Reliance Jio - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 23 May 2023 04:14:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Jio चा नवीन धमाका! फक्त 61 रुपयांमध्ये देत आहे 10GB Data! जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/10-gb-data-at-rs-61-jio-data-booster-recharge-plan-details-and-benefits-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/10-gb-data-at-rs-61-jio-data-booster-recharge-plan-details-and-benefits-in-marathi/#respond Tue, 23 May 2023 04:14:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21093 Reliance Jio वेळोवेळी असे रिचार्ज प्लॅन आणि ऑफर सादर करत असते जे कंपनी युजर्ससाठी फायदेशीर असतात तसेच इतर टेलीकॉम ऑपरेटर्सच्या तुलनेत स्वस्त आणि बेस्ट देखील ठरतात. आपल्या ग्राहकांसाठी कंपनीनं आता 61 रुपयांचा Data Booster Recharge Plan सादर केला आहे ज्यात एकूण 10GB Data मिळतो. जियो 61 रुपयांचा प्लॅन कंपनीनं हा ‘डाटा बूस्टर’ रिचार्ज प्लॅन्सच्या श्रेणीत […]

The post Jio चा नवीन धमाका! फक्त 61 रुपयांमध्ये देत आहे 10GB Data! जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा Data Booster रिचार्ज आहे.
  • ह्यात कॉल किंवा SMS बेनिफिट नाहीत.
  • प्रीपेड युजर हा रिचार्ज वापरू शकतात.

Reliance Jio वेळोवेळी असे रिचार्ज प्लॅन आणि ऑफर सादर करत असते जे कंपनी युजर्ससाठी फायदेशीर असतात तसेच इतर टेलीकॉम ऑपरेटर्सच्या तुलनेत स्वस्त आणि बेस्ट देखील ठरतात. आपल्या ग्राहकांसाठी कंपनीनं आता 61 रुपयांचा Data Booster Recharge Plan सादर केला आहे ज्यात एकूण 10GB Data मिळतो.

जियो 61 रुपयांचा प्लॅन

  • कंपनीनं हा ‘डाटा बूस्टर’ रिचार्ज प्लॅन्सच्या श्रेणीत ठेवला आहे.
  • ह्याची किंमत फक्त 61 रुपये आहे.
  • हा प्लॅन कोणत्याही वैधतेविना येतो.
  • ह्या प्लॅनमध्ये जियो ग्राहकांना 10जीबी डेटा मिळतो.
  • ह्या रिचार्जसह कॉलिंग किंवा एसएमएस बेनिफिट मिळत नाहीत.
  • ह्याचा लाभ आधीपासून सक्रिय असलेल्या प्लॅनच्या वैधतेत घेता येतो.
  • 10जीबी डेटा संपल्यावर 64Kbps स्पीडनं इंटरनेट वापरता येईल.

डाटा बूस्टर रिचार्ज प्लॅनचा फायदा

  • हा पॅक अ‍ॅक्टिव्ह झाल्यावर ‘डेली डेटा’ चं टेंशन राहत नाही.
  • गरजेच्या वेळी उपलब्ध डेटा संपल्यावर हा डेटा बूस्टर कामी येतो.
  • IPL पाहताना जर डेटा संपला तर ह्या डेटावर मॅच कंटिन्यू पाहता येईल.
  • जर एखादी मोठी फाईल इंटरनेटवरून डाउनलोड किंवा अपलोड करताना हा डेटा वापरता येईल.
  • आधी 61 रुपयांमध्ये 6जीबी डेटा मिळत होता परंतु आता 10जीबी मिळत आहे. म्हणजे 4जीबी एक्स्ट्रा डेटाचा फायदा.

जियो डेटा बूस्टर रिचार्ज प्लॅन्स

  • 15 रुपये
  • 25 रुपये
  • 121 रुपये
  • 222 रुपये

जियोचा 15 रुपयांचा डेटा बूस्टर प्लॅन 1 जीबी डेटासह येतो. ह्यात कोणतेही कॉल किंवा मेसेज मिळत नाहीत आणि ह्याची वैधता देखील सक्रिय प्लॅन इतकी आहे.

25 रुपयांच्या जियो डेटा बूस्टर प्लॅन 2जीबी डेटासह येतो. हा रिचार्ज देखील सक्रिय प्लॅनच्या व्हॅलिडिटी सोबतच चालतो.

