Samsung Galaxy A14 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 12:41:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A14 5G भारतात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच https://www.91mobiles.com/marathi/cheap-5g-mobile-samsung-galaxy-a14-5g-launch-in-india-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/cheap-5g-mobile-samsung-galaxy-a14-5g-launch-in-india-know-price-and-specifications/#respond Mon, 16 Jan 2023 11:11:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16917 Samsung Galaxy A14 5G Launch: सॅमसंगनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन 5जी फोन लाँच केले आहेत. यातील एक Samsung Galaxy A14 5G आहे आणि दुसऱ्याचं नाव Samsung Galaxy A23 5G आहे. यातील गॅलेक्सी ए14 5जी सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे जो 8GB RAM, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. […]

The post Samsung Galaxy A14 5G भारतात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy A14 5G फोन 16,499 रुपयांमध्ये भारतात लाँच
  • फोनमध्ये 8GB RAM सह Exynos 1330 चिपसेट
  • सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी मध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 2 वर्ष ओएस अपग्रेड आणि 4 वर्ष सिक्योरिटी अपडेट

Samsung Galaxy A14 5G Launch: सॅमसंगनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन 5जी फोन लाँच केले आहेत. यातील एक Samsung Galaxy A14 5G आहे आणि दुसऱ्याचं नाव Samsung Galaxy A23 5G आहे. यातील गॅलेक्सी ए14 5जी सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे जो 8GB RAM, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. पुढे आम्ही या 5जी मोबाइल फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व किंमतीची संपूर्ण माहिती दिली आहे.

Samsung Galaxy A14 5G Price

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी भारतात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस मॉडेलमध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे आणि याची प्राइस 16,499 रुपये आहे. तसेच फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मॉडेल 18,999 रुपयांमध्ये तसेच सर्वात मोठा 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मॉडेल 20,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन Dark Red, Light Green आणि Black कलरमध्ये 18 जानेवारी पासून विकत घेता येईल. हे देखील वाचा: 16GB RAM सह दमदार OPPO A78 5G भारतात लाँच; किंमत आहे खिशाला परवडणारी

Samsung Galaxy A14 5G Specifications

  • 6.6” FHD+ 90Hz Display
  • 50MP Triple Rear camera
  • 8GB RAM + 128GB storage
  • Samsung Exynos 1330

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही स्क्रीन पीएलएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. फोन स्क्रीन सह 16एम कलर सारखे फीचर्स देखील मिळतात. या फोनचे डायमेंशन 167.7 x 78.0 x 9.1एमएम आणि वजन 210 ग्राम आहे.

Samsung Galaxy A14 5G अँड्रॉइड ओएस आधारित वनयुआयसह लाँच करण्यात आला आहे ज्यात 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर एक्सनॉस 1330 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा सॅमसंग फोन रॅम प्लस फीचरसह येतो ज्यात गरजेनुसार वचुर्अल रॅम वाढवता येतो. गॅलेक्सी ए14 5जीची एक खासियत म्हणजे फोन 2 वर्षांच्या ओएस अपग्रेड आणि 4 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटसह येतो.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सर आणि तेवढ्याच अपर्चरच्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: जबरदस्त! इलेक्ट्रिक अवतारातील Honda Activa लाँचसाठी सज्ज; पुढील आठवड्यात येणार बाजारात

Samsung Galaxy A14 5G ड्युअल सिम फोन आहे ज्यात 5जी आणि 4जी दोन्ही वापरता येतं. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्ज नंतर नॉर्मल वापर केल्यास हा फोन 2 दिवस सहज चालतो.

The post Samsung Galaxy A14 5G भारतात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/cheap-5g-mobile-samsung-galaxy-a14-5g-launch-in-india-know-price-and-specifications/feed/ 0
भारतात येण्याआधी Samsung Galaxy A14 5G अमेरिकेत ऑफिशियल https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-smartphone-samsung-galaxy-a14-5g-launched-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-smartphone-samsung-galaxy-a14-5g-launched-check-price-and-specifications/#respond Fri, 13 Jan 2023 12:19:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16879 गेले कित्येक दिवस बातमी येत आहे की सॅमसंग भारतात आपले दोन बजेट फ्रेंडली 5G Phone सादर करणार आहे. यातील लो बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A14 कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतात सादर करू शकते. परंतु आता भारतीय बाजारात येण्याआधी आज हा स्मार्टफोन अमेरिकेत ऑफिशियल झाला आहे. गॅलेक्सी ए14 5जी यूएस मध्ये $199.99 मध्ये लाँच झाला आहे. […]

