Honor - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 24 Jul 2023 13:02:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Honor 90 सप्टेंबरमध्ये येऊ शकतो भारतात, दमदार स्पेसिफिकेशन्ससह लुकही शानदार https://www.91mobiles.com/marathi/honor-90-may-be-launched-in-india-in-september-specifications-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/honor-90-may-be-launched-in-india-in-september-specifications-revealed/#respond Mon, 24 Jul 2023 13:02:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22550 टेक्नॉलॉजी बाजारात एक खास स्थान बनवणारी ऑनर कंपनी पुन्हा एकदा भारतात येण्यासाठी तयार आहे. असं सांगितलं जात आहे की कंपनी आपल्या Honor 90 सीरीज अंतगर्त नवीन फोन भारतात लाँच करणार आहे. कंपनीनं ह्याबाबत कोणताही खुलासा केला नाही, परंतु प्रसिद्ध युट्युबरनं ऑनरच्या पुनरागमनची बातमी दिली आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकतो Honor […]

The post Honor 90 सप्टेंबरमध्ये येऊ शकतो भारतात, दमदार स्पेसिफिकेशन्ससह लुकही शानदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ऑनर कंपनी पुन्हा एकदा भारतात पदार्पण करणार आहे.
  • Honor 90 सीरीज अंतगर्त नवीन फोन लाँच होतील.
  • फोनच्या संपूर्ण अनबॉक्सिंगचा व्हिडीओ समोर आला आहे.

टेक्नॉलॉजी बाजारात एक खास स्थान बनवणारी ऑनर कंपनी पुन्हा एकदा भारतात येण्यासाठी तयार आहे. असं सांगितलं जात आहे की कंपनी आपल्या Honor 90 सीरीज अंतगर्त नवीन फोन भारतात लाँच करणार आहे. कंपनीनं ह्याबाबत कोणताही खुलासा केला नाही, परंतु प्रसिद्ध युट्युबरनं ऑनरच्या पुनरागमनची बातमी दिली आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकतो Honor 90

युट्युब चॅनेल टेक्निकल गुरुजीनं ऑनर स्मार्टफोनच्या पुनरागमनाची माहिती दिली आहे. नवीन अनबॉक्सिंग व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला आहे की Honor 90 स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये भारतात लाँच होऊ शकतो. व्हिडीओमध्ये लाँच डेट सांगण्यात आली नाही. परंतु फोनची अनबॉक्सिंग करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हा फोन भारतात येईल अशी चिन्ह दिसू लागली आहेत.

Honor 90 ची डिजाइन

व्हिडीओमध्ये दिसत आहे की Honor 90 क्वॉड कर्व डिजाइनसह येईल. डिस्प्लेवर पंच होल कटआउट देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर दोन वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश आहे. तसेच खालच्या बाजूला ऑनरची ब्रँडिंग देण्यात आली आहे. डिवाइसच्या उजवीकडे वॉल्यूम अप डाउन आणि पावर बटन देण्यात आला आहे.

Honor 90 चे स्पेसिफिकेशन्स (चिनी मॉडेल)

  • डिस्प्ले : डिवाइसमध्ये 1.5K रेजोल्यूशनसह 6.7 इंचाचा कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 3840Hz PWM डिमिंग सपोर्ट मिळतो.
  • प्रोसेसर : शानदार परफॉरमेंससाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे.
  • स्टोरेज : स्मार्टफोन 16GB पर्यंत रॅम + 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येतो.
  • कॅमेरा : हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअप आला आहे. ह्यात इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशन सपोर्टसह 200MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो. तसेच 12MP ची अल्ट्रा-वाइड कॅमेरा लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कालिंगसाठी 50MP चा सेन्सर आहे.
  • बॅटरी : स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • OS : Honor 90 अँड्रॉइड 13 आधारित मॅजिकयुआय 7.1 वर चालतो.
  • अन्य : डिवाइसमध्ये युजर्सना इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, वाय-फाय 6, यूएसबी टाइप-सी 2.0, ब्लूटूथ 5.2 सारखे अनेक फीचर्स मिळतात.
  • वजन आणि डायमेंशन : फोनचे वजन 183 ग्राम आणि डायमेंशन 161.9 x 74.1 x 7.8mm आहे.

The post Honor 90 सप्टेंबरमध्ये येऊ शकतो भारतात, दमदार स्पेसिफिकेशन्ससह लुकही शानदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-90-may-be-launched-in-india-in-september-specifications-revealed/feed/ 0
5,200mAh Battery सह आला Honor Play 40C 5G फोन, लवकरच होऊ शकते भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/5200mah-battery-smartphone-honor-play-40c-launched-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/5200mah-battery-smartphone-honor-play-40c-launched-know-price-and-specifications/#respond Mon, 17 Jul 2023 07:23:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22417 Honor phone भारतात रि-लाँच होऊ शकतात. रियलमीला सोडल्यानंतर माधव सेठ ऑनरशी जोडले जाऊ शकतात तसेच पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये ऑनर स्मार्टफोन्स भारतात लाँच केले जाऊ शकतात. भारतीय बाजारात येण्यापूर्वी ऑनरनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन Honor Play 40C लाँच केला आहे ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Honor Play 40C चे स्पेसिफिकेशन्स स्क्रीन […]

The post 5,200mAh Battery सह आला Honor Play 40C 5G फोन, लवकरच होऊ शकते भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Honor Play 40C चीनमध्ये लाँच झाला आहे.
  • हा ब्रँड भारतात रि-लाँच होऊ शकतो.
  • Madhav Sheth ऑनरला भारतात आणू शकतात.