61 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 10जीबी डेटा दिला जात आहे. तर 121 रुपयांच्या डेटा बूस्टर प्लॅनमध्ये जियो आपल्या ग्राहकांना 12जीबी डेटा देत आहे.

Data Booster Recharge Plans मध्ये सर्वात मोठा पॅक 222 रुपयांचा आहे. हा Jio रिचार्ज पॅक 50जीबी डेटा देतो ज्याचा लाभ सक्रिय प्लॅनसह घेता येतो.

The post Jio चा नवीन धमाका! फक्त 61 रुपयांमध्ये देत आहे 10GB Data! जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/10-gb-data-at-rs-61-jio-data-booster-recharge-plan-details-and-benefits-in-marathi/feed/ 0
Jio ची दमदार ऑफर, ठराविक प्लॅन्ससह मोफत मिळत आहे 40GB डेटा https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-offering-up-to-40gb-free-internet-data-on-select-recharge-plans-know-full-details/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-offering-up-to-40gb-free-internet-data-on-select-recharge-plans-know-full-details/#respond Thu, 11 May 2023 09:22:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20822 Jio ने IPL 2023 सीजनच्या सुरुवातीला क्रिकेट प्रेमींसाठी तीन नवीन क्रिकेट प्लॅन सादर केले होते. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 5G बेनिफिट्ससह 3GB पर्यंत डेली डेटा मिळते. इतकेच नव्हे तर आता कंपनी या प्लॅन्ससह ग्राहकांना 40GB पर्यंत एक्स्ट्रा फ्री डेटा देत आहे. चला जाणून घेऊया प्लॅन्सची माहिती. या तीन प्लॅनमध्ये मिळेल 40जीबी एक्सट्रा डेटा […]

The post Jio ची दमदार ऑफर, ठराविक प्लॅन्ससह मोफत मिळत आहे 40GB डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Jio कडे तीन क्रिकेट बेस प्लॅन आहेत.
  • इन प्लॅनमध्ये 90 दिनों पर्यंतची वैधता मिळते.
  • रिचार्ज फक्त प्रीपेड युजर्ससाठी आहेत.

Jio ने IPL 2023 सीजनच्या सुरुवातीला क्रिकेट प्रेमींसाठी तीन नवीन क्रिकेट प्लॅन सादर केले होते. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 5G बेनिफिट्ससह 3GB पर्यंत डेली डेटा मिळते. इतकेच नव्हे तर आता कंपनी या प्लॅन्ससह ग्राहकांना 40GB पर्यंत एक्स्ट्रा फ्री डेटा देत आहे. चला जाणून घेऊया प्लॅन्सची माहिती.

या तीन प्लॅनमध्ये मिळेल 40जीबी एक्सट्रा डेटा

  • Jio Rs 219 Plan
  • Jio Rs 399 Plan
  • Jio Rs 999 Plan

  • Jio चा 219 रुपयांचा प्लॅन: 3 जीबी डेटासह जियोचा हा सर्वात छोटा प्लॅन जो 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात तुम्हाला डेली 3GB डेटासह 2GB डेटा एक्सट्रा मिळतो. त्यामुळे प्लॅनमध्ये एकूण 44 जीबी इंटरनेट डेटा मिळतो. तसेच 100 एसएमएस रोज आणि काही जियो अ‍ॅप्सची सुविधा मिळेल. तसेच, रिचार्जमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळेल.
  • Jio चा 399 रुपयांचा प्लॅन: प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते कंपनी रोज 3 जीबी इंटरनेट डेटा देत आहे. डेली डेटा व्यतिरिक्त प्लॅनमध्ये 6जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो. त्यामुळे प्लॅनमध्ये एकूण 90जीबी डेटा मिळतो. तसेच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगच्या सुविधेसह रोज 100 एसएमएस आणि जियो अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस देण्यात आला आहे.
  • Jio चा 999 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये डेली 3 जीबी डेटासह 40जीबी डेटा फ्री मिळतो. ह्या प्लॅनची वैधता 84 दिवस आहे. तसेच रिचार्जमध्ये एकूण 292जीबी डेटा वापरण्यासाठी दिला जातो. त्याचबरोबर ह्यात तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर देशभरात फ्री कॉलिंगसह जियो अ‍ॅप्स आणि डेली 100 एसएमएस मोफत मिळतात.