The post भारतात येण्याआधी Samsung Galaxy A14 5G अमेरिकेत ऑफिशियल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy A14 5G ची यूएसमधील किंमत $199.99.
  • भारतीय करंसीनुसार 16,200 रुपयांमध्ये सॅमसंगचा 5G Phone.
  • गॅलेक्सी ए14 5जी फोन 18 जानेवारीला येणार भारतात.
  • RAM Plus, 50MP camera आणि MediaTek Dimensity 700 सारखे फिचर.

गेले कित्येक दिवस बातमी येत आहे की सॅमसंग भारतात आपले दोन बजेट फ्रेंडली 5G Phone सादर करणार आहे. यातील लो बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A14 कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतात सादर करू शकते. परंतु आता भारतीय बाजारात येण्याआधी आज हा स्मार्टफोन अमेरिकेत ऑफिशियल झाला आहे. गॅलेक्सी ए14 5जी यूएस मध्ये $199.99 मध्ये लाँच झाला आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 16,200 रुपयांच्या आसपास आहे. पुढे आम्ही या सॅमसंग स्मार्टफोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. हे देखील वाचा: 11 हजारांत दीड लाखांच्या आयफोनचे फिचर; डायनॅमिक आयलंडसह LeEco S1 Pro लाँच

Samsung Galaxy A14 5G Price

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोनचा एकच मॉडेल अमेरिकेत आला आहे. हा मोबाइल फोन 4जीबी रॅमसह 64 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 199.99 यूएस डॉलर आहे जो 16,200 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे की भारतीय बाजारात देखील हा स्मार्टफोन मिड बजेटमध्ये लाँच केला जाईल आणि Galaxy A14 5G इंडिया प्राइस 15 हजार रुपयांच्या आसपास असू शकते.

Samsung Galaxy A14 5G Specifications

  • 6.6″ FHD+ 90Hz display
  • 4GB RAM + 64GB storage
  • MediaTek Dimensity 700
  • 50MP Dual Rear Camera
  • 15W 5,000mAh battery

Samsung Galaxy A14 5G फोन अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय 5 वर चालतो. यात 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. यूएस मध्ये गॅलेक्सी ए14 5जी 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजसह लाँच झाला आहे परंतु भारतात जास्त व्हेरिएंट्स अपेक्षित आहेत. हा स्मार्टफोन 1टीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करू शकतो.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि तेवढ्याच अपर्चरचा असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी ए14 5जी फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हा सॅमसंग फोन 1080 x 2408 रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही फोन स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. फोनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. या फोनचे डायमेंशन 167.7 x 78.0 x 9.1एमएम आणि वजन 204 ग्राम आहे. हे देखील वाचा: ती पुन्हा आली! LML कंपनीनं सादर केली शानदार इलेक्ट्रिक स्कूटर Star

Samsung Galaxy A14 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 4जी देखील वापरता येतं. 3.5एमएम जॅक आणि एनएफसी सोबतच स्मार्टफोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा सॅमसंग मोबाइल फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअपसाठी यात 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post भारतात येण्याआधी Samsung Galaxy A14 5G अमेरिकेत ऑफिशियल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-smartphone-samsung-galaxy-a14-5g-launched-check-price-and-specifications/feed/ 0
तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येऊ शकतो Samsung Galaxy A14 5G फोन; भारतीय लाँचपूर्वीच किंमत लीक https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a14-5g-price-in-india-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a14-5g-price-in-india-leaked-before-launch/#respond Wed, 11 Jan 2023 03:39:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16733 Samsung Galaxy A14 5G फोन येत्या 18 जानेवारीला भारतात लाँच होऊ शकतो. या मोबाइल सोबतच कंपनी Samsung Galaxy A23 5G देखील बाजारात सादर करू शकते. हे दोन्ही मिडरेंज स्मार्टफोन असतील आणि पुढील आठड्यात भारतीय बाजारात दाखल होऊ शकतात. गॅलेक्सी ए14 5जी ग्लोबल मार्केटमध्ये आधीच ऑफिशियल झाला आहे त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन्स सर्वश्रुत आहेत. तसेच आता एका […]

