Realme C55 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 21 Mar 2023 08:17:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 64MP Camera सह भारतात आला Realme C55, पाहा फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-smartphone-realme-c55-launched-in-india-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-smartphone-realme-c55-launched-in-india-price-and-specifications/#respond Tue, 21 Mar 2023 07:51:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19596 रियलमी कंपनीनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Realme C55 भारतात लाँच केला आहे. हा मोबाइल लो बजेट सेग्मेंटमध्ये आला आहे. रियलमी सी55 स्मार्टफोननं 64MP Rear Camera सह मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे जो 16GB Dynamic RAM च्या पावरसह येतो. या फोनची किंमत, सेल सोबतच फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. […]

The post 64MP Camera सह भारतात आला Realme C55, पाहा फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • रियलमी सी55 16GB Dynamic RAM ला सपोर्ट करतो.
  • या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.
  • Realme C55 MediaTek Helio G88 वर चालतो.

रियलमी कंपनीनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Realme C55 भारतात लाँच केला आहे. हा मोबाइल लो बजेट सेग्मेंटमध्ये आला आहे. रियलमी सी55 स्मार्टफोननं 64MP Rear Camera सह मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे जो 16GB Dynamic RAM च्या पावरसह येतो. या फोनची किंमत, सेल सोबतच फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

रियलमी सी55 ची किंमत

रियलमी सी55 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट कंपनीनं भारतात आणले आहेत. यातील 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेजची किंमत 10,999 रुपये आहे. तर 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेजची किंमत 11,999 रुपये आहे तर 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज असलेला मॉडेल 13,999 रुपयांमध्ये मिळेल. या फोनची विक्री 28 मार्च दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर सुरु होईल. कंपनीनं Rainy Night आणि Sunflower हे दोन कलर व्हेरिएंट बाजारात आणले आहेत.

रियलमी सी55 चे स्पेसिफिकेशन्स

  • 90Hz FHD+ LCD display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • MediaTek Helio G88
  • 64MP Rear Camera
  • 5,000mAh battery
  • 33W SuperVOOC charging

Realme C55 स्मार्टफोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या लार्ज फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनची थिकनेस फक्त 7.89एमएम आहे. हे देखील वाचा: 16GB RAM सह iQOO Z7 5G भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

रियलमी सी55 अँड्रॉइड 13 ओएसवर सादर केला जाईल जो रियलमी युआय 4.0 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी88 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 8जीबी डायनॉमिक रॅम टेक्नॉलॉजी देण्यात आली जो फोनच्या इंटरनल 8जीबी रॅमला 16जीबी रॅम पर्यंत वाढवू शकतो.

फोटोग्राफीसाठी Realme C55 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: फोल्डेबल स्मार्टफोन Tecno Phantom V Fold येतोय भारतात; कंपनीनं केला टीज

पावर बॅकअपसाठी रियलमी सी55 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात येईल जो 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो. हा फोन ड्युअल सिम, 3.5एमएम जॅक आणि एनएफसी सहित बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह येईल.

The post 64MP Camera सह भारतात आला Realme C55, पाहा फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-smartphone-realme-c55-launched-in-india-price-and-specifications/feed/ 0
Realme C55 भारतात 21 मार्चला होईल लाँच, मिळेल 64MP Camera आणि 16GB Dynamic RAM https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-launch-date-in-india-21-march/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-launch-date-in-india-21-march/#respond Tue, 14 Mar 2023 10:28:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19472 Realme C55 21 मार्चला भारतात लाँच होईल. याबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून लीक्स येत आहेत आणि कंपनी देखील अनेक दिवस हा फोन आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करत आहे. आज रियलमीनं या नवीन ‘सी’ सीरीज स्मार्टफोनच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. 21 मार्चला भारतात लाँच होणारा रियलमी सी55 स्मार्टफोन 64MP Rear Camera आणि 16GB Dynamic RAM […]

The post Realme C55 भारतात 21 मार्चला होईल लाँच, मिळेल 64MP Camera आणि 16GB Dynamic RAM first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme C55 च्या भारतीय लाँच डेटची घोषणा केली आहे.
  • फोनमध्ये 33W Fast Charging आणि 5,000mAh Battery चा सपोर्ट मिळेल.
  • स्मार्टफोनमध्ये 64MP Rear Camera आणि 16GB Dynamic RAM ची पावर मिळेल.