Honor phone भारतात रि-लाँच होऊ शकतात. रियलमीला सोडल्यानंतर माधव सेठ ऑनरशी जोडले जाऊ शकतात तसेच पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये ऑनर स्मार्टफोन्स भारतात लाँच केले जाऊ शकतात. भारतीय बाजारात येण्यापूर्वी ऑनरनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन Honor Play 40C लाँच केला आहे ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Honor Play 40C चे स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : ऑनर प्ले 40सी स्मार्टफोन 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर : ह्या ऑनर फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 480प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जो मॅजिकओएस 7.1 सह चालतो.
  • रॅम : Honor Play 40C चायना मध्ये 6 जीबी रॅमसह लाँच झाला आहे. ह्या फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा मोबाइल सिंगल रियर आणि सिंगल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तसेच फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलची लेन्स आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ऑनर प्ले 40सी स्मार्टफोन 5,200एमएएचची मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 10वॉट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
  • अन्य फीचर्स : Honor Play 40C मध्ये ड्युअल सिम, 5जी, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएससह एनएफसी सारखे फीचर्स मिळतात. ह्या फोनची थिकनेस फक्त 8.35एमएम आणि वजन 188 ग्राम आहे.

Honor Play 40C ची किंमत

चीनी बाजारात हा ऑनर फोन सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. हा 6GB+128GB सह 899 युआन मध्ये विकत घेता येईल जे भारतीय करंसीनुसार 10,300 रुपये होतात. फोन चीनमध्ये Magic Night Black, Ink Jade Green आणि Sky Blue कलरमध्ये आला आहे. कदाचित Honor Play 40C पुढील महिन्यात भारतात देखील लाँच होऊ शकतो.

Honor देणार Realme-Redmi ला टक्कर?

ऑनर हुवावेचा सब-ब्रँड आहे. अद्याप कंपनीनं भारतात येण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही परंतु जर हा ब्रँड भारतीय बाजारात पुन्हा सक्रिय झाला तर ह्याच्या थेट फायदा सामान्य मोबाइल युजर्सना मिळेल. मार्केटमध्ये अजून एक मोबाइल ब्रँड उपलब्ध झाल्यामुळे Realme, Redmi, OPPO, Vivo आणि POCO जसे की ब्रँड्सच्या समोर आणखी एक प्रतिस्पर्धी येईल आणि स्पर्धा वाढेल.

The post 5,200mAh Battery सह आला Honor Play 40C 5G फोन, लवकरच होऊ शकते भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5200mah-battery-smartphone-honor-play-40c-launched-know-price-and-specifications/feed/ 0
64MP कॅमेरा आणि 66W फास्ट चार्जिंगसह Honor 80 SE 5G लाँच https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-phone-honor-80-se-5g-launched-know-price-specification-details/ https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-phone-honor-80-se-5g-launched-know-price-specification-details/#respond Thu, 24 Nov 2022 03:30:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15298 Honor नं आज टेक मार्केटमध्ये आपली नवीन ऑनर 80 सीरीज सादर केली आहे. या सीरीज अंतगर्त Honor 80 SE, Honor 80 आणि Honor 80 Pro स्मार्टफोन लाँच झाले आहेत जे शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येतात. ऑनर 80 एसई या सीरीजचा सर्वात अफॉर्डेबल स्मार्टफोन आहे जो 64MP Camera, 66W Charging, 12GB RAM आणि MediaTek Dimensity […]

The post 64MP कॅमेरा आणि 66W फास्ट चार्जिंगसह Honor 80 SE 5G लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Honor नं आज टेक मार्केटमध्ये आपली नवीन ऑनर 80 सीरीज सादर केली आहे. या सीरीज अंतगर्त Honor 80 SE, Honor 80 आणि Honor 80 Pro स्मार्टफोन लाँच झाले आहेत जे शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येतात. ऑनर 80 एसई या सीरीजचा सर्वात अफॉर्डेबल स्मार्टफोन आहे जो 64MP Camera, 66W Charging, 12GB RAM आणि MediaTek Dimensity 900 चिपसेटला सपोर्ट करतो. पुढे Honor 80 SE Price आणि Specifications डिटेल्स देण्यात आले आहेत.

Honor 80 SE Specifications

ऑनर 80 एसई स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन कर्व्ड ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. या फोनची स्क्रीन बेजल लेस आहे जिच्या वरच्या बाजूला मध्यभागी पंच-होल देण्यात आला आहे. हा होल बॉडी एजपासून लांब आहे. फोन डिस्प्लेमध्ये 1920हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग आणि 1.07एम कलरचा सपोर्ट मिळतो. हे देखील वाचा: ‘किंग ऑफ गेमिंग स्मार्टफोन्स’ येतोय बाजारात; पावरफुल iQOO 11 5G Phone ची लाँच डेट आली समोर

64mp camera phone honor 80 se 5g launched know price specification details

Honor 80 SE अँड्रॉइड 12 आधारित मॅजिकओएस 7.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक डिमेनसिटी 900 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन 12 जीबी पर्यंत इंटरनल रॅम तसेच 7जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो. म्हणजे हेव्ही प्रोसेसिंग दरम्यान Honor 80 SE 19जीबी रॅमची ताकद देऊ शकतो.

