Electric Scooter - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 13:00:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 100KM च्या रेंजसह लाँच झाली जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त Rs 2,999 मध्ये करा बुक https://www.91mobiles.com/marathi/100km-range-electric-scooter-gemopai-ryder-supermax-launch-price-photos/ https://www.91mobiles.com/marathi/100km-range-electric-scooter-gemopai-ryder-supermax-launch-price-photos/#respond Wed, 01 Mar 2023 06:28:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18275 भारतातील ईव्ही स्टार्टअप कंपनी Gemopai नं आज भारतीय ईव्ही मार्केटमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. कंपनीनं लाँच केलेली ई-स्कूटर Gemopai Ryder SuperMax electric scooter नावानं बाजारात आली आहे. हिची खासियत पाहता या स्कूटरमध्ये BLDC हब मोटर आहे जी 2.7 KW ची ताकद देते. यात 60kmph चा टॉप स्पीड आणि एकदा फुल चार्ज केल्यावर […]

The post 100KM च्या रेंजसह लाँच झाली जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त Rs 2,999 मध्ये करा बुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Gemopai Ryder SuperMax electric scooter भारतात लाँच झाला आहे.
  • या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत एक्स-शोरूम Rs 79,999 आहे.
  • Rs 2,999 मध्ये ई-स्कूटर Gemopai website वरून बुक करता येईल.

भारतातील ईव्ही स्टार्टअप कंपनी Gemopai नं आज भारतीय ईव्ही मार्केटमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. कंपनीनं लाँच केलेली ई-स्कूटर Gemopai Ryder SuperMax electric scooter नावानं बाजारात आली आहे. हिची खासियत पाहता या स्कूटरमध्ये BLDC हब मोटर आहे जी 2.7 KW ची ताकद देते. यात 60kmph चा टॉप स्पीड आणि एकदा फुल चार्ज केल्यावर 100 किलोमीटर पर्यंतची ड्राईव्हिंग रेंज मिळते. पुढे आम्ही तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटरची संपूर्ण माहिती दिली आहे.

Ryder SuperMax Electric Scooter Price

या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरला कंपनीनं 79,999 रुपयांच्या इंट्रोडक्टरी प्राइस (एक्स-शोरूम प्राइस) वर सादर केला आहे. तसेच, तुम्ही ई-स्कूटर कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर फक्त 2,999 रुपये देऊन बुक करू शकता. स्कूटरची विक्री कंपनीच्या शोरूमवर 10 मार्च 2023 पासून सुरु होईल. हे देखील वाचा: 5 मिनिटांत बॅटरी झाली फुल! 300W Fast Charging टेक्नॉलॉजीसह Redmi नं रचला इतिहास

Ryder SuperMax Electric Scooter Battery आणि अ‍ॅप

Ryder SuperMax मध्ये 1.8kW पोर्टेबल बॅटरी पॅक आणि चार्जर दिला आहे. हे दोन्ही AIS-156 ला अनुसरून आहेत. तसेच स्कूटरमध्ये ब्रँडचं अ‍ॅप Gemopai Connect च्या माध्यमातून अ‍ॅप कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे, जी रायडरला स्कूटरशी जोडून ठेवते आणि स्कूटर, याची बॅटरी, स्पीड अलर्ट, सर्व्हिस रिमाइंडर्स आणि अन्य गोष्टींचे रियल-टाइम मॉनिटरिंग आणि अपडेट मिळतात. हे देखील वाचा: वनप्लसला टक्कर देण्यासाठी येणार Nothing Phone 2; फोनमधील प्रोसेसरची मिळाली माहिती

रेंज आणि टॉप स्पीड

स्कूटरसह तुम्ही लोकांना 60kmph चा टॉप स्पीड आणि एकदा फुल चार्ज केल्यावर 100 किलोमीटर पर्यंतची ड्राईव्हिंग रेंज दिली जाते. तसेच रायडर सुपरमॅक्स 6 कलर ऑप्शन- जॅजी नियॉन, इलेक्ट्रिक ब्लू, ब्लेजिंग रेड, स्पार्कलिंग व्हाइट, ग्रॅफाइट ग्रे आणि फ्लोरेसेंट येलो मध्ये उपलब्ध झाली आहे. रायडर सुपरमॅक्स 10 मार्चपासून देशातील सर्व जेमोपाई शोरूममध्ये उपलब्ध होईल आणि ग्राहक स्कूटर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन देखील बुक करू शकतात.

The post 100KM च्या रेंजसह लाँच झाली जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त Rs 2,999 मध्ये करा बुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/100km-range-electric-scooter-gemopai-ryder-supermax-launch-price-photos/feed/ 0
Yulu Bajaj नं लाँच केल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर Miracle GR आणि DeX GR, पाहा माहिती https://www.91mobiles.com/marathi/yulu-bajaj-electric-scooters-launch-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/yulu-bajaj-electric-scooters-launch-price-sale/#respond Tue, 28 Feb 2023 09:40:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18242 बजाज ऑटो (Bajaj Auto) आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप युलु (Yulu) नं एकत्र येऊन दोन बॅटरी असेलल्या स्कूटर सादर केल्या आहेत. कंपनीनं सादर केलेली इलेक्ट्रिक दुचाकी वाहने मिरॅकल जीआर (Miracle GR) आणि डीएक्स जीआर (DeX GR) या नावानं बाजारात येतील. Yulu च्या AI-नेतृत्वाखालील तंत्रज्ञान स्टॅकद्वारे सपोर्टेड आणि Bajaj Auto द्वारे निर्मित, Miracle GR आणि DeX GR […]

The post Yulu Bajaj नं लाँच केल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर Miracle GR आणि DeX GR, पाहा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • बजाज ऑटो आणि Yulu नं मिळून दोन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या आहेत.
  • इलेक्ट्रिक स्कूटरला Miracle GR आणि DeX GR अशी नावे देण्यात आली आहेत.
  • युलु देशात एक लाख वाहने उतरवण्याची तयारी करत आहे.