कंपनीकडे तीन क्रिकेट अ‍ॅड-ऑन प्लॅन्स देखील आहेत, ज्यांची किंमत 222 रुपये, 444 रुपये आणि 667 रुपये आहे. ह्या तिन्ही प्लॅनमध्ये क्रमश: 50GB, 100GB आणि 150GB इंटरनेट डेटा मिळतो. तसेच 444 रुपये आणि 667 रुपये रिचार्जची वैधता अनुक्रमे 60 आणि 90 दिवस आहे. 222 रुपयांचा प्लॅन सक्रिय प्लॅनच्या समाप्तीपर्यंत वैध राहतो.

The post Jio ची दमदार ऑफर, ठराविक प्लॅन्ससह मोफत मिळत आहे 40GB डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-offering-up-to-40gb-free-internet-data-on-select-recharge-plans-know-full-details/feed/ 0
जियोनं लाँच केला JioDive VR Headset; 100-इंचाच्या स्क्रीनवर दिसेल IPL https://www.91mobiles.com/marathi/360-degree-jio-dive-vr-headset-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/360-degree-jio-dive-vr-headset-price-features-specifications-in-marathi/#respond Tue, 02 May 2023 09:34:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20632 देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी Reliance Jio नं भारतीय बाजारात आपला नवीन JioDive VR Headset लाँच केला आहे. हा व्हीआर (Virtual Reality) हेडसेट खासकरून टाटा आयपीएल (TATA IPL) साठी सादर करण्यात आला आहे ज्यात 360डिग्री व्यू मिळेल. या शानदार गॅजेटमध्ये युजरला 100 इंचाच्या स्क्रीनचा अनुभव मिळेल. Jio Dive ची किंमत जियो डाइव व्हीआर हेडसेट कंपनीनं […]

The post जियोनं लाँच केला JioDive VR Headset; 100-इंचाच्या स्क्रीनवर दिसेल IPL first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • JioDive VR headset लाँच झाला आहे.
  • यावर 100 इंच वचुर्अल स्क्रीनचा एक्सपीरियंस मिळतो.
  • हे JioMart वरून विकत घेता येईल.

देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी Reliance Jio नं भारतीय बाजारात आपला नवीन JioDive VR Headset लाँच केला आहे. हा व्हीआर (Virtual Reality) हेडसेट खासकरून टाटा आयपीएल (TATA IPL) साठी सादर करण्यात आला आहे ज्यात 360डिग्री व्यू मिळेल. या शानदार गॅजेटमध्ये युजरला 100 इंचाच्या स्क्रीनचा अनुभव मिळेल.

Jio Dive ची किंमत

जियो डाइव व्हीआर हेडसेट कंपनीनं 1,299 रुपयांमध्ये लाँच केला आहे. हा हेडसेट रिलायन्स जियोच्या ऑफिशियल वेबसाइट सोबतच JioMart वर सेलसाठी उपलब्ध झाला आहे, जिथे हा ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल. हा विकत घेताना Paytm वॉलेटनं पेमेंट केल्यास कंपनीकडून 100 रुपयांचा डिस्काउंट आणि 500 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. हे देखील वाचा: Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 स्मार्टफोनवर 15000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, अशी आहे ऑफर

Jio Dive चे फीचर्स

  • 360-degree View
  • 100″ virtual screen
  • Switch camera angles

जियो डाइव व्हीआर हेडसेट आयपीएलच्या टी-20 क्रिकेट मॅचसाठी सादर करण्यात आला आहे. हा डिवायस डोळ्यांना लावल्यानंतर युजर्सना 100 इंचाची वचुर्अल स्क्रीन अनुभवता येते. तसेच 360 डिग्री व्यूइंग एक्सपीरियंस मिळतो ज्यामुळे तुम्ही स्टेडियममध्ये असल्यासारखं वाटतं. तसेच सर्व खेळाडूंची हालचाल बघण्यासाठी अनेक कॅमेरा अँगल देखील यात आहेत जे तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदलू शकता.