Realme C55 21 मार्चला भारतात लाँच होईल. याबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून लीक्स येत आहेत आणि कंपनी देखील अनेक दिवस हा फोन आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करत आहे. आज रियलमीनं या नवीन ‘सी’ सीरीज स्मार्टफोनच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. 21 मार्चला भारतात लाँच होणारा रियलमी सी55 स्मार्टफोन 64MP Rear Camera आणि 16GB Dynamic RAM च्या पावरसह येईल, अशी माहिती स्मार्टफोनच्या प्रोडक्ट पेजवरून मिळाली आहे.

रियलमी सी55 इंडिया लाँच

कंपनीनं अधिकृतपणे माहिती दिली आहे की Realme C55 स्मार्टफोन येत्या 21 मार्चला भारतात लाँच केला जाईल. रियलमी इंडिया वेबसाइटवर या फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह करण्यात आला आहे ज्यात अनेक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. रियलमी सी55 लाँच इव्हेंट 21 मार्चला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच रियलमी इंडियाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह बघता येईल. विशेष म्हणजे शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर देखील Realme C55 प्रोडक्ट पेज लिस्ट करण्यात आलं आहे, त्यामुळे हा फोन फ्लिपकार्टवर विकला जाईल हे स्पष्ट झालं आहे. हे देखील वाचा: POCO X5 5G फोन भारतात लाँच; फोनमध्ये 48MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

रियलमी सी55 चे स्पेसिफिकेशन्स

  • 16GB Dynamic RAM
  • 64MP Rear Camera
  • 33W SuperVOOC charging
  • 5,000mAh battery

रियलमी इंडिया वेबसाइटवर खुलासा झाला आहे की हा स्मार्टफोन 8जीबी डायनॉमिक रॅम टेक्नॉलॉजीसह येईल. या फोनमध्ये 8 जीबी इंटरनल रॅम दिली जाईल जो डायनॉमिक रॅम टेक्नॉलॉजीसह मिळून Realme C55 ला 16जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकेल. आशा आहे की भारतात हा फोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल ज्यात 6जीबी रॅमचा देखील समावेश असू शकतो.

Realme C55 मध्ये फोटोग्राफीसाठी डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल ज्यात प्रायमरी सेन्सर 64 मेगापिक्सलचा असेल. हा कॅमेरा सेन्सर आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी तसेच पोर्टरेट मोड व नाइट मोडसह येईल. या फोनमध्ये पंच-होल स्टाईल स्क्रीन मिळेल. तसेच कंपनीनं सांगितलं आहे की रियलमी सी55 ची जाडी फक्त 7.89एमएम असेल. हे देखील वाचा: 8 हजारांच्या आत लाँच होऊ शकतो 6,000एमएएच बॅटरी असलेला itel चा आगामी स्मार्टफोन, आमच्या हाती लागली माहिती

पावर बॅकअपसाठी रियलमी सी55 5,000एमएएच बॅटरीसह बाजारात येईल जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. कंपनीचा दावा आहे की हा मोबाइल फोन फक्त 29 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो. एक्स फुल चार्ज झाल्यावर 27 दिवसांचा स्टँडबाय टाइम देखील हा फोन देऊ शकतो, असं कंपनीनं सांगितलं आहे.

The post Realme C55 भारतात 21 मार्चला होईल लाँच, मिळेल 64MP Camera आणि 16GB Dynamic RAM first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-launch-date-in-india-21-march/feed/ 0
पुढील आठवड्यात येऊ शकतो Realme C55; टिपस्टरनं दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-global-india-launch-date-tipped-officially-teased/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-global-india-launch-date-tipped-officially-teased/#respond Thu, 02 Mar 2023 07:44:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18328 Realme C55 लवकरच कंपनीच्या सी सीरिजमध्ये सादर केली जाऊ शकतो, जो ब्रँडचा पहिला फोन असेल ज्यात iPhone 14 सारखं डायनॅमिक आयलंड फिचर मिळू शकतं. अलीकडेच या स्मार्टफोनचा एक अनबॉक्सिंग व्हिडीओ लीक झाला होता ज्यात याच्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा करण्यात आला होता. आता रियलमीनं अधिकृतपणे Realme C55 चा टीजर रिलीज केला आहे. या टीजरमध्ये फोनचा […]

The post पुढील आठवड्यात येऊ शकतो Realme C55; टिपस्टरनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme C55 अधिकृतपणे कंपनीनं टीज केला आहे.
  • हा फोन जागतिक बाजारात 7 मार्चला लाँच होईल.
  • Realme C55 मध्ये 256GB स्टोरेज, MediaTek Helio G88 SoC आणि 5000mAh ची बॅटरी मिळेल.

