BGMI - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Jul 2023 09:41:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ऑनलाइन गेम खेळणं होणार महाग, द्यावा लागणार 28% टॅक्स! PUBG, BGMI आणि Dream11 सारख्या गेम्सवर होणार परिणाम https://www.91mobiles.com/marathi/28-percent-tax-on-online-gaming-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/28-percent-tax-on-online-gaming-in-india/#respond Wed, 12 Jul 2023 09:41:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22353 देशात ऑनलाइन गेमची बाजारपेठ वेगानं वाढत आहे. PUBG आणि BGMI सारखे गेम्सनी वेगळीच उंची गाठली आहे. त्यात भारतातील स्वस्त इंटरनेट डेटा प्लॅन्सनं आणखी हातभार लावला आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील जे Online Game खेळत खेलते. परंतु आता हे गेम्स खेळणं महागणार आहे. GST Counsil नं मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे ऑनलाइन गेमिंगवर 28 […]

The post ऑनलाइन गेम खेळणं होणार महाग, द्यावा लागणार 28% टॅक्स! PUBG, BGMI आणि Dream11 सारख्या गेम्सवर होणार परिणाम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशात ऑनलाइन गेमची बाजारपेठ वेगानं वाढत आहे. PUBG आणि BGMI सारखे गेम्सनी वेगळीच उंची गाठली आहे. त्यात भारतातील स्वस्त इंटरनेट डेटा प्लॅन्सनं आणखी हातभार लावला आहे. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील जे Online Game खेळत खेलते. परंतु आता हे गेम्स खेळणं महागणार आहे. GST Counsil नं मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के टॅक्स द्यावा लागेल.

गेम्समध्ये खर्च होणाऱ्या रकमेवर द्यावा लागणार जीएसटी

अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी काउन्सिलची 50वी मीटिंग पार पडली. ह्या बैठकीत भारतात ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के कर लावण्याचा निर्णयानं घेण्यात आला आहे. आधी ऑनलाइन गेमिंग तसेच इन-गेम परचेज (In-game purchases) जीएसटी अंतर्गत न आणण्याचा विचार होता परंतु आता ह्या गेम्समध्ये खर्च केल्या जाणाऱ्या रकमेवर 28% टॅक्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑनलाइन गेमिंगवर होणारा परिणाम

Online Gaming वर 28 टक्के जीएसटीची घोषणा झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काही लोकांनी ह्या निर्णयाचे समर्थन केलं आहे तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या ह्या निर्णयामुळे गेमिंग सेक्टरवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि कंपन्यांच्या कॅशफ्लोवर परिणाम होईल, असं ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्रीला वाटतं.

28% टॅक्सच्या बातमीमुळे ही इंडस्ट्री नाराज दिसत आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर लोक ह्या निर्णयाला पाठिंबा देत आहेत. लोकांच्या मते ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे वाया जात आहेत त्यामुळे टॅक्स वाढल्यामुळे लोक गेम्समध्ये कमी पैसे लावतील. ह्या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम PUBG, BGMI, Dream11 आणि My11circle जसे की Fantasy Cricket Fantasy Cricket Apps वर पडू शकता.

भारतात वाढतेय ऑनलाइन गेमिंगची बाजारपेठ

एका रिपोर्टनुसार साल 2016 मध्ये भारतातील ऑनलाइन गेमिंग बाजार 54.30 कोटी डॉलर होता जो आर्थिक वर्ष 2022 मध्ये वाढून 2.6 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. 2027 पर्यंत ही बाजारपेठ 8.6 अब्ज डॉलर पार करेल. तसेच 2021 मध्ये जवळपास 45 कोटी इंडियन ऑनलाइन गेमर्स होते जे एक वर्षानंतर 2022 मध्ये 50 कोटींच्या पार गेले आहेत. तसेच रिपोर्टनुसार साल 2025 पर्यंत इंडियन ऑनलाइन गेमर्सची संख्या 70 कोटींच्या आसपास जाऊ शकते.

The post ऑनलाइन गेम खेळणं होणार महाग, द्यावा लागणार 28% टॅक्स! PUBG, BGMI आणि Dream11 सारख्या गेम्सवर होणार परिणाम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/28-percent-tax-on-online-gaming-in-india/feed/ 0
BGMI गेम अँड्रॉइड आणि आयओएसवर कसा करायचा डाउनलोड, जाणून घ्या नवीन अपडेटची माहिती https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-bgmi-on-android-and-ios-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-bgmi-on-android-and-ios-in-marathi/#respond Tue, 30 May 2023 11:21:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21252 बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया अर्थात BGMI आता भारतात डाउनलोड आणि खेळण्यासाठी उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर डेव्हलपर Krafton नं गेमसाठी 2.5 अपडेट देखील जारी केला आहे, ज्याची युजर अनेक महिने वाट बघत होते. BGMI चं नवीन व्हर्जन जुन्या व्हर्जनच्या तुलनेत थोडं वेगळं आहे. BGMI अ‍ॅप गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरून डाउनलोड करू शकता. चला जाणून […]

The post BGMI गेम अँड्रॉइड आणि आयओएसवर कसा करायचा डाउनलोड, जाणून घ्या नवीन अपडेटची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया अर्थात BGMI आता भारतात डाउनलोड आणि खेळण्यासाठी उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर डेव्हलपर Krafton नं गेमसाठी 2.5 अपडेट देखील जारी केला आहे, ज्याची युजर अनेक महिने वाट बघत होते. BGMI चं नवीन व्हर्जन जुन्या व्हर्जनच्या तुलनेत थोडं वेगळं आहे. BGMI अ‍ॅप गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरून डाउनलोड करू शकता. चला जाणून घेऊया Android आणि iOS डिवाइसवर अ‍ॅप डाउनलोड करण्याची पद्धत.