बजाज ऑटो (Bajaj Auto) आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप युलु (Yulu) नं एकत्र येऊन दोन बॅटरी असेलल्या स्कूटर सादर केल्या आहेत. कंपनीनं सादर केलेली इलेक्ट्रिक दुचाकी वाहने मिरॅकल जीआर (Miracle GR) आणि डीएक्स जीआर (DeX GR) या नावानं बाजारात येतील.

Yulu च्या AI-नेतृत्वाखालील तंत्रज्ञान स्टॅकद्वारे सपोर्टेड आणि Bajaj Auto द्वारे निर्मित, Miracle GR आणि DeX GR या इलेक्ट्रिक स्कूटर्स जगासाठी भारतात बनवण्यात आल्या आहेत आणि चेतक टेक्नॉलॉजी (बजाज ऑटोच्या मालकीची उपकंपनी) द्वारे बाजारात आणल्या जात आहेत.

Yulu Bajaj Electric Scooter

असं सांगण्यात आलं आहे की सादर करण्यात आलेल्या नवीन ई-स्कूटरची मॅन्युफॅक्चरिंग खासकरून बजाज ऑटो करेल. युलुनं म्हटलं आहे की बजाज ऑटोच्या मालकीच्या उपकंपनी बजाज चेतक टेक्नॉलॉजी लिमिटेडद्वारे सादर केल्या गेलेल्या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर युलुच्या टेक्नॉलॉजीवर चालतील.

विशेष म्हणजे बजाजची आधीपासून युलूमध्ये भागीदारी आहे, तसेच कंपनी स्वतःच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटर देखील बाजारात विकते. आता बजाज ऑटोने युलूच्या दुसऱ्या पिढीतील ई-स्कूटर्स आणि काही घटकांचे लोकलायजेशन आणि अपग्रेड करण्यात मदत केली. हे देखील वाचा: 2GB डेली डेटा देणारे BSNL चे दोन नवीन प्लॅन लाँच; Airtel-Jio पेक्षा शानदार बेनिफिट्स

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या नवीन थर्ड-जनरेशन ई-बाईक फुल प्रूफ, फॉल प्रूफ आहेत आणि OTA सपोर्ट देतील. युलू कंपनीचा दावा आहे की, या नवीन ई-बाईक ट्रॅक करता येतात आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही वापरासाठी उत्तम आहेत.

Miracle GR आणि DeX GR च्या किंमत आणि सेलची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तुमच्या माहितीसाठी, युलु रेंटल सर्व्हिस ई-स्कूटर सादर करते. युलुचा ताफा स्वॅपेबल बॅटरीवर चालतो आणि युमा एनर्जीद्वारे संचालित आहे, ज्याचे बेंगळूर, मुंबई आणि दिल्लीमध्ये जवळपास 100 स्टेशन आहेत. कंपनीची योजना 2024 पर्यंत या स्टेशन्सची संख्या 500 करण्याची आहे. हे देखील वाचा: डीएसएलआर सारखा कॅमेरा असलेल्या Xiaomi 13 Pro च्या भारतीय किंमतीचा खुलासा; आयफोनला टाकणार मागे?

लवकरच येतील 1 लाख टू-व्हीलर

मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी देशातील प्रमुख शहरांमध्ये 1,00,000 टू-व्हीलर सादर करण्यासाठी तयार आहे. कंपनीचं लक्ष्य वर्षअखेर महसुलात 10 पट वाढ करणं आहे. स्थानिक पार्ट्स आणि असेंबली व्यतिरिक्त चांगल्या प्रोडक्शन क्वॉलिटीच्या माध्यमातून कंपनी हे लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.

The post Yulu Bajaj नं लाँच केल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर Miracle GR आणि DeX GR, पाहा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/yulu-bajaj-electric-scooters-launch-price-sale/feed/ 0
120 km रेंजसह हाय-स्पीड River Indie इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, इतकी आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/river-electric-launched-indie-electric-scooter-with-120km-range/ https://www.91mobiles.com/marathi/river-electric-launched-indie-electric-scooter-with-120km-range/#respond Fri, 24 Feb 2023 05:33:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18106 रिव्हर इलेक्ट्रिक (River Electric) नं भारतात आपली इंडी इलेक्ट्रिक स्कूटर (Indie electric scooter) 120Km रेंजसह सादर केली आहे, जिची किंमत 1.25 लाख (एक्स-शोरूम, बेंगळूर) आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची डिजाइन थोडदी वेगळी आहे, त्यामुळे हिच्याकडे सहज नजर वळते. ईव्ही स्टार्टअपनं असं देखील म्हटलं आहे की स्कूटरसाठी बुकिंग आधीपासून खुली करण्यात आली आहे. तसेच, स्टार्टअपला 2025 पर्यंत […]

The post 120 km रेंजसह हाय-स्पीड River Indie इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हाय-स्पीड River Indie इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 120 km आहे
  • इंडी इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.25 लाख (एक्स-शोरूम, बेंगळूर) आहे.
  • River Indie मध्ये IP67-रेटेड 4 kWh बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे.

रिव्हर इलेक्ट्रिक (River Electric) नं भारतात आपली इंडी इलेक्ट्रिक स्कूटर (Indie electric scooter) 120Km रेंजसह सादर केली आहे, जिची किंमत 1.25 लाख (एक्स-शोरूम, बेंगळूर) आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची डिजाइन थोडदी वेगळी आहे, त्यामुळे हिच्याकडे सहज नजर वळते. ईव्ही स्टार्टअपनं असं देखील म्हटलं आहे की स्कूटरसाठी बुकिंग आधीपासून खुली करण्यात आली आहे. तसेच, स्टार्टअपला 2025 पर्यंत या नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरचे एक लाख यूनिट विकले जातील अशी अपेक्षा आहे.