Realme C55 लवकरच कंपनीच्या सी सीरिजमध्ये सादर केली जाऊ शकतो, जो ब्रँडचा पहिला फोन असेल ज्यात iPhone 14 सारखं डायनॅमिक आयलंड फिचर मिळू शकतं. अलीकडेच या स्मार्टफोनचा एक अनबॉक्सिंग व्हिडीओ लीक झाला होता ज्यात याच्या डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा करण्यात आला होता. आता रियलमीनं अधिकृतपणे Realme C55 चा टीजर रिलीज केला आहे. या टीजरमध्ये फोनचा सनशॉवर कलर दाखवण्यात आला आहे.

त्याचबरोबर टिपस्टर पारस गुगलणीनं दावा केला आहे की रियलमी सी55 स्मार्टफोन पुढील आठवड्यात 7 मार्चला जागतिक बाजारात लाँच होऊ शकतो आणि त्यांनतर लागेचच दुसऱ्या दिवशी या स्मार्टफोनची विक्री सुरु होऊ शकते. त्यामुळे लवकरच या स्मार्टफोनबाबत अधिक माहिती कंपनीकडून दिली जाऊ शकते. पारसनुसार या फोनचा भारतीय लाँच जागतिक लाँचनंतर काही दिवसांनी आयोजित केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: 10 मार्चला भारतात लाँच होऊ शकतो Moto G73 5G; भारतातील पहिला Dimensity 930 चिपसेट असलेला फोन

Realme C55 चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.72” FHD+ IPS LCD display
  • MediaTek Helio G88 SoC
  • 8GB RAM 256GB storage
  • Android 13
  • 5,000mAh battery, 33W Fast Charging

लिक्सनुसार रियलमी सी55 स्मार्टफोनमध्ये 6.72 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल. या फोनमध्ये फ्लॅट बेजल मिळू शकतात, तसेच डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंचहोल दिला जाऊ शकतो. फोनमध्ये मीडियाटेकचा Helio G88 चिपसेट मिळू शकतो, जोडीला 6GB LPDDR4X RAM आणि 128GB eMMc 5.1 स्टोरेज मिळू शकते. टिपस्टर पारसनं दावा केला आहे की हा फोन 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये देखील येऊ शकतो.

हा फोन अँड्रॉइड 13 सह बाजारात लाँच केला जाऊ शकतो. तसेच यात 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते, जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. कनेक्टव्हिटीसाठी यात 4G, ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट मिळू शकते. सिक्योरिटीसाठी कंपनी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर करू शकते.

फोनच्या बॅक पॅनलवरील कॅमेरा सेटअपची जास्त माहिती उपलब्ध झाली नाही. Realme C55 मध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो, असं सांगण्यात आलं आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं 8MP चा फ्रंट कॅमेरा देऊ शकते. हे देखील वाचा: भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक बाइक लाँच; सिंगल चार्जमध्ये 125KM ची जबरदस्त रेंज

The post पुढील आठवड्यात येऊ शकतो Realme C55; टिपस्टरनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-global-india-launch-date-tipped-officially-teased/feed/ 0
मार्चमध्ये येऊ शकतो Realme C55 भारतात; टिपस्टरनं शेयर केला मार्केटिंग व्हिडीओ https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-launch-date-in-india-price-specifications-details-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-launch-date-in-india-price-specifications-details-leaked/#respond Tue, 28 Feb 2023 04:23:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18213 रियलमी संबंधित बातमी अलीकडेच समोर आली होती की कंपनी दोन स्वस्त स्मार्टफोन्सवर काम करत आहे जे Realme C55 आणि Realme C33 2023 नावाने लाँच होतील. आता यातील एक रियलमी सी55 ची लाँच टाइमलाईन लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. इतकेच नव्हे तर टिपस्टर पारस गुगलानीनं फोनचा मार्केटिंग व्हिडीओ देखील आपल्या ट्वीटर हँडलवर शेयर केला आहे ज्यामुळे […]