64mp camera phone honor 80 se 5g launched know price specification details

फोटोग्राफीसाठी Honor 80 SE ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ऑनर 80एसई स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

64mp camera phone honor 80 se 5g launched know price specification details

Honor 80 SE स्मार्टफोन 5जी आणि 4जी दोन्ही सपोर्टसह येतो. सिक्योरिटीसाठी या मोबाइल फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी ऑनर 80 एसई 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,600एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. Honor 80 SE स्मार्टफोनसह WiFi 5, Bluetooth 5.1, GNSS सोबतच Hi-Res Audio (wired and wireless) देखील मिळतो. हे देखील वाचा: Aadhaar आणि Voter ID असं करा ऑनलाइन लिंक, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

Honor 80 SE Price

ऑनर 80 एसई स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जिची किंमत 2399 युआन म्हणजे भारतीय करंसीनुसार जवळपास 27,400 रुपये आहे. तर मोठा Honor 80 SE 12GB RAM + 256GB Storage व्हेरिएंट 2699 युआन म्हणजे 30,800 रुपयांच्या रेंज मध्ये लाँच झाला आहे. हा फोन चीनी मार्केटमध्ये Moonlight Crystal, Iceland Fantasy, Cherry Pink Coral आणि Bright Black कलर्ससह आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 64MP कॅमेरा आणि 66W फास्ट चार्जिंगसह Honor 80 SE 5G लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-phone-honor-80-se-5g-launched-know-price-specification-details/feed/ 0
तीन फोन्ससह येऊ शकते HONOR 80 सीरिज; स्पेक्स झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/23-november-honor-80-series-to-be-announced-honor-80-pro-honor-80-se-launch/ https://www.91mobiles.com/marathi/23-november-honor-80-series-to-be-announced-honor-80-pro-honor-80-se-launch/#respond Fri, 18 Nov 2022 04:06:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15072 हल्ली स्मार्टफोन फक्त फोनचं काम करत नाही तर काहींसाठी स्मार्टफोनचा कॅमेरा त्यापेक्षाही महत्वाचा असतो. ही बाब लक्षात ठेवून HONOR कंपनी येत्या 23 नोव्हेंबरला आली नवीन फ्लॅगशिप सीरीज HONOR 80 series टेक मार्केटमध्ये लाँच करणार आहे. कंपनीनं सीरीजमधील स्मार्टफोन्सची नावे सांगितली नाहीत परंतु आशा आहे की 23 नोव्हेंबरला HONOR 80 SE 5G, HONOR 80 5G आणि […]

The post तीन फोन्ससह येऊ शकते HONOR 80 सीरिज; स्पेक्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हल्ली स्मार्टफोन फक्त फोनचं काम करत नाही तर काहींसाठी स्मार्टफोनचा कॅमेरा त्यापेक्षाही महत्वाचा असतो. ही बाब लक्षात ठेवून HONOR कंपनी येत्या 23 नोव्हेंबरला आली नवीन फ्लॅगशिप सीरीज HONOR 80 series टेक मार्केटमध्ये लाँच करणार आहे. कंपनीनं सीरीजमधील स्मार्टफोन्सची नावे सांगितली नाहीत परंतु आशा आहे की 23 नोव्हेंबरला HONOR 80 SE 5G, HONOR 80 5G आणि HONOR 80 Pro 5G लाँच होऊ शकतात. पुढे आम्ही ऑनर 80 सीरीजचे लाँच डिटेल शेयर करण्यासोबतच ऑनर 80, ऑनर 80 एसई आणि ऑनर 80 प्रोच्या स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख केला आहे जे लीक्सच्या माध्यमातून समोर आले आहेत.

या दिवशी लाँच होईल HONOR 80 Series

ऑनर 80 सीरीज येत्या 23 नोव्हेंबरला लाँच होणार आहे. यादिवशी HONOR 80 Series चीनमध्ये लाँच होईल त्यानंतर अन्य मार्केट्समध्ये येऊ शकते. परंतु भारतीयांच्या वाट्याला ऑनर 80, ऑनर 80 एसई आणि ऑनर 80 प्रो स्मार्टफोन येणार नाहीत कारण सध्या ऑनर ब्रँड भारतीय बाजारात जास्त अ‍ॅक्टिव्ह नाही. पावरफुल कॅमेरा असलेली ऑनर 80 सीरीज भारतीय वेळेनुसार 23 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता टेक मार्केटमध्ये लाँच केली जाईल. हे देखील वाचा: सॅमसंगचा वॉटरप्रूफ स्मार्टफोन मिळतोय अत्यंत स्वस्तात; 5G कनेक्टिव्हिटीसह 4 शानदार कॅमेरे

23 November HONOR 80 series to be announced HONOR 80 Pro HONOR 80 SE launch
Honor 80 Pro

HONOR 80 Series चा कॅमेरा (लीक)

ऑनर 80 सीरीज सीरीज पावरफुल कॅमेऱ्यांसह बाजारात येईल, अशी चर्चा आहे. समोर आलेल्या लीक्सनुसार सीरीजच्या सर्वात मोठ्या मॉडेल HONOR 80 Pro 5G मध्ये 160 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाईल जो एफ/1.8 अपर्चरसह येईल. तसेच या स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनलवर 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर असेल, असं देखील लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच कंपनीनं देखील चिनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट वीबोच्या माध्यमातून आपल्या आगामी स्मार्टफोन सीरिजच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

23 November HONOR 80 series to be announced HONOR 80 Pro HONOR 80 SE launch
Honor 80 SE

HONOR 80 Series चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्सनुसार, सीरीजचा बेस मॉडेल HONOR 80 स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782जी चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. HONOR 80 SE स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटसह बाजारात येईल, अशी माहिती लीकमध्ये समोर आली आहे. तर HONOR 80 Pro स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या पावरफुल स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो ज्याला 3.2गीगाहर्ट्ज पर्यंतचा क्लॉक स्पीड मिळेल. हे देखील वाचा: पॅन कार्ड नाही? मग फक्त काही मिनिटांत डाउनलोड करा e-PAN Card, जाणून घ्या पद्धत