The post तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येऊ शकतो Samsung Galaxy A14 5G फोन; भारतीय लाँचपूर्वीच किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A14 5G फोन येत्या 18 जानेवारीला भारतात लाँच होऊ शकतो. या मोबाइल सोबतच कंपनी Samsung Galaxy A23 5G देखील बाजारात सादर करू शकते. हे दोन्ही मिडरेंज स्मार्टफोन असतील आणि पुढील आठड्यात भारतीय बाजारात दाखल होऊ शकतात. गॅलेक्सी ए14 5जी ग्लोबल मार्केटमध्ये आधीच ऑफिशियल झाला आहे त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन्स सर्वश्रुत आहेत. तसेच आता एका लीकमध्ये भारतीय लाँचपूर्वीच Galaxy A14 5G ची भारतीय किंमत समोर आली आहे.

Samsung Galaxy A14 5G India price

लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन भारतात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येऊ शकतो. फोनच्या बेस मॉडेलमध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते ज्याची किंमत 16,499 रुपये असू शकते. त्याचप्रमाणे 4जीबी+128जीबी व्हेरिएंटची किंमत 19,499 रुपये तर 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंटची प्राइस 21,999 रुपये असू शकते. या सॅमसंग फोनची विक्री लाँचनंतर काही दिवसांनी सुरु होऊ शकते. भारतात हा फोन नुकत्याच लाँच झालेल्या रेडमी नोट 12 आणि रियलमी 10 प्रो सीरिजला टक्कर देऊ शकतो असं लीक प्राइसवरून वाटते आहे. हे देखील वाचा: How To Verify Aadhaar Card: आधार कार्ड बनवताना तुमची फसवणूक तर झाली नाही ना? दोन मिनिटांत करा व्हेरिफाय

Samsung Galaxy A14 5G च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स/h2>

  • 6.6″ FHD+ 90Hz डिस्प्ले
  • 50MP Dual Rear Camera
  • MediaTek Dimensity 700
  • 15W 5,000mAh battery

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोनमध्ये 1080 x 2408 रिजोल्यूशन असलेला 6.6 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय 5 वर चालतो. तर प्रोसेसिंगसाठी कंपनीनं 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटचा वापर केला आहे.

Samsung Galaxy A14 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग 5जी फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Jio युजर्ससाठी बेस्ट 5G प्लॅन! फक्त 61 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतोय अनलिमिटेड 5G डेटा

हा एक ड्युअल सिम फोन आहे ज्यात 5जी व 4जी दोन्ही वापरता येईल. 3.5एमएम जॅक आणि एनएफसी सोबतच स्मार्टफोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी ए14 5जी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअपसाठी यात 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येऊ शकतो Samsung Galaxy A14 5G फोन; भारतीय लाँचपूर्वीच किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]> https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a14-5g-price-in-india-leaked-before-launch/feed/ 0 पुढील आठवड्यात 18 जानेवारीला भारतात येऊ शकतो Samsung Galaxy A23 5G https://www.91mobiles.com/marathi/18-january-samsung-galaxy-a23-5g-and-a14-5g-phone-launch-date-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/18-january-samsung-galaxy-a23-5g-and-a14-5g-phone-launch-date-in-india/#respond Mon, 09 Jan 2023 11:34:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16686 सॅमसंग इंडियानं अधिकृत घोषणा केली आहे की कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतात आपले दोन नवीन 5जी फोन सादर करणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन गॅलेक्सी ‘ए’ सीरीजमध्ये येतील जे Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A23 5G नावाने लाँच केले जातील. लाँच डेटच्या घोषणेनंतर कंपनीनं गॅलेक्सी ए23 5जी व ए14 5जी टीज करण्यास सुरुवात केली […]

The post पुढील आठवड्यात 18 जानेवारीला भारतात येऊ शकतो Samsung Galaxy A23 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग इंडियानं अधिकृत घोषणा केली आहे की कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतात आपले दोन नवीन 5जी फोन सादर करणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन गॅलेक्सी ‘ए’ सीरीजमध्ये येतील जे Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A23 5G नावाने लाँच केले जातील. लाँच डेटच्या घोषणेनंतर कंपनीनं गॅलेक्सी ए23 5जी व ए14 5जी टीज करण्यास सुरुवात केली आहे तसेच हे दोन्ही स्वस्त सॅमसंग 5जी फोन असतील.

