्या बॅक पॅनलवर तीन तर फ्रंट पॅनलवर दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फ्रंट कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 44 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो त्यासोबत एफ/2.28 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे. तर मागे एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस + मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आहे.

OnePlus Nord 5G

गेल्यावर्षी लॉन्च झालेला वनप्लस नॉर्ड आजपण देशातील सर्वात स्वस्त आणि बेस्ट 5जी स्मार्टफोन्स पैकी एक आहे. हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे यातील सर्वात छोटा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 24,999 रुपयांमध्ये, 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये आणि सर्वात मोठा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OnePlus Nord 5G स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 6.44-इंचाच्या फ्लूयड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित आक्सिजनओएसवर लॉन्च झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लाक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765जी वर चालतो. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 30टी वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,115एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Nokia 5.4 होणार आहे भारतात लॉन्च, फ्लिपकार्टवर झाला लिस्ट, असे असतील स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये चार रियर आणि दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. बॅक पॅनलवर एफ/1.75 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सल Sony IMX586 सेंसर, एफ/2.25 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.24 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि एक 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या Sony IMX616 सेंसर आणि एफ/2.45 सह 8 मेगापिक्सलच्या सेंसरला सपोर्ट करतो.

The post भारतातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत 20,000 रुपयांपेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-5g-smartphone-in-india/feed/ 0
Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च, याची किंमत आहे कमी आणि फीचर्स, स्पेसिफिकेशन्स दमदार https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-pro-5g-launch-in-india-price-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-pro-5g-launch-in-india-price-specs-sale-offer/#respond Wed, 02 Dec 2020 12:54:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9137 Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे.

The post Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च, याची किंमत आहे कमी आणि फीचर्स, स्पेसिफिकेशन्स दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आज भारतीय बाजारात आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत शानदार 5जी स्मार्टफोन सादर केला आहे. कपंनीने हा स्मार्टफोन ‘वी20 सीरीज’ अंतगर्त आणला ज्याने Vivo V20 Pro 5G नावाने मार्केट मध्ये एंट्री घेतली आहे. Vivo V20 आणि Vivo V20 SE नंतर Vivo V20 Pro या सीरीजचा तिसरा स्मार्टफोन बनला आहे. वीवोचा दावा आहे कि वी20 प्रो देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन्स पैकी एक आहे.

स्टाईलिश डिस्प्ले

Vivo V20 Pro 5G मार्केट मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.44 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. वीवो वी20 प्रो स्क्रीन 408पीपीई आणि 3000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो. वीवोचा हा फोन 7.39mm बारीक आहे आणि याचे वजन 170 ग्राम आहे. भारतीय बाजारात हा फोन Midnight Jazz आणि Sunset Melody कलर मध्ये विकत घेता येईल.

पावरफुल प्रोसेसिंग

Vivo V20 Pro अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट डुअल मोड 5जी (SA/NSA) वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी वीवो वी20 प्रो एड्रेनो 620 जीपीयूला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : फक्त 7,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4,030एमएएच बॅटरी आणि 13एमपी कॅमेरा असलेला Vivo Y1s

शानदार फोटोग्राफी

वीवो वी20 प्रो स्मार्टफोनची सर्वात मोठी खायियत या फोनचा कॅमेरा सेग्मेंट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर तीन तसेच फ्रंट पॅनल वर दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फ्रंट कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 44 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो त्यासोबत एफ/2.28 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस देण्यात आला आहे.

वीवो वी20 प्रोच्या रियर पॅनल वर एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस + मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आहे. या फोनचा सेल्फी कॅमेरा आय ऑटो फोकस टेक्नॉलॉजी सह येतो तसेच रियर कॅमेरा 2.5सीएम पर्यंत मॅक्रो शूटिंग करण्याची क्षमता ठेवतो.

हे देखील वाचा : Micromax ने मान्य केले In Note 1 स्मार्टफोन नाही आहे पूर्णपणे ‘Made In India’, फोनच्या निर्मितीत चीनचा पण आहे हात

ताकदवान बॅटरी

Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे. फोन बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी वीवो वी20 प्रो मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

वेरिएंट व किंमत

वीवो वी20 प्रो भारतात एकच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या स्मार्टफोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Vivo V20 Pro 5G भारतीय बाजारात 29,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो ऑनलाइन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च, याची किंमत आहे कमी आणि फीचर्स, स्पेसिफिकेशन्स दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-pro-5g-launch-in-india-price-specs-sale-offer/feed/ 0
हे आहेत जगातील टॉप 10 5G स्मार्टफोन, Samsung चे नाव आहे सर्वात वर पण 10 पैकी 7 चीनी ब्रँड https://www.91mobiles.com/marathi/top-10-5g-smartphone-globally-report/ https://www.91mobiles.com/marathi/top-10-5g-smartphone-globally-report/#respond Fri, 20 Nov 2020 12:55:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9021 टॉप 10 सेलिंग 5जी स्मार्टफोनच्या लिस्ट मध्ये सर्वात पहिले नाव कोरियन कंपनी सॅमसंगच्या Samsung Galaxy Note 20 Ultra 5G स्मार्टफोनचे आहे.