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post तीन फोन्ससह येऊ शकते HONOR 80 सीरिज; स्पेक्स झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/23-november-honor-80-series-to-be-announced-honor-80-pro-honor-80-se-launch/feed/ 0
Honor Play5 स्मार्टफोन Dimensity 800U 5G चिपसेट, 64MP क्वाड कॅमेरा आणि 66W रॅपिड चार्जसह लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/honor-play5-smartphone-launched-with-dimensity-800u-5g-chipset-64mp-quad-camera-and-66w-rapid-charge/ https://www.91mobiles.com/marathi/honor-play5-smartphone-launched-with-dimensity-800u-5g-chipset-64mp-quad-camera-and-66w-rapid-charge/#respond Wed, 19 May 2021 11:36:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10974 Honor Play5 स्मार्टफोन दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. ऑनरचा हा फोन 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेजच्या दोन ऑप्शनमध्ये येतो.

The post Honor Play5 स्मार्टफोन Dimensity 800U 5G चिपसेट, 64MP क्वाड कॅमेरा आणि 66W रॅपिड चार्जसह लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Honor Play5 स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च झाला आहे. ऑनरचा हा समार्टफोन मिडरेंज स्मार्टफोन आहे ज्याची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स Huawei Nova 8 SE स्मार्टफोनशी मिळते जुळते आहेत. हुवावेने हा स्मार्टफोन गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च केला होता. Honor Play5 स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 800U चिपसेटसह सादर केला गेला आहे. ऑनरच्या या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ऑनरचा हा स्मार्टफोन Android 10 वर चालतो. इथे आम्ही तुम्हाला Honor Play5 स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबाबत सविस्तर माहिती देत आहोत.

Honor Play5

Honor Play5 स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रिजोल्यूशन Full HD+ 1080 x 2400 पिक्सल आहे. फ्रंट कॅमेऱ्यासाठी डिस्प्लेमध्ये वाटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Honor Play5 स्मार्टफोनच्या मागे क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. ऑनरचा हा स्मार्टफोन कंपनीच्या युजर इंटरफेस Magic UI 4.0 वर चालतो जो Android 10 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.

हे देखील वाचा : Google Photos ची फ्री स्टोरेज सर्विस बंद होणार आहे 1 जूनला, डिलीट होण्यापूर्वी अश्याप्रकारे करा फोटो डाउनलोड

Honor Play5 स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 800U चिपसेटसह सादर केला गेला आहे. Honor Play5 स्मार्टफोन LPDDR4x RAM आणि UFS 2.1 स्टोरेजसह सादर केला गेला आहे. ऑनरने या स्मार्टफोनमध्ये 3,800mAh ची बॅटरी दिली आहे जी 66W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करते. Honor Play 5 स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. ऑनरच्या या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी डुअल SIM सपोर्ट, 5G, Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.1, GPS, USB-C, आणि 3.5mm ऑडियो जॅक देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 6,000mAh बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यासह भारतात येत आहे Samsung Galaxy M32, किंमत असेल कमी

Honor Play5 ची किंमत किती आहे

Honor Play5 स्मार्टफोन दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. ऑनरचा हा फोन 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेजच्या दोन ऑप्शनमध्ये येतो. या दोन्ही वेरिएंट्सची किंमत क्रमश: 2,099 युआन (जवळपास 23,800 रुपये) आणि 2,299 युआन (जवळपास 26,126 रुपये) आहेत. ऑनरचा हा स्मार्टफोन ग्रेडिएंट, पर्पल आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post Honor Play5 स्मार्टफोन Dimensity 800U 5G चिपसेट, 64MP क्वाड कॅमेरा आणि 66W रॅपिड चार्जसह लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-play5-smartphone-launched-with-dimensity-800u-5g-chipset-64mp-quad-camera-and-66w-rapid-charge/feed/ 0
Honor स्मार्टफोन मार्केटमध्ये करेल जोरदार पुनरागमन, Snapdragon 775G चिपसेटसह घेऊन येईल स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/honor-50-may-first-smartphone-with-snapdragon-775g-soc/ https://www.91mobiles.com/marathi/honor-50-may-first-smartphone-with-snapdragon-775g-soc/#respond Tue, 18 May 2021 14:28:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10965 Honor 50 सीरीजबद्दल बोलले जात आहे कि ऑनरचा हा स्मार्टफोन यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत सादर केला जाऊ शकतो जो तीन वेरिएंट्समध्ये सादर केला जाऊ शकतो. Honor 50 स्मार्टफोन मिड रेंज स्मार्टफोन असेल जो कंपनी Snapdragon 775G प्रोसेसरसह सादर करेल.

The post Honor स्मार्टफोन मार्केटमध्ये करेल जोरदार पुनरागमन, Snapdragon 775G चिपसेटसह घेऊन येईल स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei चा सब ब्रँड लवकरच आपल्या Honor 50 सीरीजच्या स्मार्टफोनद्वारे मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यास तयार आहे. ऑनरचा हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या नवीन Snapdragon चिपसेटसह 5G कनेक्टिविटी ऑफर करेल. ऑनरच्या आगामी स्मार्टफोन Honor 50 स्मार्टफोनबाबत जास्त लीक आणि रूमर्स उपलब्ध नाहीत. हुवावेपासून वेगळी झाल्यानंतर ऑनरचा हा पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. बोलले जात आहे कि ऑनरच्या या स्मार्टफोन सीरीजचे तीन स्मार्टफोन Honor 50, Honor 50 Pro, आणि Honor 50 Pro+ सादर केले जाऊ शकतात. नवीन लीक रिपोर्ट्सनुसार या सीरीजचा बेस वेरिएंट Honor 50 स्मार्टफोन Snapdragon 775G चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. (Honor 50 may first smartphone with Snapdragon 775G SOC)