Samsung Galaxy A23 5G भारतीय लाँच डेट

सॅमसंगनं आपल्या अधिकृत वेबसाइटवर लाँच इव्हेंटचं पेज लाइव्ह केलं आहे. त्याचबरोबर कंपनीनं ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून सांगितलं आहे की सॅमसंग गॅलेक्सी ए23 5जी फोन 18 जानेवारीला भारतात लाँच होईल. या स्मार्टफोन सोबतच कंपनी गॅलेक्सी ए14 5जी देखील भारतीय बाजारात आणेल. सॅमसंग हे ‘ए’ सीरीज स्मार्टफोन्स Awesome 5G टॅगलाईनसह प्रोमोट करत आहे. हे देखील वाचा: 14 जानेवारीला भारतात येतोय OPPO चा दमदार 5G Phone; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A23 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

गॅलेक्सी ए23 5जी फोन अमेरिकन मार्केटमध्ये आधीच लाँच झाला आहे. परंतु आम्हाला आशा आहे की भारतात लाँच होणारा हा स्मार्टफोन ग्लोबल मॉडेलपेक्षा वेगळा असू शकतो. सॅमसंग इंडियाद्वारे जारी करण्यात आलेल्या प्रोडक्ट पेजवर या फोन संबंधित काही माहिती मिळाली आहे जी पुढे देण्यात आली आहे.

कंपनीनुसार गॅलेक्सी ए23 5जी फोन 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालू शकतो. फोटोवरून समजलं आहे की हा वॉटरड्रॉप नॉच स्क्रीनसह बाजारात येऊ शकतो ज्यात तीन कडा बेजल लेस असू शकतात तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट दिला जाऊ शकतो. आशा आहे की या फोनमध्ये एलसीडी पॅनलचा वापर केला जाईल जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासद्वारे प्रोटेक्टेड असू शकतो.

Samsung Galaxy A23 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो. मेगापिक्सलची माहिती मात्र मिळाली नाही परंतु आशा आहे की यात एक मॅक्रो सेन्सर असेल. तसेच हा सॅमसंग फोन आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो. फक्त कॅमेरा नव्हे तर फोनच्या बॅटरीमध्ये एआय टेक्नॉलॉजी मिळू शकते जी 2 दिवसांचा बॅकअप देण्यास मदत करू शकते. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 16GB RAM ची ताकद; बजेटमध्ये दमदार गेमिंग परफॉर्मन्ससाठी Realme 10 भारतात लाँच

Samsung Galaxy A23 5G ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A23 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएस आधारित वनयुआय 4.1 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यांतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या मोठ्या स्क्रीनला सपोर्ट करतो जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. सिक्योरिटीसाठी साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर तर पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचे अन्य दोन सेंट मिळतात. यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

The post पुढील आठवड्यात 18 जानेवारीला भारतात येऊ शकतो Samsung Galaxy A23 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/18-january-samsung-galaxy-a23-5g-and-a14-5g-phone-launch-date-in-india/feed/ 0
ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध होऊ शकतात Galaxy A14 5G व A23 5G; भारतीय लाँचचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a14-5g-launched-check-price-and-specifications-details-2/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a14-5g-launched-check-price-and-specifications-details-2/#respond Fri, 06 Jan 2023 09:23:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16628 सॅमसंग कंपनी भारतात आपल्या 5जी पोर्टफोलियोमध्ये मोठा बदल करू शकते. कंपनी या महिन्यातच दोन 5G phones भारतात लाँच करू शकते जे Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A23 5G नावानं मार्केटमध्ये येऊ शकतात. या मोबाइल फोन्सची किंमत 15 हजारांच्या बजेटपासून सुरु होऊ शकते जे अलीकडेच आलेल्या Redmi Note 12 5G स्मार्टफोनला थेट टक्कर देऊ […]

The post ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध होऊ शकतात Galaxy A14 5G व A23 5G; भारतीय लाँचचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग कंपनी भारतात आपल्या 5जी पोर्टफोलियोमध्ये मोठा बदल करू शकते. कंपनी या महिन्यातच दोन 5G phones भारतात लाँच करू शकते जे Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A23 5G नावानं मार्केटमध्ये येऊ शकतात. या मोबाइल फोन्सची किंमत 15 हजारांच्या बजेटपासून सुरु होऊ शकते जे अलीकडेच आलेल्या Redmi Note 12 5G स्मार्टफोनला थेट टक्कर देऊ शकतो. पुढे तुम्ही या गॅलेक्सी मोबाइल्सची माहिती वाचू शकता.