The post मार्चमध्ये येऊ शकतो Realme C55 भारतात; टिपस्टरनं शेयर केला मार्केटिंग व्हिडीओ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme C55 मार्चमध्ये भारतात लाँच होईल.
  • हा स्मार्टफोन 6MP Rear Camera सपोर्ट करेल.
  • UI मुळे या फोनमध्ये iPhone 14 Pro सारखा पंच-होल दिसेल.

रियलमी संबंधित बातमी अलीकडेच समोर आली होती की कंपनी दोन स्वस्त स्मार्टफोन्सवर काम करत आहे जे Realme C55 आणि Realme C33 2023 नावाने लाँच होतील. आता यातील एक रियलमी सी55 ची लाँच टाइमलाईन लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. इतकेच नव्हे तर टिपस्टर पारस गुगलानीनं फोनचा मार्केटिंग व्हिडीओ देखील आपल्या ट्वीटर हँडलवर शेयर केला आहे ज्यामुळे रियलमी सी55 च्या लुक व डिजाईनचा खुलासा झाला आहे.

Realme C55 भारतीय लाँच

रियलमी सी55 बद्दल दावा केला गेला आहे की हा मोबाइल फोन पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये भारतात लाँच होऊ शकतो. ही बातमी समोर आल्यानंतर चर्चा सुरु झाली आहे की पुढील काही दिवसांमध्ये कंपनी हा मोबाइल फोन अधिकृतपणे टीज करण्यास सुरु करू शकते. आशा आहे की MWC 2023 संपल्यावर कदाचित Realme C55 इंडिया लाँचची घोषणा करू शकते. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीच्या डोकेदुखीत वाढ; तब्बल 12GB RAM सह Samsung Galaxy A14 4G फोन लाँच

Realme C55 चा लुक

रियलमी सी55 चे फोटो समोर आल्यामुळे स्पष्ट झालं आहे कि हा मोबाइल फोन सिंगल सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर पंच-होल डिस्प्ले दिली जाऊ शकतो ज्यात कॅमेरा असेल. स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेला हा होल बॉडी एजपासून दूर आहे तसेच स्क्रीनच्या चारही बाजूंना राउंड ऐज असलेले नॅरो बेजल्स देण्यात आले आहेत.

बॅक पॅनलवर दोन मोठे रिंग असलेला रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चौकनी आकाराच्या मॉड्यूलमध्ये आहे. लेन्सच्या बाजूला फ्लॅश आहे आणि जवळच सेन्सरची माहिती लिहिण्यात आली आहे. फोनचा रियर पॅनल चमकदार आहे. लोव्हर पॅनलवर यूएसबी टाईप सी पोर्ट सोबतच मायक्रोफोन आणि स्पिकर ग्रिल देण्यात आली आहे. उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेन्सर असलेला पावर बटन मिळतो.

Realme C55 चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी सी55 च्या फोटोवरून स्पष्ट झालं आहे की हा मोबाइल 64 मेगापिक्सलच्या प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करेल. तसेच लीकनुसार या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी88 चिपसेट दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी असल्याचं समोर आलं आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. हा रियलमी मोबाइल 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेवर लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: 320km ची रेंज वाली Citroen eC3 इलेक्ट्रिक कार झाली लाँच, किंमत आहे इतकी