River Indie इलेक्ट्रिक स्कूटरची डिजाइन

River Indie इलेक्ट्रिक स्कूटरची डिजाइन पाहता, हिची फ्रंट डिजाइन बाजारातील अन्य मॉडेलपेक्षा खूप वेगळी आहे. यात इंटीग्रेटेड एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह ड्युअल फ्रंट एलईडी हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. यात पूर्णपणे डिजिटल सहा इंचाचा कलर इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 20 इंचाचा मोठा फुटबोर्ड आणि एलईडी टेललाइट्स देखील आहेत. ही 14 इंचाच्या ब्लॅक अलॉय चाकांवर चालते. फ्रंट व्हीलमध्ये 240 मिमी डिस्क ब्रेक मिळतो, तर मागे 200 मिमी डिस्क आहे. सस्पेंशनसाठी स्कूटरमध्ये फ्रंटला टेलिस्कोपिक सेटअप आणि मागे ट्विन हाइड्रॉलिक सिस्टम मिळते. हे देखील वाचा: Realme Mobile मध्ये मिळणार iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले! माधव सेठ यांनी चुकून केलं ट्वीट

River Indie मध्ये 43 लीटर बूट स्पेस

विशेष म्हणजे स्कूटरमधील सीटची उंची 770 मिमी आणि 14 इंचाच्या चाकांमुळे ही यामाहा एरोक्स (Yamaha Aerox) आणि एप्रिलिया SR160 (Aprilia SR160) सारखी वाटते. ही 18 डिग्री ग्रेडेबिलिटीसह येते, जी ओला एस1 प्रो पेक्षाही जास्त आहे. ही 15 डिग्री उतारावर देखील चालू शकते. रिव्हर इंडीमध्ये 43-लीटर अंडर-सीट बूट स्पेससह 12 लीटर ग्लोव बॉक्स आहे. यात अ‍ॅक्सेसेरीज देखील मिळतात, ज्या सहज माउंट करता येतात. यात दोन्ही बाजूंना पॅनियर माउंट आणि बॅग हुकचा समावेश आहे. स्कूटरमध्ये पार्क असिस्ट, ड्युअल USB पोर्ट इत्यादी आहेत. हे देखील वाचा: OnePlus Nord 3 ची वाट पाहत असाल तर नक्की वाचा; स्पेसिफिकेशन्स आणि लाँचची माहिती लीक

पावरट्रेन पाहता, River Indie मध्ये IP67-रेटेड 4 kWh बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे, जो 6.7 kWh च्या इलेक्ट्रिक मोटरला पावर देतो, जी 26Nm चा टार्क देते. बेल्ट ड्राईव्हच्या माध्यमातून मागच्या चाकांना पावर पाठवली जाते. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 90km आहे. ही फक्त 3.9 सेकंदात ताशी 0-40 km चा वेग गाठू शकते. स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 120km ची रेंज देते, असा दावा करण्यात आला आहे. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरवर 5 वर्ष/50,000 किलोमीटर वॉरंटीसह येते.

The post 120 km रेंजसह हाय-स्पीड River Indie इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/river-electric-launched-indie-electric-scooter-with-120km-range/feed/ 0
Okaya Faast F2F इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/okaya-faast-f2f-launch-in-india-price-range-colours-images-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/okaya-faast-f2f-launch-in-india-price-range-colours-images-and-specifications/#respond Wed, 22 Feb 2023 04:17:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18033 ओकायानं भारतीय बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही नवीन ई-स्कूटर कंपनीनं आपल्या Faast सीरीजमध्ये सादर केला आहे. जिला Okaya Faast F2F असं नाव देण्यात आलं आहे. ही एक किफायतशीर बॅटरी असलेली स्कूटर आहे जी शानदार रेंज आणि दमदार बॅटरीसह मार्केटमध्ये आली आहे. तसेच, कंपनीनं Faast F2F मध्ये अनेक आधुनिक फीचर्स देखील दिले […]

The post Okaya Faast F2F इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • या ई-स्कूटरची किंमत Rs 83,999 (ex-showroom) आहे.
  • Okaya Faast F2F मध्ये 70–80 km ची रेंज मिळेल.
  • F2F मध्ये 800W-BLDC-Hub Motor देण्यात आली आहे.

ओकायानं भारतीय बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही नवीन ई-स्कूटर कंपनीनं आपल्या Faast सीरीजमध्ये सादर केला आहे. जिला Okaya Faast F2F असं नाव देण्यात आलं आहे. ही एक किफायतशीर बॅटरी असलेली स्कूटर आहे जी शानदार रेंज आणि दमदार बॅटरीसह मार्केटमध्ये आली आहे. तसेच, कंपनीनं Faast F2F मध्ये अनेक आधुनिक फीचर्स देखील दिले आहेत. तसेच कंपनीनं हिचा लूक देखील आकर्षक ठेवला आहे. भारतीय बाजारात ओकाया फास्ट F2F 6 वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध होईल.

Okaya Faast F2F ची किंमत

देशातील प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Okaya नं आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Okaya Faast F2F लाँच केली आहे. ही ई-स्कूटर कंपनीनं Rs 83,999 (ex-showroom) मध्ये सादर केली आहे. मेटॅलिक ब्लॅक, मेटॅलिक सियान, मॅट ग्रीन, मेटॅलिक ग्रे, मेटॅलिक सिल्व्हर आणि मेटॅलिक व्हाईट असे 6 कलर ऑप्शन उपलब्ध होतील. हे देखील वाचा: PAN कार्डवरचा फोटो चांगला नाही? अशाप्रकारे घरबसल्या बदला फोटो आणि सही

Okaya Faast F2F ची खासियत

ओकाया फास्ट एफ2एफ मध्ये कंपनीनं टेलीस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि स्प्रिंग लोडेड हाइड्रोलिक रियर शॉक अब्जॉर्बर सस्पेंशन दिले आहेत. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रिमोट की (Key) आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर मिळतो, ज्यात सर्व आवश्यक माहिती दिसते. तसेच यात स्टाइलिश डीआरएल हेड-लॅम्प आणि एजी टेल-लॅम्पचा समावेश आहे.