BGMI गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करण्याची पद्धत

अँड्रॉइड डिवाइसवर बीजीएमआय गेम डाउनलोड करायचा असेल तर पुढील स्टेप फॉलो कराः

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर ओपन करा आणि तिथे BGMI सर्च करा.
  • बीजीएमआय अ‍ॅपच्या खाली इंस्टॉलचा बटन दिसेल त्यावर टॅप करून अ‍ॅप डाउनलोड करू शकता.
  • गेम डाउनलोड करण्याआधी तुमच्या फोनमध्ये पुरेशी स्टोरेज आहे की नाही ते तपासलं जाईल.
  • ते झाल्यावर गेम तुमच्या डिवाइसवर डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.
  • डाउनलोड आणि इंस्टॉलेशनची प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहा.

iOS डिवाइसवर बीजीएमआय डाउनलोड करण्याची पद्धत

तुमच्या आयफोन (iPhone) किंवा आयपॅड (iPad) वर BGMI डाउनलोड करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

  • सर्वप्रथम तुमच्या आयफोन किंवा आयपॅडवर बीजीएमआय अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅपल अ‍ॅप स्टोर ओपन करा.
  • इथे सर्च बॉक्समध्ये BGMI लिहून सर्च करा. किंवा तुम्ही थेट ह्या लिंकच्या माध्यमातून देखील बीजीएमआय पेजवर जाऊ शकता.
  • त्यानंतर डाउनलोड आणि इंस्टॉलेशन प्रक्रिया सुरु करण्यासाठी इंस्टॉल बटनवर टॅप करा.
  • डिवाइसवर गेम डाउनलोड आणि इंस्टॉल होण्याची वाट पाहा.
  • एकदा इंस्टॉलेशन झाल्यावर तुम्ही सहज गेम खेळू शकता.

बीजीएमआय एपीके फाईल अँड्रॉइडवर कशी डाउनलोड करायची

जर तुम्ही एपीके फाईलच्या माध्यमातून बीजीएमआय अ‍ॅप अँड्रॉइड डिवाइसवर इंस्टॉल करू इच्छित असाल तर तर पुढील स्टेप फॉलो करा:

  • तुमच्या अँड्रॉइड डिवाइसवर वेब ब्राउजर ओपन करा.
  • एपीके फाईल डाउनलोड करण्यासाठी अधिकृत बीजीएमआय वेबसाइट किंवा एपीके मिरर सारख्या विश्वसनीय अ‍ॅप स्टोर वर जा.
  • सर्च बारमध्ये बीजीएमआय लिहून सर्च करा.
  • क्राफ्टन (Krafton) च्या अधिकृत बीजीएमआय अ‍ॅपवर क्लिक करा.
  • फाईलच्या प्रामाणिकतेसाठी अ‍ॅप डिटेल, रिव्यूज, रेटिंग इत्यादी तपासून घ्या.
  • त्यानंतर डाउनलोड किंवा इंस्टॉल बटनवर क्लिक करा.
  • डाउनलोड आणि इंस्टॉलेशनची प्रक्रिया पूर्ण होऊ द्या.
  • गेम इंस्टॉल झाल्यावर बीजीएमआय लाँच करता येईल. अकाऊंट सेटअप करून खेळण्यासाठी ऑन-स्क्रीन निर्देश पाळा.

चेक करा डिवाइस BGMI साठी रेडी आहे की नाही

बीजीएमआय अँड्रॉइड डिवाइसवर खेळायचा असेल तर डिवाइसमध्ये पुढील स्पेसिफिकेशन आवश्यक असावेत:

मोबाइल ओएस : अँड्रॉइड

व्हर्जन : Android 4.3 किंवा त्यावरील

जीपीयू : एड्रेनो (टीएम) 306 किंवा त्या वरील

रॅम : कमीत कमी 1.5 जीबी रॅम

बीजीएमआय आयओएस डिवाइसवर खळण्यासाठी डिवाइसमध्ये पुढील स्पेसिफिकेशन आवश्यक:

आयफोन: iOS 9.0 किंवा त्यानंतरचे व्हर्जन

आयपॅड: iPadOS 9.0 किंवा त्यानंतरचे व्हर्जन

आईपॉड टच: आयओएस 9.0 किंवा त्यानंतरचे व्हर्जन

रॅम: कमीत कमी 2 जीबी रॅम

बीजीएमआय डाउनलोड साइज

जर तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून नवीन बीजीएमआय गेम डाउनलोड करता तेव्हा त्याचा आकार जवळपास 960 MB असतो. गेमच्या बेसिक फीचरसाठी डिवाइसमध्ये कमीत कमी 2जीबी जागा असावी. परंतु जेव्हा तुम्ही सर्व रिसोर्स पॅक, मॅप्स, ऑडियो सेटिंग्स इत्यादी डाउनलोड करता तेव्हा डाउनलोड आकार खूप वाढतो.

The post BGMI गेम अँड्रॉइड आणि आयओएसवर कसा करायचा डाउनलोड, जाणून घ्या नवीन अपडेटची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-bgmi-on-android-and-ios-in-marathi/feed/ 0
खुशखबर : BGMI Unban कंपनीनं केलं कंफर्म, पुन्हा खेळता येणार हा मोबाइल गेम, भारतात करता येणार डाउनलोड https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-in-india-confirmed-by-krafton/ https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-in-india-confirmed-by-krafton/#respond Fri, 19 May 2023 09:29:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21029 BGMI म्हणजे BATTLEGROUNDS MOBILE INDIA संबंधित बातमी समोर आली आहे. हा मोबाइल गेम पुन्हा भारतात पुनरागमन करणार आहे. बीजीएमआयची ही माहिती गेम डेव्हलपर कंपनी KRAFTON नं दिली आहे. क्राफ्टननं स्पष्ट केलं आहे की ते गेम ऑपरेशन भारतात पुन्हा सुरु करणार आहेत. पुढे तुम्ही कंपनीचं निवेदन वाचू शकता. कंपनीचं विधान KRAFTON चे सीईओ Sean Hyunil Sohn […]

The post खुशखबर : BGMI Unban कंपनीनं केलं कंफर्म, पुन्हा खेळता येणार हा मोबाइल गेम, भारतात करता येणार डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा गेम लवकरच डाउनलोडसाठी उपलब्ध होईल.
  • KRAFTON CEO नी अधिकृत घोषणा केली आहे.
  • BGMI गेम भारतात जुलै 2022 को बॅन झाला होता.

BGMI म्हणजे BATTLEGROUNDS MOBILE INDIA संबंधित बातमी समोर आली आहे. हा मोबाइल गेम पुन्हा भारतात पुनरागमन करणार आहे. बीजीएमआयची ही माहिती गेम डेव्हलपर कंपनी KRAFTON नं दिली आहे. क्राफ्टननं स्पष्ट केलं आहे की ते गेम ऑपरेशन भारतात पुन्हा सुरु करणार आहेत. पुढे तुम्ही कंपनीचं निवेदन वाचू शकता.

कंपनीचं विधान

KRAFTON चे सीईओ Sean Hyunil Sohn यांनी अधिकृत निवेदन जाहीर करून सांगितलं आहे की ते BATTLEGROUNDS MOBILE INDIA (BGMI) भारतात रि-लाँच करणार आहेत. गेम पुन्हा लाँच करण्यासोबतच कंपनीच्या सीईओनी आपल्या विधानात भारत सरकार तसेच इंडियन गेमिंग कम्यूनिटीचे आभार व्यक्त केले आहेत.