Realme C55 बाबत सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. यात 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज तसेच 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजचा समावेश असेल. तसेच कलर मॉडेल्स पाहता रिपोर्टनुसार हा रियलमी स्मार्टफोन भारतीय बाजारात Rainforest (Green), Rainy Night (black) आणि Sunshower (orange) कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post मार्चमध्ये येऊ शकतो Realme C55 भारतात; टिपस्टरनं शेयर केला मार्केटिंग व्हिडीओ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-launch-date-in-india-price-specifications-details-leaked/feed/ 0
Realme Mobile मध्ये मिळणार iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले! माधव सेठ यांनी चुकून केलं ट्वीट https://www.91mobiles.com/marathi/realme-mini-capsule-could-come-in-c-series-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/realme-mini-capsule-could-come-in-c-series-smartphone/#respond Thu, 23 Feb 2023 09:22:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18091 iPhone 14 series मध्ये Apple नं आपल्या मोबाइल्सची स्क्रीन स्टाईल बदलून Dynamic Island डिस्प्ले सादर केला आहे. नॉच आणि पंच-होलचं हे मिश्रण लोकांना खूप आवडलं. आता अशीच डिस्प्ले डिजाईन Realme C-series च्या स्मार्टफोन्समध्ये देखील मिळू शकते. कंपनीचे व्हीपी माधव सेठ यांनी ट्वीटच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे ज्याला ‘Realme Mini Capsule’ असं नाव देण्यात आलं […]

The post Realme Mobile मध्ये मिळणार iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले! माधव सेठ यांनी चुकून केलं ट्वीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme C-series स्मार्टफोन्समध्ये iPhone Dynamic Island डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
  • कंपनी याला Realme Mini Capsule असं नाव देऊ शकते.
  • रियलमी व्हीपी माधव सेठ यांनी ही माहिती एके ट्वीटमधून दिली आणि नंतर डिलीट केली.

iPhone 14 series मध्ये Apple नं आपल्या मोबाइल्सची स्क्रीन स्टाईल बदलून Dynamic Island डिस्प्ले सादर केला आहे. नॉच आणि पंच-होलचं हे मिश्रण लोकांना खूप आवडलं. आता अशीच डिस्प्ले डिजाईन Realme C-series च्या स्मार्टफोन्समध्ये देखील मिळू शकते. कंपनीचे व्हीपी माधव सेठ यांनी ट्वीटच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे ज्याला ‘Realme Mini Capsule’ असं नाव देण्यात आलं आहे.

Realme Vice President Madhav Sheth यांनी आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून काल घोषणा केली होती की, कंपनीच्या ‘सी’ सीरीज स्मार्टफोन्समध्ये Realme Mini Capsule डिस्प्ले दिली जाईल. ही स्क्रीन स्टाईल मोठ्या प्रमाणावर iPhone 14 Pro आणि Pro Max सारखी होती. रियलमी फॅन्स हे पाहून खूप उत्सुक झाले होते परंतु काही तासांनी माधव सेठ यांनी हे ट्वीट डिलीट केलं. हे देखील वाचा: असे असतील Realme GT Neo 5 SE चे स्पेसिफिकेशन्स; लाँचपूर्वीच लीक झाली महत्वाची माहिती

Realme C-series स्मार्टफोन्समधील हे मिनी कॅप्सूल फिचर पाहून ब्रँडचे फॉलोवर्स जितके खुश झाले होते, तेवढेच माधव सेठ यांनी ट्वीट डिलीट केल्यावर नाराज झाले आहेत. लोकांना आशा होती की आगामी Realme C55 मध्ये ही नवीन डिस्प्ले स्टाईल मिळेल, परंतु आता यावर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. महागड्या आयफोन सारखा डिस्प्ले स्वस्त रियलमी फोन्समध्ये मिळेल की नाही या माहितीसाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल.

Realme C55

रियलमी सी55 बद्दल बोलायचं झालं तर याबाबत अनेक लीक्स आतापर्यंत समोर आले आहेत. अलीकडेच याबाबत सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. यात 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज तसेच 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजचा समावेश असू शकतो. तसेच रिपोर्टनुसार रियलमी सी55 भारतीय बाजारात Rainforest (Green), Rainy Night (black) आणि Sunshower (orange) कलरमध्ये विकला जाईल. हे देखील वाचा: सुरु झाली Revolt RV400 electric bike ची प्री-बुकिंग; चार्जिगविना धावते 150KM

हा स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन साइट BIS सह अनेक ठिकाणी लिस्ट झाला आहे. हा मोबाइल फोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह लाँच होईल जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते, अशी चर्चा आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व लाँच डिटेल्ससाठी आता कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