Jio Dive चे स्पेसिफिकेशन्स

  • Android 9/iOS 15
  • Adjustable lenses
  • 3-way adjustable strap

रिलायन्स जियोचं हे नवीन गॅजेट अँड्रॉइड स्मार्टफोन तसेच अ‍ॅप्पल आयफोनसह देखील वापरता येईल. यासाठी अँड्रॉइड 9 आणि आयओएस 15 वरील व्हर्जन असणं आवश्यक आहे. मोबाइल फोनवरून कनेक्ट करण्यासाठी लक्षात असू द्या की त्या फोनची स्क्रीन 4.7 इंच ते 6.7 इंच दरम्यान असावी. हे देखील वाचा: Airtel-Jio च्या अनलिमिटेड 5G डेटावर येऊ शकते बंदी; ट्रायच्या नियमांचे होत आहे उल्लंघन

Jio Dive VR Headset फोनमध्ये jioImmerse अ‍ॅपच्या माध्यमातून वापरता येईल. या हेडसेट गॅजेसचे डायमेंशन 195 x130 x90एमएम आणि वजन 325 ग्राम आहे. परफेक्ट फिटसाठी यात 3-वे अडजस्टेबल स्ट्रॅप मिळतो, तसेच तुमच्या सोयीनुसार लेन्स देखील साइड व्हीलच्या माध्यमातून सेट करता येईल.

The post जियोनं लाँच केला JioDive VR Headset; 100-इंचाच्या स्क्रीनवर दिसेल IPL first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/360-degree-jio-dive-vr-headset-price-features-specifications-in-marathi/feed/ 0
जियो फायबरचा स्वस्त प्लॅन लाँच; फक्त 198 रुपयांमध्ये महिनाभर अनलिमिटेड डेटा https://www.91mobiles.com/marathi/jio-fiber-backup-broadband-plan-launched-rs-198-with-unlimited-internet-data/ https://www.91mobiles.com/marathi/jio-fiber-backup-broadband-plan-launched-rs-198-with-unlimited-internet-data/#respond Tue, 28 Mar 2023 04:26:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19801 रिलायन्स जियोनं आपल्या जियो फायबर ब्रॉडबँड ग्राहकांसाठी एक नवीन आणि स्वस्त प्लॅन सादर केला आहे. कंपनीनं या नवीन प्लॅनला Back-up Plan असं नाव दिलं आहे. प्लॅनची किंमत फक्त 198 रुपये आहे आणि यात अनलिमिटेड इंटरनेट डेटा दिला जाईल. डेटाची कोणतीही लिमिट नसेल हे स्पष्ट झालं आहे, हा प्लॅन खासकरून Tata IPLसाठी सादर करण्यात आला आहे. […]

The post जियो फायबरचा स्वस्त प्लॅन लाँच; फक्त 198 रुपयांमध्ये महिनाभर अनलिमिटेड डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Jio Fiber ने 198 रुपयांच्या Back-up Plan सादर केला.
  • नवीन प्लॅन 30 मार्चपासून रिचार्ज करता येईल.
  • प्लॅन सोबतच वनक्लिक स्पीड अपग्रेड सुविधा मिळत आहे.

रिलायन्स जियोनं आपल्या जियो फायबर ब्रॉडबँड ग्राहकांसाठी एक नवीन आणि स्वस्त प्लॅन सादर केला आहे. कंपनीनं या नवीन प्लॅनला Back-up Plan असं नाव दिलं आहे. प्लॅनची किंमत फक्त 198 रुपये आहे आणि यात अनलिमिटेड इंटरनेट डेटा दिला जाईल. डेटाची कोणतीही लिमिट नसेल हे स्पष्ट झालं आहे, हा प्लॅन खासकरून Tata IPLसाठी सादर करण्यात आला आहे. ग्राहकांना या प्लॅनसह 10Mbps पासून 100Mbps पर्यंतच्या स्पीड निवडता येईल. तसेच नवीन प्लॅन 30 मार्चपासून रिचार्ज करता येईल.

198 रुपयांचा जियोफायबर प्लॅन

JioFiber ब्रॉडबँड बॅक-अप प्लॅन फक्त 198 रुपये दरमहाच्या बेस किंमतीत उपलब्ध होईल. तसेच तुम्हाला 10 एमबीपीएस पर्यंतच्या स्पीडसह अनलिमिटेड डेटा ऑफर केला जात आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लँडलाइन कॉलिंग देखील मिळेल. या प्लॅनमध्ये वनक्लिक स्पीड अपग्रेडची सुविधा देखील मिळत आहे. म्हणजे तुम्ही 1/2/7 दिवसांसाठी एक-क्लिक स्पीड अपग्रेड करू शकता आणि स्पीड 30 एमबीपीएस किंवा 100 एमबीपीएस पर्यंत वाढवू शकता. वन-स्पीड अपग्रेडेशनचा खर्च पाहण्यासाठी पुढील इमेज पाहा. हे देखील वाचा: मोफत बघा IPL! Jio नं Airtel, VI आणि BSNL युजर्सना दिली खास ऑफर