कधी लाँच होईल बीजीएमआय

BGMI भारतात पुन्हा लाँच होत आहे ही बातमी तर कंपनीनं कंफर्म केली आहे परंतु हा गेम कधी उपलब्ध होईल, ही माहिती अद्याप देण्यात आली नाही. क्राफ्टन सीईओनं सांगितलं आहे की येत्या काही दिवसांत लवकरच हा Mobile Game भारतात डाउनलोडसाठी उपलब्ध होईल. आशा आहे की जूनपर्यंत मोबाइल युजर हा गेम भारतात पुन्हा खेळू शकतील.

BGMI वरील बंदीची कारणे

  • डेटा प्रायव्हसी
  • राष्ट्रीय सुरक्षेला धोका
  • लहान मुलांना व्यसन
  • चोरी आणि हिंसा

BATTLEGROUNDS MOBILE INDIA नं भारतात खूप प्रसिद्धी मिळवली होती. परंतु प्रसिद्धीनंतर युजर्सच्या डेटा प्रायव्हसीच्या घटना समोर येऊ लागल्या होत्या. अशा बातम्या आल्या होत्या की ह्या गेमचे सर्व्हर चीनमध्ये आहेत आणि तिथून भारतीयांचा डेटा चोरला जात आहे. युजर्सच्या प्रायव्हसी सोबतच हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक गेम असल्याचं सांगण्यात आलं होतं.

तसेच PUBG Mobile आणि BGMI गेममध्ये अपग्रेड करण्यासाठी तसेच वरच्या लेव्हलवर जाण्यासाठी अनेक युजर्स विचार न करता पैसे खर्च करत होते. मुलं पालकांकडून पैसे चोरत होते. तसेच गेम ना खेळू दिल्यास मुलं हिंसक होत असल्याच्या घटना देखील समोर आल्या होत्या.

The post खुशखबर : BGMI Unban कंपनीनं केलं कंफर्म, पुन्हा खेळता येणार हा मोबाइल गेम, भारतात करता येणार डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-in-india-confirmed-by-krafton/feed/ 0
PUBG आणि BGMI वाल्या कंपनीनं भारतात लाँच केला नवा गेम; जाणून घ्या गेम प्ले आणि नाव https://www.91mobiles.com/marathi/pubg-bgmi-maker-krafton-released-new-game-in-india-defense-derby/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-bgmi-maker-krafton-released-new-game-in-india-defense-derby/#respond Fri, 28 Apr 2023 07:25:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20554 PUBG आणि BGMI इंडियन गेमिंग इंडस्ट्रीचे असे गेम्स आहेत ज्यांनी लाखो लोकांना वेड लावलं होतं. हे दोन्ही सुपरहिट मोबाइल गेम्स बनवणाऱ्या कंपनी Krafton नं आता भारतात अजून एक नवीन गेम रिलीज केला आहे. हा डिफेंस डर्बी (Defense Derby) Game नावानं लाँच करण्यात आला आहे जो गुगल प्ले स्टोर (Google Play) वर डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे. […]

The post PUBG आणि BGMI वाल्या कंपनीनं भारतात लाँच केला नवा गेम; जाणून घ्या गेम प्ले आणि नाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • नवीन गेमचं नाव Defense Derby आहे.
  • हा Google Play वरून डाउनलोड करता येईल.
  • 11 मे पर्यंत याचं प्रीव्यू व्हर्जन उपलब्ध असेल.

PUBG आणि BGMI इंडियन गेमिंग इंडस्ट्रीचे असे गेम्स आहेत ज्यांनी लाखो लोकांना वेड लावलं होतं. हे दोन्ही सुपरहिट मोबाइल गेम्स बनवणाऱ्या कंपनी Krafton नं आता भारतात अजून एक नवीन गेम रिलीज केला आहे. हा डिफेंस डर्बी (Defense Derby) Game नावानं लाँच करण्यात आला आहे जो गुगल प्ले स्टोर (Google Play) वर डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे.

Defense Derby गेम Krafton द्वारे रिलीज करण्यात आला आहे ज्याची निर्मिती स्वतंत्र स्टूडियो राइजिंगविंग्सनं केली आहे. कंपनीनं सध्या या गेमचं प्रीव्यू व्हर्जन जारी केलं आहे जो अर्ली अ‍ॅक्सेससाठी उपलब्ध झाला आहे. येत्या 11 मेपर्यंत डिफेंस डर्बीचं हे प्रीव्यू व्हर्जन गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड व इन्स्टाल करता येईल. हे देखील वाचा: 6,000mAh battery सह लाँच झाला Infinix Hot 30 Play; जाणून घ्या किंमत

कसा आहे डिफेंस डर्बीचा गेम प्ले

सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की Defense Derby गेम PUBG आणि BGMI सारखा अजिबात नाही. हा एक स्ट्रॅटेजी गेम आहे तर बीजीएमआय आणि पबजी मोबाइल बॅटल रॉयल-स्टाइल गेम होते. डिफेंस डर्बीमध्ये टॉवर डिफेंस शैलीचा वापर करण्यात आला आहे. म्हणजे प्लेयर्सना एक ठराविक लक्ष्य दिलं जाईल ज्याची सुरक्षा करावी लागेल.

डिफेंस डर्बीमध्ये एक साथ 4 प्लेयर एक संघात खेळू शकतात. प्रत्येक राउंडमध्ये चारही खेळाडूंना स्काउटिंगच्या माध्यमातून कार्ड्स दिले जातील आणि या कार्ड्सचा वापर करून त्यांना डेक बनवावा लागेल. हा डेक मॉन्स्टर म्हणजे राक्षसांपासून वाचण्यासाठी बनवला जाईल. जोपर्यंत संघातील सर्व खेळाडू मरत नाहीत तोपर्यंत गेम सुरु राहील.

मोफत खेळात येईल डिफेंस डर्बी गेम

Krafton नं Defense Derby ‘फ्री गेम’ श्रेणी अंतगर्त लाँच केला आहे. हा गेम Google Play वर उपलब्ध झाला आहे जिथे हा मोफत डाउनलोड करता येईल. वर सांगितल्याप्रमाणे या गेमचं प्रीव्यू व्हर्जन आलं आहे, परंतु नंतर फुल व्हर्जन रिलीज झाल्यानंतर देखील डिफेंस डर्बी गेम पूर्णपणे फ्री राहील. हे देखील वाचा: OPPO F23 Pro 5G भारतात 15 मेला होऊ शकतो लाँच; किंमत आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर

क्राफ्टननं इंडियन युजर्ससाठी एक्सक्सूलिव्ह गिफ्ट्स देखील गेममध्ये ठेवले आहेत. यात अर्ली अ‍ॅक्सेस टेस्टिंग करणाऱ्या खेळाडूंसाठी 700 रुपयांचे गेम रिवॉर्ड मिळत आहेत. या रिवॉर्ड्समध्ये 2500 क्रिस्टल, 500 गोल्ड, 500 एलिक्सिर आणि 500 मॅनास्टोनचा समावेश आहे.