Honor 50 स्पेसिफिकेशन्स

ऑनरच्या अपकमिंग स्मार्टफोनबद्दल सोशल मीडिया अकाउंट Weibo वर युजर @DCS ने दावा केला आहे कि हा स्मार्टफोन Qualcomm च्या अंडर डेवलवप चिपसेट Snapdragon SM7325 म्हणजे Snapdragon 775G प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. क्वालकॉमचा हा चिपसेट 5G मॉडेमसोबतच Snapdragon 780G सह कमी पावरफुल प्रोसेसर असलेला स्मार्टफोन असेल.

हे देखील वाचा : Snapdragon 888 सह येणाऱ्या बेस्ट फोनची संपूर्ण यादी, बघा कोणता आहे तुमच्या योग्य

Honor 50 सीरीजबद्दल बोलले जात आहे कि ऑनरचा हा स्मार्टफोन यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत सादर केला जाऊ शकतो जो तीन वेरिएंट्समध्ये सादर केला जाऊ शकतो. Honor 50 स्मार्टफोन मिड रेंज स्मार्टफोन असेल जो कंपनी Snapdragon 775G प्रोसेसरसह सादर करेल. बोलले जात आहे कि या सीरीजचा हायएन्ड स्मार्टफोन Honor 50 Pro+ Snapdragon 888 SoC सह सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : LeEco करेल धमाकेदार पुनरागमन, लवकरच लॉन्च करेल दमदार LeTV Super Phone स्मार्टफोन

Honor V40

ऑनरच्या अपकमिंग स्मार्टफोनबद्दल अफवा आहे कि कंपनी जूनच्या सुरुवातीला Honor V40 स्मार्टफोन लॉन्च करू शकते. ऑनरच्या या स्मार्टफोनला अलीकडेच 3C सर्टिफिकेशन मिळाले आहे. 3C लिस्टिंगमध्ये या स्मार्टफोनचे चार्जिंग डिटेल समोर आले आहेत. या लिस्टिंगनुसार Honor V40 स्मार्टफोन 100W चार्जिंग स्पीडसह सादर केला जाऊ शकतो. Honor 50 Pro+ स्मार्टफोनने दुसऱ्या लीक रिपोर्टमध्ये दावा केला आहे कि या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्याचा प्राइमेरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल. या स्मार्टफोनचा कॅमेरा मॉड्यूल Huawei P50 सीरीज सारखा असू शकतो. सध्या ऑनरने या स्मार्टफोनबद्दल कोणतीही माहिती ऑफिशियली शेयर केली नाही.

Honor चिपसेट बनवणाऱ्या कंपनी Qualcomm सह मिळून काम करत आहे. त्याचबरोबर बोलले जात आहे कि Honor 50 सीरीजचे स्मार्टफोन्स Google services सह सादर केले जाऊ शकतात. चायनीज स्मार्टफोन कंपनी ऑनरने हुवावेपासून वेगळे झाल्यानंतर कोणताही दमदार स्मार्टफोन लॉन्च केला नाही. बोलले जात आहे कि स्मार्टफोनची नवीन सीरीज ऑनरला पुन्हा स्मार्टफोन गेममध्ये घेऊन येऊ शकते. कंपनी लवकरच मार्केटमध्ये Honor Play 5 स्मार्टफोन लॉन्च करू शकते.

The post Honor स्मार्टफोन मार्केटमध्ये करेल जोरदार पुनरागमन, Snapdragon 775G चिपसेटसह घेऊन येईल स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-50-may-first-smartphone-with-snapdragon-775g-soc/feed/ 0
Honor Tab X7 टॅबलेट 8 इंचाचा IPS डिस्प्ले आणि 5,100mAh बॅटरीसह झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/honor-tab-x7-launched-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/honor-tab-x7-launched-check-price-and-specifications/#respond Fri, 07 May 2021 16:27:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10858 Honor Tab X7 टॅबलेटमध्ये 8 इंचाचा IPS डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1280×800 पिक्सल आहे, या फोनचा डिस्प्ले बॉडी टू रेश्यो 80 टक्के आहे.

The post Honor Tab X7 टॅबलेट 8 इंचाचा IPS डिस्प्ले आणि 5,100mAh बॅटरीसह झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुवावेच्या सब-ब्रँड Honor ने गृह मार्केट चीनमध्ये Honor Tab X7 टॅबलेट लॉन्च केला आहे. Honor Tab X7 टॅब LTE आणि Wi-Fi वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहेत. ऑनरचा लेटेस्ट टॅबलेट 8 इंच IPS डिस्प्ले आणि मीडियाटेकच्या चिपसेटसह लॉन्च केला गेला आहे. लेटेस्ट Honor Tab X7 टॅबलेटमध्ये 5,100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या टॅबच्या मागे 5 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. इथे आम्ही तुम्हाला या टॅबच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती देत आहोत. (Honor Tab X7 launched check price and specifications)

Honor Tab X7 स्पेसिफिकेशन्स

Honor Tab X7 टॅबलेटमध्ये 8 इंचाचा IPS डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1280×800 पिक्सल आहे, या फोनचा डिस्प्ले बॉडी टू रेश्यो 80 टक्के आहे. या फोनमध्ये 4.9mm चे बेजल देण्यात आले आहेत जेणेकरून टॅबमध्ये युजर्सना चांगला विजुअल एक्सपीरियंस मिळेल. त्याचबरोबर या टॅबचा किड्स वर्जन पण सादर केला गेला आहे. हा वर्जन एजुकेशन बेस्ड सॉफ्टवेयर आणि फीचरसह सादर केला गेला आहे जे मुलांच्या शालेय अभ्यासात मदत करतात.