दमदार मोटर आणि शानदार बॅटरी

ओकाया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं 800W-BLDC-हब मोटर दिली आहे, जी 60V36Ah (2.2 kWh) लिथियम आयन – LFP बॅटरीसह जोडण्यात आली आहे. तसेच, बॅटरीवर 2 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी हाई सेफ्टी स्टँडर्ड फॉलो करते. तसेच ही किफायतशीर ई-स्कूटर विद्यार्थी आणि तरुण प्रोफेशनल्सचा विचार करून बनवण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं 60V क्षमता असलेली 36Ah (2.2 kWh) लिथियम आयन- LFP बॅटरी दिली आहे जी दीर्घकाळ चालेल. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी दीर्घायुषी आणि हाय टेंप्रेचरवर काम करणारी आहे. तसेच बॅटरीवर 2 वर्ष / 20,000 किलोमीटरची वॉरंटी मिळेल. हे देखील वाचा: Xiaomi 13 आणि 13 Pro ची किंमत लीक! 26 फेब्रुवारीला होणार भारतात लाँच

रेंज आणि टॉप स्पीड

Faast F2F इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 55 किमी आहे. तसेच यात 10 इंचाचे ट्यूबलेस टायर, टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक शॉक अब्जॉर्बर देखील देण्यात आले आहेत, जे खडे असलेल्या रस्त्यावर देखील आरामदायक प्रवासाचा आनंद देतात. स्कूटर 4-5 तासांमध्ये फुल चार्ज करून 70-80KM चालवता येते.

The post Okaya Faast F2F इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/okaya-faast-f2f-launch-in-india-price-range-colours-images-and-specifications/feed/ 0
अत्यंत कमी किंमतीत आली 120km ची रेंज असलेली स्वस्त ई-स्कूटर; दिसतेही झक्कास https://www.91mobiles.com/marathi/ampere-zeal-ex-electric-scooter-on-road-price-in-india-range-colours-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/ampere-zeal-ex-electric-scooter-on-road-price-in-india-range-colours-specifications/#respond Tue, 21 Feb 2023 09:57:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18016 इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी Ampere नं आपली आपला लेटेस्ट Zeal EX इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली आहे. या मॉडेलची खासियत म्हणजे कंपनीची ही स्कूटर कमी किंमतीत जास्त रेंज देते. इतकेच नव्हे तर Ampere Zeal EX ला कंपनीनं खूप स्टाइलिश बनवलं आहे. यात तुम्हाला स्पोर्टी लुक मिळेल जो तरुणवर्गाला खूप आवडतो. तसेच, स्कूटरमध्ये अनेक खास […]

The post अत्यंत कमी किंमतीत आली 120km ची रेंज असलेली स्वस्त ई-स्कूटर; दिसतेही झक्कास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Ampere Zeal EX], electric scooter कंपनीनं स्पोर्टी लुकमध्ये सादर केली आहे.
  • हिची किंमत Rs 69,900 (ex-showroom) ठेवण्यात आली आहे.
  • e-scooter सिंगल चार्जमध्ये 120km ची रेंज देऊ शकते.

इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी Ampere नं आपली आपला लेटेस्ट Zeal EX इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली आहे. या मॉडेलची खासियत म्हणजे कंपनीची ही स्कूटर कमी किंमतीत जास्त रेंज देते. इतकेच नव्हे तर Ampere Zeal EX ला कंपनीनं खूप स्टाइलिश बनवलं आहे. यात तुम्हाला स्पोर्टी लुक मिळेल जो तरुणवर्गाला खूप आवडतो. तसेच, स्कूटरमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे ग्राहक रोजच्या प्रवासातही हीचा सहज वापर करू शकतील.

Ampere Zeal EX price

जेव्हा मोठी राइड घेण्याची वेळ येते तेव्हा नवीन अँपियर झील ईएक्स चांगला पर्याय ठरू शकते कारण ही एकदा चार्ज केल्यावर 120 किमीची रेंज देते. ही ई-स्कूटर मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये 69,900 रुपये (एक्स-शोरूम) च्या किंमतीत सादर करण्यात आली आहे. तर भारतातील अन्य शहरांमध्ये हिची प्राइस 75,000 रुपये (एक्स-शोरूम) असेल. तासेक्स मूळ कंपनी ग्रीव्स मोबिलिटीनं देखील 31 मार्च, 2023 पूर्वी Zeal EX च्या खरेदीवर 6,000 रुपयांचे अतिरिक्त बेनिफिट्स देण्याची घोषणा केली आहे. हे देखील वाचा: या स्मार्टफोनच्या किंमतीवर जाऊ नका! 6GB RAM, 5,000mAh बॅटरीसह POCO C55 भारतात लाँच

Ampere Zeal EX चे specifications आणि features

परफॉर्मन्स पाहता Ampere Zeal EX मध्ये 1.8kW ची पीक पावर असलेली मोटर देण्यात आली आहे, जी तुम्हाला ताशी 50-55 किमीचा टॉप स्पीड देते. यात तुम्हाला 120 किमीची रेंज देण्यासाठीसाठी 60V, 2.3 KWh ची लिथियम बॅटरी देण्यात आली आहे.

तसेच Ampere Zeal EX मध्ये ड्रम ब्रेक, फ्रंट (टेलिस्कोपिक) आणि रियर (ट्विन ट्यूब) सस्पेंशन देण्यात आले आहेत. तसेच ही स्कूटर 150 किलोग्रामचा लोड वाहून नेऊ शकते. चार्जर पाहता, अँपियरमध्ये 60V, 7.5A Li चा बंडल आहे जो ई-स्कूटरला 5 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज करेल. ग्रीव्स इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या अँपियर व्हेईकल्स इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी, चार्जर, मोटर, कंट्रोलर आणि कन्वर्टरवर 3 वर्षांची वॉरंटी देत आहे. हे देखील वाचा: फक्त 7999 मध्ये आयफोनची मजा! भारतीय स्मार्टफोन Lava Yuva 2 Pro अधिकृतपणे लाँच

विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात अँपियरनं भारतीय बाजारात आपली प्राइमस इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली होती. ही स्कूटर 107km रेंज, 77kmph चा टॉप स्पीड आणि अनेक टू-टोन कलर ऑप्शनसह बाजारात आली आहे. जिची किंमत 1.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