सॅमसंग 5जी फोन्सची लीक किंमत

गॅलेक्सी ए14 5जी आणि ए23 5जी फोन या महिन्यात भारतीय बाजारात येऊ शकतात तसेच यांची लाँच डेट 14 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान असू शकते. हे दोन्ही मिडबजेट स्मार्टफोन असू शकतात ज्यांची प्रारंभिक किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. ही फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत असेल. Samsung Galaxy A14 5G आणि Galaxy A23 5G फोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर देखील होऊ शकते. हे देखील वाचा: Shahid Kapoor करणार वेब सीरीजच्या विश्वात पदार्पण; ‘Farzi’ च्या रिलीज डेटची घोषणा

Samsung Galaxy A14 5G च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ FHD+ 90Hz डिस्प्ले
  • 4GB RAM + 64GB storage
  • MediaTek Dimensity 700
  • 50MP Dual Rear Camera
  • 15W 5,000mAh battery

फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 1080 x 2408 रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसहवर लाँच झाला आहे. या फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. या फोनचे डायमेंशन 167.7 x 78.0 x 9.1एमएम आणि वजन 204 ग्राम आहे.

Samsung Galaxy A14 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो वनयुआय 5 सह चालतो. या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये हा सॅमसंग मोबाइल 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी ए14 5जी फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: नॉन चिनी ब्रँडची कमाल! लाँच केला कमी किंमत असलेला Samsung Galaxy A14 5G फोन

Samsung Galaxy A14 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 4जी देखील वापरता येतं. 3.5एमएम जॅक आणि एनएफसी सोबतच स्मार्टफोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा सॅमसंग मोबाइल फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअपसाठी यात 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध होऊ शकतात Galaxy A14 5G व A23 5G; भारतीय लाँचचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a14-5g-launched-check-price-and-specifications-details-2/feed/ 0
सॅमसंगनं लाँच केला Dimensity 700 प्रोसेसरसह Galaxy A14 5G फोन https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a14-5g-launched-check-price-and-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a14-5g-launched-check-price-and-specifications-details/#respond Fri, 06 Jan 2023 06:24:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16612 सॅमसंग संबंधित एक बातमी अनेक दिवसांपासून येत होती की कंपनी गॅलेक्सी ‘ए’ सीरीजच्या नव्या स्मार्टफोनवर काम करत आहे जो Samsung Galaxy A14 5G नावानं लाँच होईल. आता या कोरियन ब्रँडनं आपला हा नवीन मोबाइल फोन गुपचूप मार्केटमध्ये सादर केला आहे. गॅलेक्सी ए14 5जी फोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे जो 4GB RAM, MediaTek Dimensity […]

The post सॅमसंगनं लाँच केला Dimensity 700 प्रोसेसरसह Galaxy A14 5G फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग संबंधित एक बातमी अनेक दिवसांपासून येत होती की कंपनी गॅलेक्सी ‘ए’ सीरीजच्या नव्या स्मार्टफोनवर काम करत आहे जो Samsung Galaxy A14 5G नावानं लाँच होईल. आता या कोरियन ब्रँडनं आपला हा नवीन मोबाइल फोन गुपचूप मार्केटमध्ये सादर केला आहे. गॅलेक्सी ए14 5जी फोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे जो 4GB RAM, MediaTek Dimensity 700, 50MP camera आणि 5,000mAh battery ला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A14 5G Price

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन सर्वप्रथम अमेरिकन बाजारात आला आहे जिथे याची किंमत 200 डॉलर ठेवण्यात आली आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 16,000 रुपयांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे भारतात हा मोबाइल फोन जवळपास 14 हजरांच्या रेंजमध्ये येऊ शकतो. यूएस मार्केटमध्ये या सॅमसंग फोननं Black, Light Green, Dark Red आणि Silver कलरमध्ये एंट्री घेतली आहे. हे देखील वाचा: चुटकीसरशी फुल चार्ज होणार फोन! 240W fast charging टेक्नॉलॉजी येतेय बाजारात; शाओमीला टाकले मागे