हे देखील वाचा : 20,000 रुपयांच्या बजेटमधील टॉप 10 फास्ट चार्जिंग असलेले स्मार्टफोन्स, क्षणात होतील फुल चार्ज

Honor Tab X7 टॅबलेटचा डिस्प्ले चीनच्या नॅशनल आय इजीनियरिंग सेंसर फॉर आय केयरसह राइनलँड लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनसह येतो. ऑनरचा हा टॅबलेट MediaTek MT8768T प्रोसेसरसह सादर केला गेला आहे. ऑनरचा हा कस्टम युजर इंटरफेस Magic UI 4.0 सह सादर केला आहे. या टॅबलेटच्या फ्रंटला 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या मागे 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या टॅबमध्ये 5,100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे कि हि बॅटरी सिंगल चार्जमध्ये सलग 10 तास HD व्हिडीओ आणि 88 तास ऑडियो प्ले करू शकते.

हे देखील वाचा : Airtel च्या सिस्टममध्ये झाला बिघाड, आपोआप पाठवले जात आहेत SMS, मोठ्या Data Scam ची आहे भीती

Honor Tab X7 किंमत

Honor Tab X7 टॅबलेट तीन वेगवेगळ्या कॉनफीग्रेशनमध्ये सादर केले गेले आहेत. या टॅबचा लोवर वेरिएंट 3GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेजसह फक्त wi-fi कनेक्टिविटीसह सादर केला गेला आहे. हा टॅब 899 युआन (जवळपास 10,200 रुपये) च्या किंमतीत सादर केला गेला आहे. तसेच या टॅबलेटचा हायर वेरिएंट 1,199 युआन (जवळपास 13,600 रुपये) सह सादर केला गेला आहे. हायर वेरिएंट 4G LTE सपोर्टसह सादर केला गेला आहे. या टॅबचा चिल्ड्रन्स वेरिएंट 999 युआन (जवळपास 11,300 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे.

The post Honor Tab X7 टॅबलेट 8 इंचाचा IPS डिस्प्ले आणि 5,100mAh बॅटरीसह झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-tab-x7-launched-check-price-and-specifications/feed/ 0
लॉन्च झाला 50MP कॅमेरा आणि 1000+ चिपसेट असलेला पावरफुल 5G फोन Honor V40, दमदार आहेत या फोनचे फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/honor-v40-launched-with-mediatek-dimensity-1000-soc-50mp-triple-cameras/ https://www.91mobiles.com/marathi/honor-v40-launched-with-mediatek-dimensity-1000-soc-50mp-triple-cameras/#respond Fri, 22 Jan 2021 12:43:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9750 Honor V40 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 50MP प्राइमरी सेंसर आहे जो कि RYYB अल्ट्रा-लाइट-सेंसिंग टेक्नोलॉजीचा वापर करतो.

The post लॉन्च झाला 50MP कॅमेरा आणि 1000+ चिपसेट असलेला पावरफुल 5G फोन Honor V40, दमदार आहेत या फोनचे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पॉप्युलर स्मार्टफोन ब्रँड Honor ने पॅरेंट कंपनी Huawei पासून बाजूला गेल्यानंतर आपला पहिला स्मार्टफोन ऑनर वी40 चिनी टेक मार्केट मध्ये सादर केला आहे. विशेष म्हणजे Huawei ने अमेरिकन निर्बंधांमुळे आपला ऑनर ब्रँड विकला होता. आशा आहे कि ऑनर वी 40 ग्लोबल वेरिएंट (ज्याला ऑनर व्यू 40 नाव देण्यात आले आहे) गुगल प्ले सर्विसेज सह येऊ शकतो. फोन लुक आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत खूप शानदार आहे. लक्षात असू द्या कि ऑफिशियल होण्याआधीच हँडसेट JD.com, Tmall, Suning सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स वर बुकिंगसाठी उपलब्ध झाला होता.

लुक व डिजाइन

फोनच्या डिजाइन बद्दल बोलायचे झाले तर हा बेजललेस डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. हँडसेटच्या फ्रंटला पिल शेप मॉड्यूल मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा लेफ्ट डिस्प्ले कर्व्ड डिजाइन सह येतो. तर, उजवीकडे अगदी नगण्य बेजल आहे. फोनच्या टॉप आणि बॉटमला थोडे बेजल दिसतील. तसेच मागे वर्टिकल कॅमेरा मॉड्यूल मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा सेटअप दिसायला असा वाटतो कि जणू फोन मध्ये मल्टीपल कॅमेरा सेंसर आहेत. पण, फोटोग्राफीसाठी फक्त तीन कॅमेराच मागे कंपनीने दिले आहेत. इतर फ्लॅश लाइट आणि दुसरे सेंसर आहेत.

Honor V40

हे देखील वाचा : 6GB रॅम सह येईल Nokia चा स्वस्त 5G फोन, Xiaomi-Realme ची करेल सुट्टी?

डिस्प्ले

Honor V40 मध्ये कंपनीने 6.72-इंचाचा फुल एचडी+ OLED वॉटरफॉल डिस्प्ले दिला आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेट सह येतो. फोनचा डिस्प्ले 1236 x 2679 पिक्सल रेजॉल्यूशन वर बेस्ड आहे. इतकेच नव्हे तर स्क्रीन 80-डिग्री सूपर लार्ज, P3 वाइड कलर gamut, 93 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह TUV Rheinland ग्लोबल आय प्रोटेक्शन सर्टिफिकेशन 2.0 सह येतो.