The post हे आहेत जगातील टॉप 10 5G स्मार्टफोन, Samsung चे नाव आहे सर्वात वर पण 10 पैकी 7 चीनी ब्रँड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G टेक्नॉलॉजी जगभरात जोर धरत आहे. पुढल्या वर्षी भारतात पण 5G नेटवर्क सुरु होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. Reliance Jio ने तर घोषणा पण कर केली आहे कि कंपनी Google सह भागेदारी करून आपला 5जी फोन सादर करेल. देशात 5जी नेटवर्क येण्याआधी टेक कंपन्या व मोबाईल ब्रँड्स आपले 5G स्मार्टफोन लॉन्च करू लागले आहेत. क्वॉलकॉम, मीडियाटेक व एक्सनॉस सारखे दिग्गज ब्रँड्स 5जी बॅंड वर काम करणारे प्रोसेसर व चिपसेट बाजारात आले आहेत आणि त्यांची टेक्नॉलॉजी पण सतत ऍडव्हान्स होत आहे. प्रसिद्ध रिसर्च फर्म काउंटरप्वाइंटने 5जी स्मार्टफोन्सचे वाढते वेढ पाहता एक रिपोर्ट पब्लिश केला आहे ज्यात टॉप 5जी स्मार्टफोनची लिस्ट बनवण्यात आली आहे जे सर्वात जास्त विकत घेतले जात आहेत.

काउंटरप्वाइंटची हि लिस्ट ग्लोबल मार्केट वरून तयार करण्यात आली आहे ज्यात जगातील सर्वात जास्त विकले जाणारे आणि आवडलेल्या 5जी स्मार्टफोनची नावे नोंदवण्यात आली आहेत. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो कि हा रिपोर्ट सप्टेंबर पर्यंतच्या आकड्यांवर आधारित आहे त्यामुळे त्यानंतर लॉन्च झालेल्या 5G स्मार्टफोन्सचा लिस्ट मध्ये समावेश करण्यात आला नाही. लक्षात असू द्या कि Apple ने आपली iPhone 12 सीरीज ऑक्टोबर मध्ये सादर केली होती जिला या यादीत स्थान मिळाले नाही. आयफोन 12 सीरीजच्या लॉन्च नंतर या लिस्ट मध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

सर्वात पुढे Samsung

टॉप 10 सेलिंग 5जी स्मार्टफोनच्या लिस्ट मध्ये सर्वात पहिले नाव कोरियन कंपनी सॅमसंगच्या Samsung Galaxy Note 20 Ultra 5G स्मार्टफोनचे आहे. रिपोर्टनुसार सप्टेंबर 2020 मध्ये सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा कडे 5 टक्के 5जी मोबाईल मार्केट शेयर होता. या महिन्यात सॅमसंगने ऑगस्ट महिन्याच्या बेस्ट सेलिंग 5जी स्मार्टफोन Huawei P40 Pro 5G ला मागे टाकले होते, त्यानंतर हुआवईचा हा फोन दुसऱ्या स्थानावर गेला होता.

या लिस्ट मध्ये टॉप 5 पॉजिशन सॅमसंग आणि हुआवई दोन्ही ब्रँड्सना मिळाली आहे. यादीत तिसरे स्थान Huawei Nova 7 5G चे आहे ज्याने 4.3 टक्के मार्केट शेयर वर कब्जा केला आहे. चौथ्या नंबर वर 4.0 टक्के मार्केट सह Samsung Galaxy S20 Plus 5G आला आहे तसेच यानंतर पाचव्या नंबर वर Huawei P40 5G फोन आहे ज्याच्याकडे 3.8 टक्के मार्केट शेयर आहे.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम सह लॉन्च झाला Realme 7 5G, जगातील सर्वात स्वस्त 5जी फोन्स मध्ये झाला सामील

10 पैकी 7 चायनीज ब्रँड

टॉप 10 च्या लिस्ट मध्ये दहा पैकी सात नावे चीनी ब्रँड्सची आहेत. यादीत सहाव्या नंबर वर 3.6 टक्के मार्केट शेयर सह Vivo Y70s 5G चे नाव आले आहे. सातव्या नंबर वर OPPO Reno 4 5G आहे ज्याच्याकडे 3.1 टक्के शेयर आहे. तसेच 2.9 टक्के मार्केट शेयर सह Samsung Galaxy Note 20 5G आठव्या, 2.8 टक्के मार्केट शेयर सह Honor 30s 5G नवव्या आणि 2.7 टक्के मार्केट शेयर सह OPPO A72 5G टॉप 10 5जी स्मार्टफोन्स मध्ये आला आहे.