Samsung Galaxy A14 5G Specifications

  • 6.6″ FHD+ 90Hz डिस्प्ले
  • 4GB RAM + 64GB storage
  • MediaTek Dimensity 700
  • 50MP Dual Rear Camera
  • 15W 5,000mAh battery

फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 1080 x 2408 रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेसहवर लाँच झाला आहे. या फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. या फोनचे डायमेंशन 167.7 x 78.0 x 9.1एमएम आणि वजन 204 ग्राम आहे.

Samsung Galaxy A14 5G फोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो वनयुआय 5 सह चालतो. या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये हा सॅमसंग मोबाइल 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी ए14 5जी फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: छप्परफाड डील! 16 हजारांच्या रेंजमध्ये 60MP Selfie कॅमेरा असलेला फोन; जोडीला 13GB रॅमची ताकद

Samsung Galaxy A14 5G फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 4जी देखील वापरता येतं. 3.5एमएम जॅक आणि एनएफसी सोबतच स्मार्टफोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा सॅमसंग मोबाइल फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअपसाठी यात 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post सॅमसंगनं लाँच केला Dimensity 700 प्रोसेसरसह Galaxy A14 5G फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-samsung-galaxy-a14-5g-launched-check-price-and-specifications-details/feed/ 0
Samsung Galaxy A14 आला कंपनीच्या वेबसाइटवर; लवकरच होऊ शकतो बाजारात दाखल https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a14-5g-support-page-goes-live-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a14-5g-support-page-goes-live-launch-in-india-soon/#respond Tue, 06 Dec 2022 03:23:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15685 Samsung Galaxy A14 5G Phone लवकरच भारतीय ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. सॅमसंग इंडियाच्या ऑफिशियल वेबसाइटवर सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोनचं सपोर्ट पेज लाइव्ह झालं आहे, ज्यावरून स्पष्ट झालं आहे की हा सॅमसंग स्मार्टफोन भारतीय बाजारात एंट्री घेऊ शकतो. सॅमसंगनं अद्याप या फोन लाँचबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु सपोर्ट पेज समोर आल्यानंतर आशा आहे […]

The post Samsung Galaxy A14 आला कंपनीच्या वेबसाइटवर; लवकरच होऊ शकतो बाजारात दाखल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A14 5G Phone लवकरच भारतीय ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. सॅमसंग इंडियाच्या ऑफिशियल वेबसाइटवर सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोनचं सपोर्ट पेज लाइव्ह झालं आहे, ज्यावरून स्पष्ट झालं आहे की हा सॅमसंग स्मार्टफोन भारतीय बाजारात एंट्री घेऊ शकतो. सॅमसंगनं अद्याप या फोन लाँचबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु सपोर्ट पेज समोर आल्यानंतर आशा आहे की काही दिवसांमध्ये Samsung Galaxy A14 5G भारतात लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy A14 5G भारतीय लाँच

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोनचं सपोर्ट पेज कंपनीच्या भारतीय वेबसाइटवर दिसलं आहे. या सपोर्ट पेजवर सॅमसंग मोबाइल फोन SM-A146B/DS मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. पेजवर फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स किंवा लाँचची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. परंतु असं सपोर्ट पेज समोर आल्यानंतर काही दिवसांमध्ये स्मार्टफोन मार्केटमध्ये सादर केला जातो. म्हणजे Samsung Galaxy A14 5G देखील लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! तुमची ट्रेन कुठे आहे हे पाहा मोबाइलवर, जाणून घ्या सोपी पद्धत

Samsung Galaxy A14 5G चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन संबंधीत लीक्स व सर्टिफिकेशन्समध्ये सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटवर लाँच होऊ शकतो. तसेच फोनच्या भारतीय व्हर्जनमध्ये सॅमसंग एक्सनॉस चिपसेट असल्याचं देखील काही रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. हा स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच होऊ शकतो जो वनयुआय 5.0 सह काम करू शकतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते जी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते.