The post अत्यंत कमी किंमतीत आली 120km ची रेंज असलेली स्वस्त ई-स्कूटर; दिसतेही झक्कास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ampere-zeal-ex-electric-scooter-on-road-price-in-india-range-colours-specifications/feed/ 0
108Km रेंज सह येऊ शकते 2023 Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटर; डॉक्युमेंट्समधून खुलासा https://www.91mobiles.com/marathi/2023-bajaj-chetak-electric-scooter-launch-soon-india-with-108-km-range/ https://www.91mobiles.com/marathi/2023-bajaj-chetak-electric-scooter-launch-soon-india-with-108-km-range/#respond Thu, 16 Feb 2023 05:24:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17860 Electric Scooter ची वाढती मागणी पाहून असं वाटतंय की आगामी काळात भारतीय बाजारात बॅटरी असलेल्या स्कूटर्सचा वापर जास्त होईल. यामुळे नवीन व जुन्या ऑटो कंपन्या आपापल्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स सादर करत आहेत. आता समोर आलेल्या माहितीनुसार बजाज आपली विजेवर चालणारी Chetak नवीन अवतारात सादर करण्याची योजना बनवत आहे. 2023 Bajaj Chetak Electric Scooter यावेळी जास्त रेंज […]

The post 108Km रेंज सह येऊ शकते 2023 Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटर; डॉक्युमेंट्समधून खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • 2023 बजाज चेतक लवकरच भारतीय बाजारात लाँच होऊ शकते.
  • अपग्रेडेड Chetak इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 108KM ची रेंज मिळू शकते.
  • नवीन स्कूटरचा बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटार आधीसारखीच असेल.

Electric Scooter ची वाढती मागणी पाहून असं वाटतंय की आगामी काळात भारतीय बाजारात बॅटरी असलेल्या स्कूटर्सचा वापर जास्त होईल. यामुळे नवीन व जुन्या ऑटो कंपन्या आपापल्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स सादर करत आहेत. आता समोर आलेल्या माहितीनुसार बजाज आपली विजेवर चालणारी Chetak नवीन अवतारात सादर करण्याची योजना बनवत आहे. 2023 Bajaj Chetak Electric Scooter यावेळी जास्त रेंज आणि पावरसह सादर केली जाऊ शकते. ही माहिती इलेक्ट्रिक स्कूटरच्या अपडेटेड मॉडेलचे अप्रूवल डॉक्यूमेंट लीक झाल्यामुळे समोर आली आहे.

इतकी असेल 2023 Bajaj Chetak ची रेंज

Rushlane नं Bajaj च्या नवीन Chetak इलेक्ट्रिक स्कूटरसाठी टाइप अप्रूवलचा फोटो जारी केला आहे. जारी करण्यात आलेल्या या डॉक्यूमेंटमधून माहिती समोर आली आहे की यंदा येत असलेल्या अपडेटेड मॉडेलमध्ये जुन्या Chetak इलेक्ट्रिकपेक्षा 18KM जास्त रेंज मिळेल. सध्या बाजारात असलेली Bajaj Chetak ई-स्कूटर को सिंगल चार्जवर 90 Km पर्यंत चालवता येऊ शकते. म्हणजे आगामी ई-स्कूटरमध्ये 108KM ची रेंज मिळू शकते. परंतु यातील बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटारची क्षमता आधीसारखीच राहू शकते. हे देखील वाचा: फक्त 8 मिनिटांत बॅटरी फुल! 240W चार्जिंगसह Realme GT3 ‘या’ तारखेला येतोय भारतात

लीक डॉक्यूमेंटमध्ये ई-स्कूटर Bajaj Chetak 2413 Premium कोडनेमसह लिस्ट करण्यात आली आहे. यात देण्यात आलेली माहिती पाहता हा मॉडेल जुन्या प्रमाणे 50.4 V 57.24 Ah क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येऊ शकते. तसेच या बॅटरीचे वजन 24.5 किलोग्राम असू शकते आणि हिची मॅक्सिमम फुल चार्ज रेंज 108 km असू शकते.

इतकेच नव्हे तर नवीन बजाज चेतकचे डायमेंशन देखील जुन्या मॉडेल प्रमाणे असू शकतात. असे दिसतं आहे की डिजाइनमध्ये देखील जास्त बदल दिसणार नाहीत. नवीन मॉडेलमध्ये जुन्या मॉडेलप्रमाणे मेटॅलिक बॉडी, IP67-रेटेड बॅटरी, ट्यूबलेस टायर्स, 18L बूट स्पेस, 4L ग्लव बॉक्स सारखे फीचर्स मिळू शकतात. आशा आहे की Bajaj आगामी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सॉफ्टवेयरमध्ये काही मोठे बदल दिसू शकतात.

2023 Bajaj Chetak मार्केटमधील Ather 450 सीरीज, Ola S1 सीरीज आणि Hero Vida सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर्सना टक्कर देऊ शकते ज्या मोठी रेंज आणि अनेक शानदार फीचर्ससह आल्या आहेत.हे देखील वाचा: अत्यंत स्वस्तात लाँच होईल Samsung Galaxy A24 फोन; Realme ला टक्कर देण्याची प्लॅनिंग

The post 108Km रेंज सह येऊ शकते 2023 Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटर; डॉक्युमेंट्समधून खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/2023-bajaj-chetak-electric-scooter-launch-soon-india-with-108-km-range/feed/ 0
या इलेक्ट्रिक स्कूटर्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; अशी संधी पुन्हा नाही https://www.91mobiles.com/marathi/okinawa-announced-discounts-on-select-electric-scooter-models/ https://www.91mobiles.com/marathi/okinawa-announced-discounts-on-select-electric-scooter-models/#respond Tue, 14 Feb 2023 07:31:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17790 जर तुम्ही Valentine’s Day वर तुमच्या पार्टनरला शानदार गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर एक इलेक्ट्रिक स्कूटर गिफ्ट करू शकता. सध्या ई-स्कूटरला जोरदार मागणी आहे आणि त्यामुळे पेट्रोलचा खर्च देखील होत नाही. ओकिनावा ऑटोटेकनं व्हॅलेंटाइन-डे ऑफर अंतगर्त इलेक्ट्रिक स्कूटरच्या काही मॉडेल्सवर स्पेशल डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये स्कूटर्सवर 12,500 रुपयांपर्यंतची सूट देण्याची घोषणा […]

The post या इलेक्ट्रिक स्कूटर्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; अशी संधी पुन्हा नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरच्या काही मॉडेल्सवर स्पेशल ऑफर मिळत आहे.
  • या ऑफरमध्ये स्कूटर्सवर 12,500 रुपये पर्यंतची सूट दिली जात आहे.
  • ही ऑफर फक्त 15 फेब्रुवारी पर्यंत वैध असेल.