The post हे आहेत जगातील टॉप 10 5G स्मार्टफोन, Samsung चे नाव आहे सर्वात वर पण 10 पैकी 7 चीनी ब्रँड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-10-5g-smartphone-globally-report/feed/ 0
Exclusive : 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल भारतातील पहिला 5G स्मार्टफोन, हा ब्रँड करेल कमाल https://www.91mobiles.com/marathi/india-first-5g-phone-iqoo-3-launching-in-india-on-25-february-qualcomm-snapdragon-865/ https://www.91mobiles.com/marathi/india-first-5g-phone-iqoo-3-launching-in-india-on-25-february-qualcomm-snapdragon-865/#respond Tue, 11 Feb 2020 13:27:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6560 आशा आहे कि 25 फेब्रुवारीला लॉच होणारा iQOO चा आगामी स्मार्टफोन एक 5G फोन असेल.

The post Exclusive : 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल भारतातील पहिला 5G स्मार्टफोन, हा ब्रँड करेल कमाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo चा सब-ब्रँड म्हणून iQOO ने मार्केट मध्ये खूप प्रसिद्धी मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी वीवो आणि आईक्यू वेगळे झाल्याच्या बातमीने टेक विश्वाला धक्का बसला होता. गेल्या आठवड्यात आईक्यू चे डायरेक्टर गगन अरोडा यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडेलच्या माध्यमातून माहिती दिली होती कि कंपनीने स्वतंत्र ब्रँड iQOO च्या पहिल्या स्मार्टफोन वर काम सुरु केले आहे आणि लवकरच हा भारतीय बाजारात येईल. तर आज आम्हाला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे कि iQOO ब्रँडचा हा पहिला स्मार्टफोन येत्या 25 फेब्रुवारीला भारतात लॉन्च केला जाईल.

iQOO ने आतापर्यंत आपल्या स्मार्टफोन लॉन्चची माहिती दिली नाही पण 91मोबाईल्सला इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे कि आईक्यू येत्या 25 फेब्रुवारीला भारतात एका ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून नवीन ब्रँड iQOO चा पहिला स्मार्टफोन भारतीय बाजारात येईल. आईक्यू च्या डायरेक्टरनी सांगितले होते कि कंपनी भारतात आपला 5जी फोन घेऊन येणार आहे आणि यह मोबाईल क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट सह येईल. त्यामुळे आशा आहे कि 25 फेब्रुवारीला लॉच होणारा iQOO चा आगामी स्मार्टफोन एक 5G फोन असेल.

आईक्यू च्या या आगामी स्मार्टफोनच्या नावाची ठोस माहिती मिळाली नाही पण लीक्सनुसार ब्रँडच्या या नवीन स्मार्टफोनला iQOO 3 नावासह बाजारात येऊ शकतो. काही दिवसांपूर्वी या फोनचा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला होता ज्यात iQOO 3 च्या डिजाईनची माहिती मिळाली होती. आता हा स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण लिस्ट झाला आहे. टेना लिस्टिंग मध्ये कथित iQOO 3 चे स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

iQOO च्या आगामी स्मार्टफोन टेना वर V1955A मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. सर्टिफिकेशन्स साइट वर फोनच्या नावाची माहिती मिळाली नाही पण बोलले जात आहे कि हा डिवाईस आईक्यू 3 असू शकतो. अशी माहिती समोर आली आहे कि हा डिवाईस 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. लीक नुसार iQOO 3 मध्ये 20:9 चा आस्पेक्ट रेशियो मिळेल आणि या फोनचा डिस्प्ले 60हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येईल.

टेना वर V1955A म्हणजे iQOO 3 चे डायमेंशन 158.51 x 74.88 x 9.16एमएम आणि वजन 214.5 ग्राम सांगण्यात आले आहे. आईक्यू 3 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे जो 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालेल. लीकनुसार iQOO 3 तीन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 12 जीबी रॅम, 8 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम मिळेल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन बाजारात 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज वर सेल साठी उपलब्ध होऊ शकतो.

iQOO 3 एंडरॉयडच्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 10 वर लॉन्च होईल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,410एमएएच ची बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे ज्या सोबत फोन मध्ये 55वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. लीक झालेल्या आईक्यू 3 च्या फोटो वरून समजले होते कि हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. बोलले जात आहे कि या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल जो Sony IMX686 किंवा Samsung GW1 सेंसर असेल.

तसेच iQOO 3 मध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलच्या दोन इतर कॅमेरा सेंसर्सची माहिती पण समोर आली आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. iQOO च्या या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि liquid कूलिंग टेक्नोलॉजी दिली जाईल ज्याची माहिती कंपनीने टीजर मध्ये पण दिली आहे. तरीही फोनची लॉन्च डेट आणि ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी 25 फेब्रुवारीची वाट बघावी लागेल.

The post Exclusive : 25 फेब्रुवारीला लॉन्च होईल भारतातील पहिला 5G स्मार्टफोन, हा ब्रँड करेल कमाल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/india-first-5g-phone-iqoo-3-launching-in-india-on-25-february-qualcomm-snapdragon-865/feed/ 0