The post PUBG आणि BGMI वाल्या कंपनीनं भारतात लाँच केला नवा गेम; जाणून घ्या गेम प्ले आणि नाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-bgmi-maker-krafton-released-new-game-in-india-defense-derby/feed/ 0
भारतीय कंपनी घेऊन येतेय PUBG Mobile आणि BGMI सारखा गेम; Indus Battle Royale चं रजिस्ट्रेशन सुरु https://www.91mobiles.com/marathi/indian-company-will-soon-launch-pubg-mobile-and-bgmi-like-game-indus-battle-royale/ https://www.91mobiles.com/marathi/indian-company-will-soon-launch-pubg-mobile-and-bgmi-like-game-indus-battle-royale/#respond Fri, 27 Jan 2023 07:41:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17284 इंडियन गेमिंग कंपनी SuperGaming नं घोषणा केली आहे की ते लवकरच स्वदेशी बॅटल रोयाल (Battle Royale) व्हिडीओ गेम Indus Battle Royale सादर करणार आहेत. या गेमचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. Indus Battle Royale च्या गेमप्लेचा ट्रेलर पाहून युजर्सना ‘इंडो फ्यूचरिस्टिक’ बॅटल रोयालचा एक्सपीरियंस मिळेल अशी अपेक्षा आहे. तसेच ट्रेलरमध्ये जबरदस्त ग्राफिक्स देखील आहेत. ट्रेलरच्या […]

The post भारतीय कंपनी घेऊन येतेय PUBG Mobile आणि BGMI सारखा गेम; Indus Battle Royale चं रजिस्ट्रेशन सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Indus Battle Royale गेम भारतीय कंपनी SuperGaming नं डेव्हलप केला आहे.
  • Indus Battle Royale गेम PUBG Mobile आणि BGMI सारखा असेल.
  • इंडियन बॅटल रोयाल गेमसाठी Google Play Store वर प्री-रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे.

इंडियन गेमिंग कंपनी SuperGaming नं घोषणा केली आहे की ते लवकरच स्वदेशी बॅटल रोयाल (Battle Royale) व्हिडीओ गेम Indus Battle Royale सादर करणार आहेत. या गेमचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. Indus Battle Royale च्या गेमप्लेचा ट्रेलर पाहून युजर्सना ‘इंडो फ्यूचरिस्टिक’ बॅटल रोयालचा एक्सपीरियंस मिळेल अशी अपेक्षा आहे. तसेच ट्रेलरमध्ये जबरदस्त ग्राफिक्स देखील आहेत. ट्रेलरच्या शेवटी कंपनीनं सांगितलं आहे की या गेमवर सध्या काम सुरु आहे.

Indus गेम प्री रजिस्ट्रेशन उपलब्ध

अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी गेमचं प्री-रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे. कंपनीच्या मते, iPhone साठी लवकरच प्री-रजिस्ट्रेशन सुरु होईल. इथे आम्ही तुम्हाला इंडस गेमसाठी प्री रजिस्ट्रेशन कसं करायचं याची माहिती दिली आहे. हे देखील वाचा: महिनाभराची वैधता आणि 60GB डेटा; Airtel ने लाँच केले दोन नवीन Monthly Plan

स्टेप 1: सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोर ओपन करा आणि Indus Battle Royale सर्च करा.

स्टेप 2: तुम्हाला सुपरगेमिंग एलजीचा Indus Battle Royale गेम मिळेल. यावर क्लिक करा आणि प्री-रजिस्ट्रेशन ऑप्शनवर टॅप करा.

स्टेप 3: गेम लाँच झाल्यावर ऑटोमेटिक इंस्टॉल बटनवर क्लिक करा. अशाप्रकारे तुमचं प्री-रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

What is Indus Battle Royale?

बॅटल रोयाल गेम Indus चा ट्रेलर पाहून समजलं आहे की हा गेम मोठ्या प्रमाणावर PUBG Mobile, Free Fire, Fortnite आणि BGMI सारखा आहे. यात प्लेयर्स मॅच जिंकण्यासाठी एयरोप्लेननं ‘MAP’ वर उतरतात आणि फायनल प्राइजसाठी युद्ध करतात. इंडस गेमच्या डेव्हलपर्सनुसार “मिथवॉकर (Mythwalker) म्हणून या इंडो-फ्यूचरिस्टिक बॅटलग्राउंड वीरलोक तसेच पॅरागन्स आणि आमच्या कॅरेक्टर्सच्या स्किनची ही पहिली झलक आहे.” या ट्रेलरमध्ये कंपनीनं आपल्या गेममधील व्हेपन, गियर, कंज्यूमेबल्सची झलक दाखवली आहे.

Indus गेमचा ट्रेलर इंडियन क्लासिक आणि हिप-हॉप मिक्स म्यूजिकनं सुरु होतो. तसेच गेमचे कॅरेटर आदम, आद्या, सिर-ताज, बिग-गजची एंट्री होते. गेमचे ग्राफिक्स पाहता खूप कलरफुलर दिसत आहेत जे इंडियन टचसह येतात. तसेच यात फ्यूचरिस्टिक एलिमेंट्स मिळतात. हे देखील वाचा: OPPO Reno 8T च्या लाँचची तारीख ठरली; शानदार कॅमेरा असल्याचा कंपनीचा दावा

हा गेम पुण्यातील इंडियन गेमिंग कंपनी SuperGaming ने डेव्हलप केला आहे. गेममध्ये प्लेयर्स Mythwalker च्या रूपात खेळतील जो इंटरगॅलेक्टिक सिंडिकेट COVEN साठी काम करत आहे. तुम्हाला एक दुर्लभ प्राकृतिक खनिज Cosmium गोळा करायचं आहे जो वेळावेळी जागा बदलू शकतो. या ट्रेलरमधून गेमच्या कॅरेक्टर, कॉस्मियम, लूट सिस्टम, गेमप्ले (Indus Battle Royale GamePlay) आणि मॅपची झलक दिसते.