जर तुम्ही Valentine’s Day वर तुमच्या पार्टनरला शानदार गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर एक इलेक्ट्रिक स्कूटर गिफ्ट करू शकता. सध्या ई-स्कूटरला जोरदार मागणी आहे आणि त्यामुळे पेट्रोलचा खर्च देखील होत नाही. ओकिनावा ऑटोटेकनं व्हॅलेंटाइन-डे ऑफर अंतगर्त इलेक्ट्रिक स्कूटरच्या काही मॉडेल्सवर स्पेशल डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये स्कूटर्सवर 12,500 रुपयांपर्यंतची सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीनं म्हटलं आहे की ही ऑफर फक्त 15 फेब्रुवारी पर्यंत वैध असेल.

या स्कूटर्सवर मिळतोय डिस्काउंट

भारतात दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी ओकिनावानं घोषणा केली आहे की स्पेशल व्हॅलेंटाइन डे डिस्काउंट ऑफर अंतगर्त ग्राहक iPraise+, PraisePro आणि Ridge+ सारखे हाय-स्पीड मॉडेल आणि R30 आणि लाइट सारखे लो-स्पीड स्कूटर्स ऑफरमध्ये विकत घेऊ शकतील.

ओकिनावा ई-स्कूटर्सची प्राइस

ओकिनावा प्राइस प्रोची प्रारंभिक किंमत 99,645 रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. कंपनीनुसार, ही स्कूटर सिंगल चार्जवर 88 किलोमीटरची रेंज देते तसेच ताशी 58 किलोमीटरचा टॉप स्पीड मिळतो.

Okinawa iPraise+: ओकिनावा आयप्रेज प्लसची दिल्लीमध्ये एक्स शोरूम किंमत 1.46 लाख रुपये आहे. या स्कूटरची रायडिंग रेंज 139 किलोमीटर आहे तर ताशी 58 किलोमीटरचा टॉप स्पीड मिळतो.

Okinawa R30: ओकिनावा आर30 ची किंमत 61,998 रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. कंपनीच्या दाव्यानुसार सिंगल चार्जवर ही स्कूटर 60 किलोमीटरची रेंज देते, जोडीला ताशी 25 किलोमीटरचा टॉप स्पीड मिळतो.

Okinawa Ridge+: ओकिनावा रिज प्लसची प्रारंभिक किंमत 76,285 रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. ही स्कूटर फुल चार्ज केल्यावर 84 किलोमीटरची रेंज मिळते आणि या रेंजसह ताशी टॉप स्पीड मिळतो.

Okinawa Lite: ओकिनावा लाइट स्कूटर 66,993 रुपयांची प्रारंभिक किंमतीसह दिल्लीमधून विकत घेता येईल. या स्कूटरची सिंगल चार्ज रेंज 60 किलोमीटर आहे जी ताशी 25 किलोमीटर टॉप स्पीड देते.

एक्सटेंडेड वॉरंटी प्रोग्राम

तसेच ओकीनावा ऑटोटेकनं किफायतशीर किंमतीत आपला एक्सटेंडेड वॉरंटी प्रोग्राम लाँच केला आहे, ज्यात कमीत कमी 2287 रुपये पासून 5494 रुपयेपर्यंतच्या ऑफर दिल्या जात आहे. ओकिनावाकडून मिळणारी एक्सटेंडेड वॉरंटी 2 वर्षांपर्यंत लागू केली जाईल. स्कूटरच्या मॉडेलची रेंजनुसार वेगवेगळे स्लॅब सादर केले आहेत. ग्राहक आपल्या मॉडेल नुसारवॉरंटीचा लाभ घेऊ शकतील. तसेच ही वॉरंटी नवीन ग्राहकांसह त्या सर्व ग्राहकांसाठी वैध असेल ज्यांनी गेल्या 3 वर्षांत ओकिनावाचे वाहन घेतले आहे.

The post या इलेक्ट्रिक स्कूटर्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; अशी संधी पुन्हा नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/okinawa-announced-discounts-on-select-electric-scooter-models/feed/ 0
75KM रेंज सह लाँच झाली Odysse Trot इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत आहे परवडणारी https://www.91mobiles.com/marathi/odysse-trot-electric-scooter-launch-in-india-range-75km-price-under-rs-1-lakh/ https://www.91mobiles.com/marathi/odysse-trot-electric-scooter-launch-in-india-range-75km-price-under-rs-1-lakh/#respond Wed, 08 Feb 2023 05:46:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17596 Odysse Electric नं भारतात आपली नवीन बॅटरी असलेली स्कूटर सादर केली आहे. ही ई-स्कूटर कंपनीनं Odysse Trot नावानं B2B मार्केटसाठी सादर केली आहे. बी2बी इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटचा अर्थ असा की हे वाहन सामानाच्या डिलिव्हरी सारख्या व्यवसायिक कामांसाठी वापरलं जाऊ शकतं. तसेच खास फीचर्स पाहता यात 25 kmph चा टॉप स्पीड आणि 75 किमीची रेंज देण्यात […]

The post 75KM रेंज सह लाँच झाली Odysse Trot इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत आहे परवडणारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत एक्स शोरूम 99,999 रुपये आहे.
  • Odysse Trot एक B2B इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
  • Odysse Trot चा टॉप स्पीड 25 kmph आहे.

Odysse Electric नं भारतात आपली नवीन बॅटरी असलेली स्कूटर सादर केली आहे. ही ई-स्कूटर कंपनीनं Odysse Trot नावानं B2B मार्केटसाठी सादर केली आहे. बी2बी इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटचा अर्थ असा की हे वाहन सामानाच्या डिलिव्हरी सारख्या व्यवसायिक कामांसाठी वापरलं जाऊ शकतं. तसेच खास फीचर्स पाहता यात 25 kmph चा टॉप स्पीड आणि 75 किमीची रेंज देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Odysse च्या या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि इतर फीचर्सची सविस्तर माहिती.