Samsung Galaxy A14 5G फोन भारतात दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम दिली जाऊ शकते तर दुसरा व्हेरिएंट 6जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो. तसेच स्मार्टफोनमध्ये 64जीबी तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. लीक्सनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: जियोला मात देण्यासाठी Airtel नं सुरु केले ‘क्रिकेट पॅक’; ओटीटी सब्सस्क्रिप्शनसह आले तीन प्लॅन

लीक्सनुसार या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालू शकतो. फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A14 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. लीकनुसार, याचा प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सलचा असू शकतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

The post Samsung Galaxy A14 आला कंपनीच्या वेबसाइटवर; लवकरच होऊ शकतो बाजारात दाखल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a14-5g-support-page-goes-live-launch-in-india-soon/feed/ 0
गिकबेंचवर दिसला Samsung Galaxy A14 4G; लवकरच येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/4-gb-ram-mediatek-helio-g80-phone-samsung-galaxy-a14-4g-specifications-leaked-on-geekbench/ https://www.91mobiles.com/marathi/4-gb-ram-mediatek-helio-g80-phone-samsung-galaxy-a14-4g-specifications-leaked-on-geekbench/#respond Tue, 01 Nov 2022 12:33:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14524 Samsung Galaxy A14 5G ची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती की हा स्मार्टफोन सॅमसंग कंपनीचा सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन असू शकतो जो 15 हजारांच्या रेंजमध्ये लाँच केला जाऊ शकतो. आता या सीरीजमधील Samsung Galaxy A14 4G स्मार्टफोनची माहिती समोर आली आहे. बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर सॅमसंग गॅलेक्सी ए14 दिसला आहे जिथे गॅलेक्सी फोन अनेक महत्वाच्या […]

The post गिकबेंचवर दिसला Samsung Galaxy A14 4G; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A14 5G ची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती की हा स्मार्टफोन सॅमसंग कंपनीचा सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन असू शकतो जो 15 हजारांच्या रेंजमध्ये लाँच केला जाऊ शकतो. आता या सीरीजमधील Samsung Galaxy A14 4G स्मार्टफोनची माहिती समोर आली आहे. बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर सॅमसंग गॅलेक्सी ए14 दिसला आहे जिथे गॅलेक्सी फोन अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला आहे. आशा आहे की Samsung Galaxy A14 5G आणि Samsung Galaxy A14 4G लवकरच टेक मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy A14 4G

सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी फोन गीकबेंचवर Samsung SM-A145P मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. ही लिस्टिंग कालची म्हणजे 31 ऑक्टोबरची आहे जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. गीकबेंचच्या माध्यमातून समजलं आहे की Samsung Galaxy A14 4G फोन सर्वात नवीन आणि लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच होऊ शकतो तसेच 1.80गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी80 चिपसेटवर चालू शकतो. हे देखील वाचा: 31 दिवसांचे बेस्ट Plan, जास्त डेटासह कॉलिंग अगदी मोफत

Samsung Galaxy A14 4G फोन गीकबेंचवर 4 जीबी रॅमसह सर्टिफाइड करण्यात आला आहे, म्हणजे हा फोन 4जीबी रॅमवरच लाँच होऊ शकतो. परंतु एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये हा फोन बाजारात येण्याची शक्यता आहे. या सॅमसंग फोनमध्ये ग्राफिक्ससाठी माली जी-52 जीपीयू दिला जाऊ शकतो. बेंचमार्क स्कोर पाहता सॅमसंग गॅलेक्सी ए14 4जी ला सिंगल-कोर मध्ये 1668 आणि मल्टी-कोर मध्ये 5284 स्कोर मिळाला आहे.