The post भारतीय कंपनी घेऊन येतेय PUBG Mobile आणि BGMI सारखा गेम; Indus Battle Royale चं रजिस्ट्रेशन सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/indian-company-will-soon-launch-pubg-mobile-and-bgmi-like-game-indus-battle-royale/feed/ 0
BGMI गेमच भारतीय Google Play Store वर होऊ शकतं पुनरागमन; गेमर्सचा दावा https://www.91mobiles.com/marathi/bgmi-game-to-be-relaunched-in-india-in-january-2023-will-return-to-google-play-store-first/ https://www.91mobiles.com/marathi/bgmi-game-to-be-relaunched-in-india-in-january-2023-will-return-to-google-play-store-first/#respond Sat, 31 Dec 2022 03:34:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16546 BGMI (बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया) च्या भारतीय पुनरागमनाच्या तयारीला वेग आला आहे. भारत सरकारनं या गेमववर यावर्षी जुलै 2022 मध्ये बंदी घातली होती. बॅननंतर हा गेम गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवर उपलब्ध नाही. क्राफ्टननुसार ते भारत सरकार सोबत बोलणी करून गेमच्या रीलाँचसाठी काम करत आहे. बीजीएमआय गेमवरील बंदी हटवण्याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली […]

The post BGMI गेमच भारतीय Google Play Store वर होऊ शकतं पुनरागमन; गेमर्सचा दावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
BGMI (बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया) च्या भारतीय पुनरागमनाच्या तयारीला वेग आला आहे. भारत सरकारनं या गेमववर यावर्षी जुलै 2022 मध्ये बंदी घातली होती. बॅननंतर हा गेम गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवर उपलब्ध नाही. क्राफ्टननुसार ते भारत सरकार सोबत बोलणी करून गेमच्या रीलाँचसाठी काम करत आहे. बीजीएमआय गेमवरील बंदी हटवण्याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही. परंतु काही गेमिंग कंटेंट क्रिएटर्सनी दावा केला आहे की हे गेम Google Play Store वर पुढील महिन्यात उपलब्ध होऊ शकतो. AFKGaming च्या प्रतीक “Alpha Clasher” जोगिया आणि सोहेल “Hector” शेख यांनी दावा केला आहे की BGMI लवकरच अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर पुनरागमन करू शकतो.

बीजीएमआय प्लेयर Alpha Clasher नं अजून एक प्लेयर Predatorsasuke सोबत मिळून एक लाइव्ह स्ट्रीम केलं होतं. या लाइव्हस्ट्रीममध्ये दावा करण्यात आला आहे की ते Google च्या माध्यमातून BGMI गेमच्या इंडिया रिलाँचची डेट देखील शेयर केली आहे. त्यांनी या लाइव्ह स्ट्रीममध्ये म्हटलं आहे की BGMI गेम 15 जानेवारीला Google Play Store वर परत येत आहे. हे देखील वाचा: थिएटर गाजवल्यानंतर अजय देवगणचा Drishyam 2 आता OTT वर; या प्लॅटफॉर्मवर झाला रिलीज

bgmi

BGMI चं भारतात पुनरागमन

या लाइव्ह स्ट्रीम नंतर Hector नं आपल्या स्ट्रीममध्ये BGMI च्या पुनरागमन बाबत म्हटलं की हा गेम गुगलवर जानेवारीमध्ये रिलाँच होऊ शकतो. त्याने पुढे म्हटलं की ही माहिती त्याला स्वतःला थेट मिळाली नाही परंतु त्याला याबाबत गुगलमध्ये एका टॉप पोजिशनमध्ये काम करणाऱ्या तरुणाकडून गेमच्या भारतातील पुनरागमनाची माहिती मिळाली आहे. या व्यक्तीनं सांगितलं की गेमचे पुनरागमन 15 जानेवारीला होऊ शकते. Hector नं पुढे सांगितलं की कंपनी या गेमच्या रिलाँच पूर्वी दोन आठवड्यांपूर्वी टीज करण्यास सुरुवात करेल.

BGMI च्या भारतातील पुनरागमनाबद्दल क्राफ्टन किंवा गुगलनं कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. त्यामुळे BGMI च्या या बातमीवर डोळे बंद करून विश्वास ठेवता येणार नाही. याआधी इंडियन गेमिंग कंपनी Skyesports चे CEO शिव नंदी यांनी BGMI आणि TikTok च्या इंडिया रिलाँच बद्दल दावा केला आहे की हे दोन अ‍ॅप 2023 मध्ये भारतात पुनरागमन करू शकतात. हे देखील वाचा: 420km च्या अफलातून रेंजसह लाँच झाली BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कार, इतकी आहे किंमत

MeitY अंतर्गत ऑनलाइन गेमिंग

गेले अनेक वर्ष ऑनलाइन गेमिंग उद्योगाचे नियमन करण्यासाठी इंडस्ट्री केंद्रीय स्तरावरील कायद्याची मागणी करत आहे. यंदा मे मध्ये MeitY नं ऑनलाइन गेमिंगच्या नियमनासाठी प्रस्ताव तयार केला आणि मंत्रालयाची टास्क फोर्स नेमली होती. या टास्क फोर्सनं ऑक्टोबरमध्ये केंद्रीय नोडल एजेंसीच्या निर्मितीची शिफारस केली होती. तसेच सांगितलं की ऑनलाइन गेमिंगमध्ये कोणत्या गेम्सचा समावेश असेल.

The post BGMI गेमच भारतीय Google Play Store वर होऊ शकतं पुनरागमन; गेमर्सचा दावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bgmi-game-to-be-relaunched-in-india-in-january-2023-will-return-to-google-play-store-first/feed/ 0
BGMI पुन्हा भारतात आणण्यासाठी कंपनी प्रयत्नशील; सरकारशी चर्चा सुरु https://www.91mobiles.com/marathi/when-will-bgmi-return-to-india-krafton-planing-and-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/when-will-bgmi-return-to-india-krafton-planing-and-check-details/#respond Mon, 19 Dec 2022 06:37:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16117 Krafton नं PUBG (PlayerUnknown’s Battlegrounds) चा इंडियन व्हेरिएंट BGMI (Battlegrounds Mobile India) सप्टेंबर 2020 मध्ये लाँच करण्यात आला होता. हा भारतात काही काळ टॉप मोबाइल बॅटल रॉयल गेम्स पैकी एक बनला होता. परंतु लाँच नंतर एक वर्षातच भारत सरकारनं राष्ट्रीय सुरक्षेचा कारण देऊन या गेमवर बंदी घातली. बॅन होताच हा गेम गुगल प्ले स्टोर आणि […]

The post BGMI पुन्हा भारतात आणण्यासाठी कंपनी प्रयत्नशील; सरकारशी चर्चा सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Krafton नं PUBG (PlayerUnknown’s Battlegrounds) चा इंडियन व्हेरिएंट BGMI (Battlegrounds Mobile India) सप्टेंबर 2020 मध्ये लाँच करण्यात आला होता. हा भारतात काही काळ टॉप मोबाइल बॅटल रॉयल गेम्स पैकी एक बनला होता. परंतु लाँच नंतर एक वर्षातच भारत सरकारनं राष्ट्रीय सुरक्षेचा कारण देऊन या गेमवर बंदी घातली. बॅन होताच हा गेम गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवरून हटवण्यात आला. इंडिया टूडे टेकशी बोलताना कंपनीनं कंफर्म केलं आहे की ते गेम पुन्हा भारतात आणण्यासाठी कंपनी सरकारशी चर्चा करत आहेत.