Odysse Trot ची किंमत

B2B मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आलेल्या TROT ची किंमत पाहता, कंपनीनं ही 99,999 रुपयांमध्ये (एक्स शोरूम) सादर केली आहे. तसेच, ग्राहक ही स्कूटर फक्त 2,000 रुपयांमध्ये कंपनीच्या साइटवरून बुक करू शकतात. हे देखील वाचा: Suzuki भारतात सादर करणार Electric Scooter; जाणून घ्या कधी येईल तुमच्या हातात

बॅटरीवर 3 वर्षांची वॉरंटी

कंपनीनुसार Odysse इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीवर 3 वर्षांची वॉरंटी आणि पावरट्रेनवर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. उपलब्धता पाहता ग्राहक Trot इलेक्ट्रिक स्कूटर भारतात Odysse च्या डीलरशिपवरून विकत घेऊ शकतात. ग्राहक ही ई-स्कूटर येलो, ब्लॅक, रेड आणि मारुन कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतील.

ODYSSE इलेक्ट्रिक व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ नेमिन वोरा यांनी म्हटलं आहे की, “नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ODYSSE TROT सह आमचं लक्ष्य भारतात व्यावसायिक कामे जसे की डिलिव्हरी इत्यादी पूर्णपणे इलेक्ट्रिक करणं आहे.”

Odysse Trot चे स्पेसिफिकेशन्स

Odysse Trot इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं 250 Watt ची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. त्याचबरोबर यात 60V 32Ah वॉटरप्रूफ डिटॅचेबल बॅटरी देण्यात आली आहे. रेंज पाहता ही एकदा चार्ज केल्यावर 75 किमी पर्यंत चालू शकते. तसेच बॅटरी 2 तासांमध्ये 0 ते 60 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. 100 टक्के चार्ज होण्यास जवळपास 4 तासांचा वेळ लागतो.

कंपनी नुसार Odysse Trot इलेक्ट्रिक स्कूटरवर 250 किलो पर्यंतची लोडिंग कपॅसिटी आहे. तसेच ही एक आयओटी कनेक्ट इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी ट्रॅकिंग, जियो-फेंसिंग आणि इमोबिलाइजेशन सपोर्टसह येते. हे देखील वाचा: Okaya Faast F3 Electric Scooter च्या लाँच डेटची घोषणा; पुढील आठवड्यात येणार वेगवान EV

The post 75KM रेंज सह लाँच झाली Odysse Trot इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत आहे परवडणारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/odysse-trot-electric-scooter-launch-in-india-range-75km-price-under-rs-1-lakh/feed/ 0
Okaya Faast F3 Electric Scooter च्या लाँच डेटची घोषणा; पुढील आठवड्यात येणार वेगवान EV https://www.91mobiles.com/marathi/okaya-faast-f3-electric-scooter-launch-on-february-10-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/okaya-faast-f3-electric-scooter-launch-on-february-10-in-india/#respond Fri, 03 Feb 2023 10:32:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17482 देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या सेगमेंटमध्ये नव्या व जुन्या कंपन्या सतत नवीन ई-स्कूटर्स लाँच करत आहेत. जर तुम्ही एक New Electric Scooter घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे Okaya Faast F3 नावानं नवीन बॅटरी असलेली स्कटूर लाँच होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीनं आपल्या आगामी ईव्हीचा लाँच टीज करण्यास […]

The post Okaya Faast F3 Electric Scooter च्या लाँच डेटची घोषणा; पुढील आठवड्यात येणार वेगवान EV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Okaya Faast F3 Electric Scooter 10 फेब्रुवारीला लाँच होईल.
  • Okaya Faast F3 Electric Scooter मध्ये जबरदस्त रेंज मिळेल.
  • Okaya Faast F3 भारतात लाँच होणारी वेगवान ई-स्कूटर असेल.

देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या सेगमेंटमध्ये नव्या व जुन्या कंपन्या सतत नवीन ई-स्कूटर्स लाँच करत आहेत. जर तुम्ही एक New Electric Scooter घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे Okaya Faast F3 नावानं नवीन बॅटरी असलेली स्कटूर लाँच होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीनं आपल्या आगामी ईव्हीचा लाँच टीज करण्यास सुरुवात केली आहे.

10 फेब्रुवारीला येईल ई-स्कूटर

कंपनीनं आपल्या वेबसाइटवर Okaya Faast F3 चं प्रोडक्ट पेज लाइव्ह केलं आहे. या प्रोडक्ट पेजवर लाँच काउंटडाउन सुरु करण्यात आला आहे. या काउंटडाउननुसार 10 फेब्रुवारीला नवीन ई-स्कूटर भारतात सादर केली जाईल. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार कंपनी ही स्कूटर एका ऑनलाइन इव्हेंटच्या माध्यमातून भारतीय बाजारात सादर करेल. परंतु फीचर्स बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. एवढं मात्र नक्की आहे की या ई-स्कूटर मध्ये 1200W ची मोटर आणि 2500W ची पीक पावर मिळेल. हे देखील वाचा: तब्बल 180 दिवस चालणार BSNL चा जबरदस्त प्लॅन; मोफत कॉलिंग आणि रोज 2GB डेटा

ओकायाच्या आगामी नवीन इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरी, रेंज आणि स्पीडबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु एक गोष्ट समजली आहे की Okaya Fasst F3 मध्ये 2000 वॉटची इलेक्ट्रिक मोटर दिली जाईल. हीचा टॉप स्पीड 70kmph पर्यंत असू शकतो, तसेच बॅटरी रेंज पाहता ओकायाची बॅटरी रेंज 70-80 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते.