प्रोसेससर

प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह 7एनएम फॅब्रिकेशन वर बनलेला मीडियाटेकचा डायमनसिटी 1000+ चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मीडियाटेकचा हा चिपसेट 5जी कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. ग्राफिक्ससाठी रेनो5 प्रो मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे.

कॅमेरा

Honor V40 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 50MP प्राइमरी सेंसर आहे जो कि RYYB अल्ट्रा-लाइट-सेंसिंग टेक्नोलॉजीचा वापर करतो. फोन मध्ये 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आणि 2MP मॅक्रो सेंसर क्लोज-अप शॉट्ससाठी देण्यात आला आहे. या फोन मध्ये एलईडी फ्लॅश आणि लेजर ऑटोफोक्स आहे जो कॅमेरा मॉड्यूल मधेच आहे. तसेच, फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 16MP डुअल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी सह लाॅन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, किंमत 7,000 रुपयांपेक्षा पण कमी

बॅटरी आणि कनेक्टिविटी

Honor V40 मध्ये 4,000mAh ची बॅटरी पावर बॅकअपसाठी देण्यात आली आहे जी 66W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोन मध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय 802.11 a / b / g / n / ac / 6 ब्लूटूथ 5.1, NFC, आणि GPS चा समवेश आहे.

किंमत

8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या Honor V40 5G वेरिएंटची किंमत RMB 3,599 (जवळपास 40,600 रुपये) आहे. तर, 8GB + 256GB वेरिएंटची किंमत RMB 3999 (जवळपास 45,200 रुपये) आहे. फोन चीन मध्ये आधीच उपलब्ध आहे आणि नाइट ब्लॅक, टाइटेनियम सिल्वर, रोज गोल्ड कलर ऑप्शन मध्ये विकत घेता येईल.

The post लॉन्च झाला 50MP कॅमेरा आणि 1000+ चिपसेट असलेला पावरफुल 5G फोन Honor V40, दमदार आहेत या फोनचे फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-v40-launched-with-mediatek-dimensity-1000-soc-50mp-triple-cameras/feed/ 0
5,000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड कॅमेऱ्यासह आला Honor 10X Lite, देईल का Samsung ला आव्हान? https://www.91mobiles.com/marathi/honor-10x-lite-launched-with-quad-rear-cameras-hole-punch-display/ https://www.91mobiles.com/marathi/honor-10x-lite-launched-with-quad-rear-cameras-hole-punch-display/#respond Wed, 11 Nov 2020 12:32:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8893 Honor 10X Lite ची किंमत EUR 229.90 (जवळपास 20,200 रुपये) ठेण्यात आली आहे. फोन एमरल्ड ग्रीन, आईसलँडिक फ्रॉस्ट आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये येतो.

The post 5,000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड कॅमेऱ्यासह आला Honor 10X Lite, देईल का Samsung ला आव्हान? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei च्या सब-ब्रँड हॉनरने आपला नवीन फोन Honor 10X Lite अधिकृतपणे ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. हा फोन यावर्षी एप्रिल मध्ये लॉन्च झालेल्या Honor 9X Lite चा अपग्रेडेड वर्जन म्हणून मार्केट मध्ये आला आहे. ग्लोबल मार्केट मध्ये येताच हा स्मार्टफोन सौदी अरेबिया आणि रशियाच्या मार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच हॉनरने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोशल स्टोरीटेलिंग प्लॅटफॉर्म वॉटपॅड आणि ऑनलाइन लॉन्चपॅड प्रोग्राम रेड बुल बेसमेंट सह आपल्या भागेदारीची घोषणा केली आहे, जे Huawei मोबाईल सेवेकडे (एचएमएस) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आहे. हि सेवा गुगल मोबाईल सर्विसेज (जीएमएस) सारखी आहे.

डिजाइन

फोनच्या डिजाइन बद्दल बोलायचे तर कंपनीने फोन पंच-होल डिस्प्ले सह सादर केला आहे. डिवाइसच्या फ्रंटला मधोमध होल-पंच मिळेल. तसेच डिवाइसच्या फ्रंटला तिन्ही कडा बेजल लेस आहेत. तर बॉटमला थोडा जाड चिन पार्ट दिसत आहे. हँडसेटच्या डावीकडे वॉल्यूम रॉकर बटन सोबतच खालच्या बाजूला साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर मागे टॉप लेफ्ट मध्ये वर्टिकल शेप क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात एलईडी फ्लॅश लाइट पण आहे.

हे देखील वाचा : 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी सह आला Huawei Mate 30E Pro 5G, जाणून घ्या वैशिष्ट्ये

स्पेसिफिकेशन्स

Honor 10X Lite 20: 9 आस्पेक्ट रेशियो असेलल्या 6.67-इंचाच्या फुल-एचडी + (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर HiSilicon Kirin 710A SoC सह 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.

फोटोग्राफी पाहता यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात f / 1.8 लेंस सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, f / 2.4 लेंस सह 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर, 2-मेगापिक्सलचा डेप्थ-असिस्ट सेंसर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटला 8-मेगापिक्सल शूटर उपलब्ध आहे, ज्यात f / 2.0 लेंस आहे.