दक्षिण कोरियन कंपनी Krafton बॅटल रोयाल गेम PUBG ची डेव्हलपर आहे. या गेमची पब्लिशर चिनी आयटी फर्म Tencent आहे. परंतु भारतात बॅन झाल्यानंतर क्राफ्टननं बीजीएमआय पब्लिश करण्याची जबाबदारी घेतली. हा गेम भारत सरकारनं 28 जुलैला सुरक्षेच्या कारणांमुळे बॅन केला. बॅन केल्यापासून ऑफिशियल अ‍ॅप स्टोरवर हा गेम उपलब्ध नाही. परंतु ज्या युजर्सच्या फोनमध्ये हे अ‍ॅप आहे ते हा गेम खेळू शकतात. बॅन झाल्यापासून या गेमच्या पुनरागमनाची वाट बघितली जात आहे. हे देखील वाचा: स्वदेशी कंपनीची कमाल! चिनी कंपन्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी 6,999 रुपयांमध्ये दमदार स्मार्टफोन

बीजीएमआयचं पुनरागमन होणार का?

BGMI वरील बंदी नंतर Krafton नं ऑफिशियल स्टेटमेंट जारी करून सांगतील आहे की, कंपनी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि इंफॉरमेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय (MeitY) शी सतत बोलणी करत आहे. इंडिया टूडे टेकशी बोलताना कंपनीनं कंफर्म केलं आहे की ते गेम पुन्हा यावा याविषयी चर्चा करत आहेत.

अनेक युट्युबर्स आणि गेमिंग पर्सनॅलिटीनुसार, BGMI गेम भारतात 2022 च्या अखेरीस किंवा 2023 च्या सुरुवातीला पुनरागमन करू शकतो. तर क्राफ्टन देखील सरकार सोबत मिळून BGMI गेम भारतात पुन्हा आणण्याची तयारी करत असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. परंतु या गेमच्या रिलाँच बद्दल ठोस माहिती मात्र मिळाली नाही. हे देखील वाचा: एकच नंबर! 14 हजारांच्या रेंजमध्ये Samsung चा 5G Phone; अशी आहे ऑफर

दोन नवीन गेम घेऊन येतेय क्राफ्टन

बीजीएमआय आणि पबजी मोबाइल निर्माता क्राफ्टननं भारतीय चाहत्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. कंपनीनं भारतीय बाजारात दोन नवीन गेम घेऊन येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुढील वर्षीच्या कंपनी सुरुवातीला दोन गेम – द कॅलिस्टो प्रोटोकॉल आणि डिफेंस डर्बी लाँच करण्याची योजना बनवत आहे. म्हणजे पबजी आणि बीजीएमआयची निर्मिती करणारी दक्षिण कोरियन कंपनी क्राफ्टन लवकरच भारतात आणखी 2 नवीन गेम लाँच जाणार आहे.

BGMI आणि PUBG Mobile ची निर्मिती करणाऱ्या क्राफ्टननं भारतीय फॅन्ससाठी ही गुड न्यूज शेयर केली आहे. त्यानुसार क्राफ्टन भारतात दोन नवीन गेम लाँच करणार आहे. हे गेम कसे असतील, हे देखील बॅटल रोयाल पद्धतीचे असतील का? की यांची पद्धत वेगळी असेल, हे मात्र अद्याप समोर आलं नाही. परंतु Krafton नं सांगितलं आहे की भारतात दोन नवीन गेम – The Callisto Protocol (द कॅलिस्टो प्रोटोकॉल) आणि Defense Derby (डिफेंस डॉर्बी) लाँच केले जातील.

The post BGMI पुन्हा भारतात आणण्यासाठी कंपनी प्रयत्नशील; सरकारशी चर्चा सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/when-will-bgmi-return-to-india-krafton-planing-and-check-details/feed/ 0
Battlegrounds Mobile India Download: लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करा, लवकरच बॅन होणार रद्द! https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-download-download-bgmi-latest-apk-file/ https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-download-download-bgmi-latest-apk-file/#respond Tue, 01 Nov 2022 06:29:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14500 Battlegrounds Mobile India Download: ऑनलाइन मोबाइल गेम BGMI वरील बंदी लवकरच हटवली जाऊ शकते, त्यामुळे तुम्ही लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करू शकता. भारत सरकारनं देश आणि नागरिकांच्या डेटा सिक्योरिटीचं कारण देत जुलै 2022 मध्ये BGMI वर बंदी घातली होती. तेव्हापासून हा गेम Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध नाही. प्लेयर्स हा […]

The post Battlegrounds Mobile India Download: लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करा, लवकरच बॅन होणार रद्द! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Battlegrounds Mobile India Download: ऑनलाइन मोबाइल गेम BGMI वरील बंदी लवकरच हटवली जाऊ शकते, त्यामुळे तुम्ही लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करू शकता. भारत सरकारनं देश आणि नागरिकांच्या डेटा सिक्योरिटीचं कारण देत जुलै 2022 मध्ये BGMI वर बंदी घातली होती. तेव्हापासून हा गेम Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध नाही. प्लेयर्स हा गेम फोनमध्ये थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड करू शकतात. इथे आम्ही तुम्हाला लेटेस्ट BGMI Apk फाईल डाउनलोड करण्याची आणि इंस्टॉल करण्याची सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहोत. आम्ही तुम्हाला Battlegrounds Mobile India संबंधित लेटेस्ट माहिती देत आहोत.

Battlegrounds Mobile India Download: download BGMI Latest APK file

इथे आम्ही तुम्हाला बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) की लेटेस्ट अँड्रॉइड APK फाईल डाउनलोड करण्याची प्रत्येक स्टेप सांगत आहोत.