ब्रेकिंग सिस्टम पाहता कंपनी ई-स्कूटरच्या फ्रंट व्हील आणि रियर व्हील दोन्हीमध्ये ड्रम ब्रेक देऊ शकते. यात कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम मिळू शकते. आशा आहे की स्कूटरच्या सस्पेंशन सिस्टममध्ये कंपनी फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन आणि मागे ड्युअल स्प्रिंग लोडेड सस्पेंशनचा वापर करेल जे कंपनीच्या आधीच्या ई-स्कूटरमध्ये दिसले आहेत. हे देखील वाचा: 108MP प्रायमरी कॅमेऱ्यासह Oppo चा 5G Phone लाँच; रेडमी-रियलमीची वाट लावणार का Oppo Reno 8T 5G?

ओकाया कंपनीनं याआधी आपल्या तीन इलेक्ट्रिक स्कूटर्स सादर केल्या आहेत. कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये Faast F4, Freedum आणि ClassicIQ चा समावेश आहे. Faast F3 कंपनीची भारतीय बाजारातील 4 इलेक्ट्रिक स्कूटर असेल. कंपनीनं आगामी स्कूटरच्या किंमतीची अधिकृत माहिती दिली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार येत्या 10 फेब्रुवारीला येणारी Okaya Faast3 इलेक्ट्रिक स्कूटर 1,13,999 रुपयांमध्ये ग्राहकांच्या भेटीला येऊ शकते.

The post Okaya Faast F3 Electric Scooter च्या लाँच डेटची घोषणा; पुढील आठवड्यात येणार वेगवान EV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/okaya-faast-f3-electric-scooter-launch-on-february-10-in-india/feed/ 0
काय सांगता! 8 हजारांच्या आत आली हटके इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावते इतकी https://www.91mobiles.com/marathi/niu-mavericks-nqi-electric-scooter-launched-in-china/ https://www.91mobiles.com/marathi/niu-mavericks-nqi-electric-scooter-launched-in-china/#respond Mon, 30 Jan 2023 09:31:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17340 चिनी कंपनी NIU नं आपली नवीन Electric Scooter NIU Mavericks NQi होममार्केट चीनमध्ये लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही स्कूटर लहान मुलांचा विचार करून बनवण्यात आली आहे. म्हणजे ही लहान मुलांची ई-स्कूटर (electric scooter for kids) आहे, जी स्टाइलिश डिजाइन आणि कमी किंमतीत आली आहे. कंपनीच्या मते ही स्कूटर खूप मजबूत आहे. पुढे आम्ही तुम्हाला […]

The post काय सांगता! 8 हजारांच्या आत आली हटके इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावते इतकी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • NIU Mavericks NQi EV चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे.
  • ही एक लहान मुलांसाठी लाँच करण्यात आलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
  • ही सिंगल चार्जमध्ये 7.5 किलोमीटरपर्यंत चालवता येईल.

चिनी कंपनी NIU नं आपली नवीन Electric Scooter NIU Mavericks NQi होममार्केट चीनमध्ये लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही स्कूटर लहान मुलांचा विचार करून बनवण्यात आली आहे. म्हणजे ही लहान मुलांची ई-स्कूटर (electric scooter for kids) आहे, जी स्टाइलिश डिजाइन आणि कमी किंमतीत आली आहे. कंपनीच्या मते ही स्कूटर खूप मजबूत आहे. पुढे आम्ही तुम्हाला हिच्या किंमत आणि फीचर्सची सर्व माहिती दिली आहे.

NIU Mavericks NQi इलेक्ट्रिक स्कूटरची प्राइस

या इलेक्ट्रिक स्कूटरची प्राइस पाहता कंपनीनं Electric Scooter NIU Mavericks NQi चीनमध्ये फक्त 699 युआन (जवळपास 8,399 रुपये) मध्ये सादर केली आहे. कंपनीनं ही Jingdong (JD.com) वर लिस्ट केली आहे. त्यामुळे काही युजर्स ही इलेक्ट्रिक स्कूटर आयात करू शकतील. परंतु ही स्कूटर भारतात अधिकृतपणे येण्याची शक्यता फारच कमी आहे. हे देखील वाचा: …म्हणून रणबीर कपूरनं सेल्फी काढणाऱ्या फॅनचा फोन दिला फेकून; खरं कारण आलं समोर

NIU Mavericks NQi इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

बॅटरी: Mavericks NQi 12V4.5A मध्ये लेड- अ‍ॅसिड बॅटरी देण्यात आली आहे जी एकदा चार्ज केल्यावर अधिकतम 5km/h चा वेग आणि 90 मिनिट किंवा 7.5km चा रन टाइम देते. याचा अर्थ असा की लहानगे बॅटरी संपल्यावर देखील, स्कूटरवची बॅटरी संपण्याची चिंता करावी लागणार नाही.

वजनाने हलकी: NIU Mavericks NQi इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वात मोठी खास बाब म्हणजे यातील लाइटवेट डिजाइन आहे. जी फक्त 11 किलोग्रामची आहे. तसेच कंपनीनं ही मेटलनं बनवण्यात आली आहे त्यामुळे वरच्या बाजूला कठीण बनवण्यात आलं आहे, ज्याच्या वरच्या बाजूला एक अन्य चांगली लेयर या स्कूटर वर 80 किलोग्राम पर्यंत वजन असलेली व्यक्ती देखील बसू शकते.

फीचर्स: यात यूएसबी आणि एसडी कार्डचा सपोर्ट आहे. तसेच स्कूटरमध्ये म्यूजिक प्ले देखील करता येतं. त्याचबरोबर यात अ‍ॅम्बियंट लाइटिंग देण्यात आली आहे जी लहान मुलाना आकर्षीत करेल. हे देखील वाचा: एकही रुपया जास्त न देता मिळवा 74GB डेटा; अशी आहे BSNL ची जबरदस्त ऑफर

तीन गियर: ई-स्कूटरमध्ये पुढे जाण्यासाठी, रीवर्स चालवणे आणि पार्किंग इत्यादी तीन गियर आहेत. तसेच इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये ऑग्जिलरी व्हील्स देखील देण्यात आले आहेत.

The post काय सांगता! 8 हजारांच्या आत आली हटके इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावते इतकी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/niu-mavericks-nqi-electric-scooter-launched-in-china/feed/ 0