Samsung Galaxy A14 5G

गॅलेक्सी ए14 5जी मॉडेल पाहता समोर आलेल्या लीक्सनुसार या मोबाइल फोनची किंमत 15,000 ते 18,000 रुपयांदरम्यान असू शकते. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिली जाऊ शकते. हा स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच होऊ शकतो. फोनमधील चिपसेटची माहिती मिळाली नाही. हे देखील वाचा: एक नव्हे दोन वर्षांची वॉरंटी! फ्री Nokia Wired Buds सह Nokia G60 5G भारतात लाँच; इतकी आहे किंमत

Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोन 6 जीबी रॅमवर लाँच केला जाऊ शकतो जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. लीकनुसार या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सलचा असू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सपोर्टसह दिली जाऊ शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post गिकबेंचवर दिसला Samsung Galaxy A14 4G; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4-gb-ram-mediatek-helio-g80-phone-samsung-galaxy-a14-4g-specifications-leaked-on-geekbench/feed/ 0
15 हजारांच्या रेंजमध्ये येऊ शकतो Samsung Galaxy A14 5G; लीकमधून माहिती आली समोर https://www.91mobiles.com/marathi/cheap-mobile-phone-samsung-galaxy-a14-5g-price-specifications-leaked-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/cheap-mobile-phone-samsung-galaxy-a14-5g-price-specifications-leaked-launch-soon/#respond Thu, 27 Oct 2022 11:28:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14382 सॅमसंग संबंधित मोठी बातमी समोर येत आहे की कंपनी एक लो बजेट 5जी स्मार्टफोनवर काम करत आहे जो लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जाऊ शकतो. हा मोबाइल फोन कंपनीच्या गॅलेक्सी ‘ए’ सीरीजमध्ये जोडला जाईल जो Samsung Galaxy A14 5G नावानं लाँच केला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी स्मार्टफोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन […]

The post 15 हजारांच्या रेंजमध्ये येऊ शकतो Samsung Galaxy A14 5G; लीकमधून माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग संबंधित मोठी बातमी समोर येत आहे की कंपनी एक लो बजेट 5जी स्मार्टफोनवर काम करत आहे जो लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जाऊ शकतो. हा मोबाइल फोन कंपनीच्या गॅलेक्सी ‘ए’ सीरीजमध्ये जोडला जाईल जो Samsung Galaxy A14 5G नावानं लाँच केला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी स्मार्टफोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5जी मोबाइल फोन असू शकतो जो 15 हजारांच्या रेंजमध्ये लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे या रेंजमधील रेडमी, रियलमी आणि मोटोरोला स्मार्टफोन्सना नक्कीच टक्कर मिळू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी लीक झालेली किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी कंपनीचा सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन बनू शकतो. किंमत पाहता समोर आलेल्या माहिती व लीक्सनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी स्मार्टफोन 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ही फोनची बेस किंमत असू शकते जी छोट्या व्हेरिएंटची प्राइस असू शकते. Samsung Galaxy A14 5G ची किंमत 15,000 रुपयांपासून सुरु होऊन 18,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. हे देखील वाचा: पुन्हा ओटीटीवर दिसणार अभिषेक बच्चनची जादू; ‘Breathe: Into the Shadows’ च्या दुसऱ्या सिझनची रिलीज डेट ठरली, पाहा ट्रेलर

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोनबद्दल कंपनीनं आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही परंतु समोर आलेले लीक्स पाहता या मोबाइल फोनमध्ये 6.5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिली जाऊ शकते जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालू शकतो. हा स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर आधारित वनयुआय 5.0 सह लाँच होऊ शकतो. फोनमध्ये चिपसेट कोणता असेल, याची माहिती मात्र समजली नाही. आता कंपनी स्वतःचा प्रोसेसर वापरेल की क्वॉलकॉमचा सहारा घेईल हे पाहावं लागेल.

Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोन 6 जीबी रॅमवर लाँच केला जाऊ शकतो जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. लीकनुसार या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो ज्याचा प्रायमरी सेन्सर 50 मेगापिक्सलचा असू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते जी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह काम करू शकते. हे देखील वाचा: बजेट फ्रेंडली Realme 10 Series चा लाँच कन्फर्म! लाँच पूर्वीच लीक झाले स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी च्या भारतीय लाँच बद्दल अजूनतरी कंपनीनं कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे समोर आलेली Samsung Galaxy A14 5G प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सकडे सध्या फक्त एका लीकच्या नजरेतून बघता येईल. परंतु सध्या 5G स्मार्टफोन्सची वाढती मागणी पाहता कंपनी लवकरच हा डाव खेळू शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 15 हजारांच्या रेंजमध्ये येऊ शकतो Samsung Galaxy A14 5G; लीकमधून माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/cheap-mobile-phone-samsung-galaxy-a14-5g-price-specifications-leaked-launch-soon/feed/ 0