The post Realme Mobile मध्ये मिळणार iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले! माधव सेठ यांनी चुकून केलं ट्वीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-mini-capsule-could-come-in-c-series-smartphone/feed/ 0
लो बजेटमध्ये येऊ शकतात Realme C55 आणि Realme C33 2023 https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-and-realme-c33-2023-india-launch-soon-ram-storage-color-variants-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-and-realme-c33-2023-india-launch-soon-ram-storage-color-variants-leaked/#respond Wed, 22 Feb 2023 05:32:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18038 स्वस्त स्मार्टफोन्स बनवून भारतात लोकप्रिय झालेली रियलमी कंपनी एकीकडे हायएन्ड फ्लॅगशिपच्या जीवावर बाजारात आपला विस्तार करत आहे तर दुसरीकडे लो बजेट मोबाइल बनवून अधिक ग्राहकांना आकर्षित करत आहे. आता बातमी आली आहे की दोन नवीन स्वस्त रियलमी फोन Realme C55 आणि Realme C33 2023 लवकरच भारतात लाँच होऊ शकतात. या दोन्ही मोबाइल फोन्सच्या मेमरी व्हेरिएंटसह […]

The post लो बजेटमध्ये येऊ शकतात Realme C55 आणि Realme C33 2023 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme C55 आणि Realme C33 2023 भारतात लाँच होणार आहेत.
  • हे दोन्ही लो बजेट स्मार्टफोन 12 ते 15 हजार रुपयांमध्ये लाँच होऊ शकतात.
  • रियलमी सी33 2023 गेल्यावर्षी लाँच झालेल्या Realme C33 चा अ‍ॅडव्हान्स व्हर्जन असेल.

स्वस्त स्मार्टफोन्स बनवून भारतात लोकप्रिय झालेली रियलमी कंपनी एकीकडे हायएन्ड फ्लॅगशिपच्या जीवावर बाजारात आपला विस्तार करत आहे तर दुसरीकडे लो बजेट मोबाइल बनवून अधिक ग्राहकांना आकर्षित करत आहे. आता बातमी आली आहे की दोन नवीन स्वस्त रियलमी फोन Realme C55 आणि Realme C33 2023 लवकरच भारतात लाँच होऊ शकतात. या दोन्ही मोबाइल फोन्सच्या मेमरी व्हेरिएंटसह बरीच महत्वाची माहिती आली आहे.

Realme C55 आणि Realme C33 2023 संबंधित माहिती एका टेक वेबसाइटनं दिली आहे. सूत्रांच्या हवाल्याने या वेबसाइटनं सांगितलं आहे की रियलमी कंपनी भारतात दोन लो बजेट स्मार्टफोन्स सादर करण्यास तयार आहे जे रियलमी सी55 तथा रियलमी सी33 2023 नावानं लाँच होऊ शकतात. नावावरून समजलं असेल की रियलमी सी33 2023 मॉडेल गेल्यावर्षी लाँच झालेल्या Realme C33 चा अ‍ॅडव्हान्स व्हर्जन असू शकतो. हे देखील वाचा: Xiaomi 13 आणि 13 Pro ची किंमत लीक! 26 फेब्रुवारीला होणार भारतात लाँच

Realme C33 2023

रियलमी सी33 2023 स्मार्टफोनबद्दल रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की हा मोबाइल फोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तर मोठा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. रिपोर्टनुसार हा रियलमी मोबाइल भारतात Aqua Blue, Night Sea आणि Sandy Gold कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

Realme C55

रियलमी सी55 बाबत सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. यात 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज तसेच 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजचा समावेश असू शकतो. तसेच कलर मॉडेल्स पाहता रिपोर्टनुसार हा रियलमी स्मार्टफोन भारतीय बाजारात Rainforest (Green), Rainy Night (black) आणि Sunshower (orange) कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.

जुना Realme C33

  • 6.5″ HD+ LCD Display
  • 3GB RAM + 32GB Storage
  • Unisoc T612 Processor
  • 50MP Dual Rear Camera
  • 5,000mAh Battery

जुन्या रियलमी सी33 च्या बेस व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे ज्यात 3GB RAM + 32GB Storage मिळते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 2.0 सह 1.82गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या Unisoc T612 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा मोबाइल ड्युअल सिम, 4जी एलटीई आणि 3.5एमएम जॅक सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.