स्टेप 1: BGMI गेमची लेटेस्ट APK फाईल थर्ड पार्टी वेबसाइट Apkpure वरून डाउनलोड करता येईल. ही वेबसाइट ओपन करण्यासाठी इथे क्लिक करा.

स्टेप 2: उपरोक्त लिंकवरून तुम्ही BGMI ची लेटेस्ट APK फाईल डाउनलोड करू शकता. इथे तुम्हाला ‘See Available Downloads’ ऑप्शन दिसतील. इथे क्लिक करून तुम्ही फाईल डाउनलोड करू शकता.

स्टेप 3: BGMI Apk फाईल डाउनलोड झाल्यानंतर ती ओपन करा आणि इसंटॉल करा. यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोनवर अनोन सोर्स इनेबल करावं लागेल.

नोट: थर्ड पार्टी वेबसाइटवरून अ‍ॅप डाउनलोड करणं तुमच्या डिवाइससाठी धोकादायक ठरू शकतं. शक्य असल्यास थर्ड पार्टी सोर्सवरून अ‍ॅप डाउनलोड करणं टाळावं. हे आर्टिकल फक्त माहिती देण्यासाठी लिहिण्यात आलं आहे. भारत सरकारनं हा गेम भारतात बॅन केला आहे. त्यामुळे हा न डाउनलोड करणं उत्तम. नेहमी अ‍ॅप Google Play Store किंवा ऑफिशियल वेबसाइटवरूनच डाउनलोड करा. हे देखील वाचा: 4 कॅमेऱ्यांसह आला भन्नाट स्मार्टफोन; 6GB रॅमसह 5000mAh ची दमदार बॅटरी

BGMI वरील बंदी लवकरच हटू शकते

BGMI वरील बंदी लवकरच रद्द केली जाऊ शकते, अशी बातमी आली आहे. काही दिवसांपूर्वी क्राफ्टननं आपल्या ऑफिशियल वेबसाइटवरील सपोर्ट पेज अपडेट केला आहे. तसेच एक नवीन युट्युब चॅनेल देखील बनवला आहे. यात BGMI प्लेयर्ससाठी आर्टिकल अपडेट करण्यात आले आहेत. तसेच अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की लवकरच BGMI वरील बंदी हटवण्यात येऊ शकते. हे देखील वाचा: स्वदेशी इलेक्ट्रिक स्कूटर्सना टक्कर देण्यासाठी येतेय तैवानची बॅटरी असलेली स्कूटी; जाणून घ्या किंमत आणि रेंज

BGMI चिनी अ‍ॅप आहे का?

BGMI गेम क्राफ्टन कंपनी डेवलप आणि पब्लिश करते, जी दक्षिण कोरियाची कंपनी आहे. क्राफ्टनमध्ये चिनी टेक आणि गेमिंग कंपनी Tencent ची 13.5 टक्के भागेदारी आहे. सुरुवातीला भारतात Tencent च PUBG Mobile ची पब्लिशर होती. PUBG Mobile वरील बॅन नंतर क्राफ्टननं भारतात BGMI लाँच केला आणि पब्लिकेशन देखील स्वतः केलं, जो पुन्हा बॅन करण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Battlegrounds Mobile India Download: लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करा, लवकरच बॅन होणार रद्द! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/battlegrounds-mobile-india-download-download-bgmi-latest-apk-file/feed/ 0
PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी व्हा आणि जिंका अमेजिंग प्राइज https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-halloween-party-win-amazing-and-crazy-prize/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-halloween-party-win-amazing-and-crazy-prize/#respond Tue, 25 Oct 2022 07:39:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14268 PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी होऊन बक्षीसं जिंकण्याची शानदार संधी आहे. पबजी मोबाइल हॅलोविन सीजन, लेव्हल इनफिनिट, पबजी मोबाइल प्लेयरसाठी अमेजिंग आणि क्रेजी कंटेंट घेऊन येत आहे. पबजीचा हा भीतीदायक सीजन आहे. पबजी मोबाइलच्या कॉस्टयूम फ्रेटफेस्ट स्पर्धेत प्लेयर्स PUBG मोबाइलमध्ये हॅलोविन कॉस्ट्यूम शो करू शकतील. इथे आम्ही तुम्हाला पबजी मोबाइलच्या हॅलोविन […]

The post PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी व्हा आणि जिंका अमेजिंग प्राइज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी होऊन बक्षीसं जिंकण्याची शानदार संधी आहे. पबजी मोबाइल हॅलोविन सीजन, लेव्हल इनफिनिट, पबजी मोबाइल प्लेयरसाठी अमेजिंग आणि क्रेजी कंटेंट घेऊन येत आहे. पबजीचा हा भीतीदायक सीजन आहे. पबजी मोबाइलच्या कॉस्टयूम फ्रेटफेस्ट स्पर्धेत प्लेयर्स PUBG मोबाइलमध्ये हॅलोविन कॉस्ट्यूम शो करू शकतील. इथे आम्ही तुम्हाला पबजी मोबाइलच्या हॅलोविन इव्हेंटची माहिती देत आहोत. तसेच तुम्हाला PUBG Mobile च्या लेटेस्ट अपडेटची माहिती मिळेल.

PUBG Mobile Halloween Party: PUBG Mobile Halloween कॉस्ट्यूम कॉन्टेस्ट

इव्हेंट पीरियड – लास्ट डेट: 31 ऑक्टोबर 2022

प्राइज अनाउसमेंट : हॅलोविन इव्हेंट संपताच एक आठवड्यानंतर सोशल मीडिया साइट फेसबुक आणि ट्विटरवरून विजेत्यांची घोषणा केली जाईल. हे देखील वाचा: गुपचूप लाँच झाला सर्वात स्वस्त वनप्लस; स्वस्तात दमदार स्पेसीफाकेशन्ससह OnePlus Nord N300 5G ची एंट्री

PUBG Mobile Halloween Party: कोण सहभागी होऊ शकतं?

इरंगेल मॅप मध्ये “स्ट्रेंज टाउन” वर जा आणि क्लॉक टॉवर, सजावटीचा भोपळा, बाहुली हॉट एयर बॅलून, एंडीज बाहुली पैकी किंवा हॅलोविन सजावट असलेलं दुसरं ठिकाण शोध.

तुमच्या आवडीचा हॅलोविन पोशाख परिधान करा, तुमच्या आवडीचा पोल बनवा आणि सीजनच्या सजावटीचा स्क्रीनशॉट किंवा व्हिडीओ घ्या.