हे देखील वाचा : 50एमपी रियर कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह Huawei चा 5G फोन Mate 40 झाला लॉन्च

फोन मध्ये कनेक्टिविटीसाठी 4 जी एलटीई, वाय-फाई, ब्लूटूथ, जीपीएस / ए-जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. तसेच फोन मध्ये ऑनबोर्ड सेंसर मध्ये एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर आणि एक प्रॉक्सिमिटी सेंसरचा समावेश आहे.

पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे जी 22.5W ऑनर सुपरचार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट डुअल-सिम (नॅनो) अँड्रॉइड 10-आधारित मॅजिकयुआय 3.1 वर चालतो. यात Google Play आणि इतर Google ऍप्लिकेशन आणि सेवा मिळत नाहीत. त्याऐवजी हा फोन एचएमएस 4.1 सह येतो.

किंमत

Honor 10X Lite ची किंमत EUR 229.90 (जवळपास 20,200 रुपये) ठेण्यात आली आहे. फोन एमरल्ड ग्रीन, आईसलँडिक फ्रॉस्ट आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये येतो. फोन सुरवातीला रशिया, फ्रांस आणि जर्मनी सह इतर मार्केट्स पदार्पण करत आहे. कंपनीने EUR 30 (जवळपास 2,600 रुपये) ची अतिरिक्त सूट देण्याची घोषणा केली आहे जी निवडक मार्केट्स लागू असेल. फोनच्या भारतातील लॉन्चची कोणतीही माहिती समोर आली नाही.

The post 5,000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड कॅमेऱ्यासह आला Honor 10X Lite, देईल का Samsung ला आव्हान? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-10x-lite-launched-with-quad-rear-cameras-hole-punch-display/feed/ 0
48MP क्वाड कॅमेरा असलेला दमदार फोन Honor 10X Lite 10 नोव्हेंबरला होईल लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/honor-10x-lite-set-to-launch-on-november-10/ https://www.91mobiles.com/marathi/honor-10x-lite-set-to-launch-on-november-10/#respond Wed, 04 Nov 2020 12:36:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8799 लॉन्चच्या आधी समोर आलेल्या लीकच्या माध्यमातून Honor 10X Lite च्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे, ज्यानुसार फोन मध्ये 6.67 इंचाची स्क्रीन असलेल्या या फोन मध्ये IPS LCD Full HD+ डिस्प्ले असेल.

The post 48MP क्वाड कॅमेरा असलेला दमदार फोन Honor 10X Lite 10 नोव्हेंबरला होईल लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून Huawei च्या सब-ब्रँड Honor च्या अपकमिंग X10 Lite फोन बद्दल माहिती समोर येत आहे. शक्यता अशी आहे कि स्मार्टफोन Honor 9X Lite चा अपग्रेड मॉडेल असेल जो दमदार फीचर्स सह सादर केला जाईल. या लीकच्या बातम्या येत असताना आता कंपनीने Honor X10 Lite च्या लॉन्च डेटची माहिती दिली आहे. कंपनी अधिकृतपणे सांगितले आहे कि या फोनची ग्लोबल लॉन्चिंग भारतात 10 नोव्हेंबरला होईल आणि या फोनच्या माध्यमातून कंपनी मिड रेंज सेगमेंट मध्ये रियलमी, शाओमी आणि वीवो समवेत इतर कंपन्यांना चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न करतील.

ऑनर 10 एक्स लाइटचा ग्लोबल लॉन्च

ऑनर 10 एक्स लाइट 10 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:30 वाजता IST वर एक वर्चुअल इवेंटच्या माध्यमातून सादर केला जाईल. हा इवेंट लाइव स्ट्रीम केला जाईल, जो तुम्ही घर बसल्या बघू शकता. वर्चुअल लॉन्चची लिंक लवकरच येईल अशी आशा आहे. Honor ने Honor 10X Lite च्या किंमतीबाबत किंवा उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती दिली नाही. कंपनीच्या रशियन वेबसाइट वर फोन पंच-होल कॅमेरा डिजाइन सह दाखवण्यात आला आहे आणि हा हिरव्या आणि जांभळ्या रंगात येऊ शकतो.

स्पेसिफिकेशन्स

लॉन्चच्या आधी समोर आलेल्या लीकच्या माध्यमातून Honor 10X Lite च्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे, ज्यानुसार फोन मध्ये 6.67 इंचाची स्क्रीन असलेल्या या फोन मध्ये IPS LCD Full HD+ डिस्प्ले असेल. याचे स्क्रीन रिजॉल्यूशन 1080×2400 पिक्सल असेल.

फोन 4GB RAM आणि 128GB स्टोरेज ऑप्शन मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. अशा आहे कि फोन 6जीबी वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. अँड्रॉइड 10 वर बेस्ड या फोन मध्ये HiSilicon Kirin 710A प्रोसेसर असेल आणि याची बॅटरी क्षमता 50000mAh असू शकतो, जी 22.5W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून ब्लूटूथ 5.1, 2.4 गीगाहर्ट्ज वाय-फाई, एलटीई, एक 3.5 मिमी हेड फोन्स जॅक आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट असू शकतो.

हे देखील वाचा : 4 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 48एमपी कॅमेऱ्यासह Honor 30i झाला लॉन्च

हॉनर 10 एक्स लाइट मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यात 48-मेगापिक्सलचा प्राइमरी स्नॅपर असेल. तसेच तीन कॅमेऱ्यांमध्ये 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असल्याचे बोलले जात आहे. समोरच्या बाजूला फोन मध्ये होल-पंच डिजाइन मध्ये 8-मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर असू शकतो.

The post 48MP क्वाड कॅमेरा असलेला दमदार फोन Honor 10X Lite 10 नोव्हेंबरला होईल लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-10x-lite-set-to-launch-on-november-10/feed/ 0