Realme C33 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. सिक्योरिटीसाठी याच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तसेच पावर बॅकअपसाठी हा रियलमी मोबाइल 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: कमी किंमतीत लाँच झाली ही किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 80km धावणार

Realme C33 फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.8 अपर्चर असलेली 0.3 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी सी33 मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

The post लो बजेटमध्ये येऊ शकतात Realme C55 आणि Realme C33 2023 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-and-realme-c33-2023-india-launch-soon-ram-storage-color-variants-leaked/feed/ 0
रेडमी-पोकोच्या अडचणीत वाढ; स्वस्त आणि मस्त Realme C55 झाला वेबसाइटवर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-launch-soon-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-launch-soon-specifications-leaked/#respond Tue, 21 Feb 2023 05:13:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17984 Realme C55 च्या बातम्या गेल्या दोन महिन्यांपासून येत आहेत. हा मोबाइल फोन अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला आहे आणि आता याला SIRIM certification देखील मिळालं आहे. हा एक कमी किंमत असलेला लो बजेट स्मार्टफोन असेल जो बाजारातील Realme C35 चा नेक्स्ट व्हर्जन असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुढे तुम्ही रियलमी सी55 मधील फीचर्स व स्पेेसिफिकेशन्सची माहिती वाचू […]

The post रेडमी-पोकोच्या अडचणीत वाढ; स्वस्त आणि मस्त Realme C55 झाला वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme C55 लवकरच मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो.
  • हा एक लो बजेट स्मार्टफोन असेल जो कम किंमतीत विकला जाईल.
  • रियलमी सी55 Realme C35 का अ‍ॅडव्हान्स व्हर्जन असू शकतो.

Realme C55 च्या बातम्या गेल्या दोन महिन्यांपासून येत आहेत. हा मोबाइल फोन अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला आहे आणि आता याला SIRIM certification देखील मिळालं आहे. हा एक कमी किंमत असलेला लो बजेट स्मार्टफोन असेल जो बाजारातील Realme C35 चा नेक्स्ट व्हर्जन असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुढे तुम्ही रियलमी सी55 मधील फीचर्स व स्पेेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता.

Realme C55

रियलमी सी55 एसआयआरआयएम सर्टिफिकेशन्स साइटवर RMX3710 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. याआधी हा फोन NBTC, EEC आणि FCC सह भारतीय सर्टिफिकेशन साईट BIS वर देखील दिसला होता. बीआयएसवरून स्पष्ट झालं आहे की Realme C55 लवकरच भारतात देखील एंट्री करेल. तसेच ताज्या लिस्टिंगमध्ये खुलासा झाला आहे की या फोनमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,880एमएएचची बॅटरी दिली जाईल. हे देखील वाचा: चिनी नव्हे स्वदेशी कंपनीनं देणार स्वस्तात 7GB रॅम; Lava Yuva 2 Pro ची किंमत व स्पेसिफिकेशन लीक

Realme C35

रियलमी सी55 ची जास्त माहिती समोर आली नाही परंतु जुना सी35 स्मार्टफोन पाहता यात 6.6 इंचाचा फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. अँड्रॉइड 12 सह हा फोन रियलमी युआय 2.0 वर चालतो ज्यात 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टा-कोर Unisoc T616 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Realme C35 फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि एफ/2.8 अपर्चर असलेला ब्लॅक अँड व्हाईट वीजीए सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी सी35 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा रियलमी मोबाइल ड्युअल सिमला सपोर्ट करतो, जोडीला 4जी एलटीई, 3.5एमएम जॅक सारखे फीचर्स मिळतात. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तसेच या मोबाइलमध्ये फेस अनलॉक फीचरचा सपोर्टही आहे. तसेच पावर बॅकअपसाठी या रियलमी फोनमध्ये 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 18वॉट फास्ट चार्जिंगसह येते. हे देखील वाचा: Oppo Reno8 T सारखा आणखी नवीन 5G स्मार्टफोन; कंपनीनं सुरु केली भारतात टेस्टिंग

Realme C35 Price

रियलमी सी35 भारतीय बाजारात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 11,999 रुपये आहे. तर फोनच्या 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. सर्वात मोठा मॉडेल 13,999 रुपयांमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी देतो.

The post रेडमी-पोकोच्या अडचणीत वाढ; स्वस्त आणि मस्त Realme C55 झाला वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c55-launch-soon-specifications-leaked/feed/ 0