नोट: प्लेयर्स मॅचच्या आधी आल्या हॅलोविन वेशभूषेत तयार होऊ शकतात. तुम्ही मॅच दरम्यान त्यांना मारल्यानंतर शत्रूचे आउटफिट देखील बदलू शकता. जेव्हा तुमचा आउटफिट मॅचमध्ये कुठेही असू शकतो.

तुमचं मास्टरपीस इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हॅशटॅग #PUBGMFRIGHTFEST #PUBGMSTRANGETOWN आणि #contest सह @PUBGMOBILE पोस्ट करून स्पर्धेत सहभागी होता येईल.

बक्षीसं – या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होणाऱ्या प्लेयर्सना खालील प्राइज मिळतील.

विनर प्राइज – चार प्लेयर्सना मिळेल.

  • Corn Suit×1 (30d)
  • Corn Cover×1
  • (30d)

गोल्डल पंपकिन अवार्ड प्राइज दोन प्लेयर्सना मिळेल, ज्यांचा स्कोर सर्वात जास्त असेल हे देखील वाचा: 101 किमी रेंजसह लाँच झाली Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

  • Shark Cover ×1 (Permanent)
  • Noh Mask (Red) ×1 (Permanent)

नोट : PUBG Mobile आणि BGMI भारतात बॅन आहे. सरकारनं देशातील सुरक्षा आणि नागरिकांच्या प्रायव्हसीसाठी पबजी मोबाइल आणि बीजीएमआय गेम भारतात बॅन केले आहेत.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post PUBG Mobile Halloween Party: पबजी मोबाइल हॅलोविन पार्टीत सहभागी व्हा आणि जिंका अमेजिंग प्राइज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-halloween-party-win-amazing-and-crazy-prize/feed/ 0
BGMI Unban: PUBG च्या इंडिया व्हेरिएंटचं होणार दणक्यात पुनरागमन, लोकप्रिय युट्युबरनं केला दावा https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-youtuber-claims-india-return-date/ https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-youtuber-claims-india-return-date/#respond Mon, 17 Oct 2022 09:13:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14055 बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) वरील बंदी हटवण्याबाबत सकारात्मक बातमी समोर आली आहे. लोकपोरीया युट्युब चॅनल टेक्निकल गुरुजी (Technical Guruji) च्या गौरव चौधरीनं एक व्हिडीओ शेयर करून सांगितलं आहे की बीजीएमआय गेमचं भारतात पुनरागमन साल 2022 च्या शेवट्पर्यंत होऊ शकतं. Battlegrounds Mobile India (BGMI) गेमवर भारत सरकारनं जुलै 2022 मध्ये बंदी घातली होती. तेव्हापासून हा गेम […]

The post BGMI Unban: PUBG च्या इंडिया व्हेरिएंटचं होणार दणक्यात पुनरागमन, लोकप्रिय युट्युबरनं केला दावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) वरील बंदी हटवण्याबाबत सकारात्मक बातमी समोर आली आहे. लोकपोरीया युट्युब चॅनल टेक्निकल गुरुजी (Technical Guruji) च्या गौरव चौधरीनं एक व्हिडीओ शेयर करून सांगितलं आहे की बीजीएमआय गेमचं भारतात पुनरागमन साल 2022 च्या शेवट्पर्यंत होऊ शकतं. Battlegrounds Mobile India (BGMI) गेमवर भारत सरकारनं जुलै 2022 मध्ये बंदी घातली होती. तेव्हापासून हा गेम Apple App Store आणि Google App Store वर उपलब्ध झालेला नाही. Krafton चा बॅटल रोयाल गेम बॅन होऊन चार महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे चाहते हा गेम पुन्हा खेळण्याची आतुरतेने वाट बघत आहेत.

BGMI unban: टेक्निकल गुरुजीनं दिली माहिती

टेक्निकल गुरुजीच्या युट्युब व्हिडीओ सीरीज – WTF (Weekly Tech Focus) च्या 12व्या भागात गौरव चौधरीनं अनेक टॉपिक जसे की – ट्रंपचा ट्विटरवर पुनरागमन, जीबी व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम (GB WhatsApp Scam) आणि iPhone 14 क्रॅश डिटेक्शनची माहिती दिली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये त्याने बीजीएमआयच्या पुनरागमनावर देखील सविस्तर माहिती दिली आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची डोकेदुखी वाढवण्यासाठी Moto E22s ची एंट्री; अत्यंत कमी किंमतीत दमदार फीचर्स

या व्हिडीओ मध्ये टेक्निकल गुरुजीनं सांगितलं आहे की “आपण सर्व अनेक महिने बॅटलग्राउंड मोबाइल इंडियाच्या पुनरागमनाची वाट बघत आहात आणि आता आमच्याकडे एक तारीख आहे. पबजीचा इंडिया व्हेरिएंट बीजीएमआय गेम साल 2022 च्या शेवट्पर्यंत एका नवीन अवतारात पुनरागमन करू शकतो. तसेच गौरवनं आपल्या व्हिडीओमध्ये क्राफ्टन इंडियाचे हेड ऑफ कॉर्प डेव अँड इन्वेस्टमेंट्स (India & MENA) अनुज टंडन यांच्या जाण्याची माहिती देखील माहिती शेयर केली आहे. परंतु त्याने अनुज यांच्या राजीनाम्याबाबत कोणताही अंदाज लावला नाही.

ई-स्पोर्ट्स प्लेयरनं दिली माहिती

याआधी भारतातील लोकप्रिय ई-स्पोर्ट्स प्लेयर पीयूष स्पेरो बथलानं बीजीएमआयच्या भारतातील पुनरागमनाबद्दल माहिती शेयर केली आहे. त्याने आपल्या लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान सांगतील आहे की त्याचे मते क्राफ्टन लवकरच भारतात बीजीएमआय पुन्हा लाँच करू शकतं. हे देखील वाचा: मोबाइलच्या जागी साबणाच्या वड्या मिळू नये यासाठी काय करावं? Online Shopping करताना ‘या’ टिप्स फॉलो करा

पीयूषनुसार, सरकार आणि क्राफ्टन दरम्यान सुरु असलेल्या मीटिंगबद्दल सध्या कोणतीही खास बातमी समोर आली नाही, त्यामुळे आपण सतर्क राहील पाहिजे. या लाइव्ह स्ट्रीममध्ये तो पुढे म्हणाला की बीजीएमआयचे भारतात पुनरागमन डिसेंबर 2022 पर्यंत होऊ शकतं.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post BGMI Unban: PUBG च्या इंडिया व्हेरिएंटचं होणार दणक्यात पुनरागमन, लोकप्रिय युट्युबरनं केला दावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bgmi-unban-youtuber-claims-india-return-date/feed/ 0