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रायमरी इंटरनेट कनेक्शनसाठी जर तुम्हाला 30 एमबीपीएस स्पीड हवा असेल तर एका दिवसासाठी 21 रुपये, 2 दिवसांसाठी 31 रुपये आणि 7 दिवसांसाठी 101 रुपये खर्च करावे लागतील. तसेच जर 100 एमबीपीएसचा स्पीड हवा असेल तर तुम्हाला 1 दिवसासाठी 32 रुपये 2 दिवसांसाठी 52 आणि 7 दिवसांसाठी 152 रुपये द्यावे लागतील. Jio Fiber Backup plan अंतगर्त 100 रुपये आणि 200 रुपयांच्या दोन प्लॅन देखील आहेत. यात 4K सेटटॉप बॉक्ससह 400 लाइव्ह टीव्ही चॅनेल, 6 ओटीटीचा समावेश आहे. हे देखील वाचा: 240वॉट चार्जिंग असलेला Realme GT 3 लवकरच होऊ भारतात लाँच; सर्टिफिकेशन साइटवर झाला लिस्ट

बॅकअप प्लॅन कमीत कमी पाच महिन्यासाठी उपलब्ध आहे. हा घेण्यासाठी तुम्हाला 1490 रुपये (पाच महिन्यासाठी 990 रुपये आणि इन्स्टालेशनसाठी 500 रुपये) द्यावे लागतील. तसेच एसटीबी अपग्रेडसाठी पण तुम्हाला पाच महिन्यासाठी एकूण 500 रुपये किंवा 1000 रुपये मोजावे लागतील. हे सर्व युजरच्या प्लॅनवर अवलंबुन आहे. बिलवर अतिरिक्त जीएसटी देखील लागू होईल.

The post जियो फायबरचा स्वस्त प्लॅन लाँच; फक्त 198 रुपयांमध्ये महिनाभर अनलिमिटेड डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-fiber-backup-broadband-plan-launched-rs-198-with-unlimited-internet-data/feed/ 0
जियोनं लाँच केले 6 क्रिकेट प्लॅन, IPL च्या चाहत्यांसाठी खास योजना https://www.91mobiles.com/marathi/jio-launch-new-cricket-plans-with-3-gb-data-daily/ https://www.91mobiles.com/marathi/jio-launch-new-cricket-plans-with-3-gb-data-daily/#respond Fri, 24 Mar 2023 06:29:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19714 जियोसिनेमावर आयपीएल बघणे अगदी मोफत आहे परंतु, सर्व सामने बघण्यासाठी जास्त डेटा लागतोच आणि म्हणून रिलायन्स जियोनं एकूण 6 नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. आकाश मुकेश अंबानी यांच्या कंपनीनं क्रिकेट प्लॅन्स डेली 3GB डेटासह सादर केले आहेत. तसेच तीन एक्सक्लूसिव्ह डेटा- अ‍ॅड ऑन पॅक 150जीबी डेटा बेनिफिट्ससह आणले आहेत. चला जाणून घेऊया या […]

The post जियोनं लाँच केले 6 क्रिकेट प्लॅन, IPL च्या चाहत्यांसाठी खास योजना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • क्रिकेट चाहत्यांसाठी जियोनं 6 नवीन रिचार्ज प्लॅन सादर केले.
  • कंपनीनं क्रिकेट बोनानजा ऑफर अंतगर्त प्लॅन सादर केले आहेत.
  • हे रिचार्ज 24 मार्च 2023 पासून उपलब्ध होतील.

जियोसिनेमावर आयपीएल बघणे अगदी मोफत आहे परंतु, सर्व सामने बघण्यासाठी जास्त डेटा लागतोच आणि म्हणून रिलायन्स जियोनं एकूण 6 नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. आकाश मुकेश अंबानी यांच्या कंपनीनं क्रिकेट प्लॅन्स डेली 3GB डेटासह सादर केले आहेत. तसेच तीन एक्सक्लूसिव्ह डेटा- अ‍ॅड ऑन पॅक 150जीबी डेटा बेनिफिट्ससह आणले आहेत. चला जाणून घेऊया या नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅनबाबत सर्वकाही.

मिळेल अनलिमिटेड ट्रू-5जी डेटा

सर्व क्रिकेट प्लॅन्ससह ग्राहकांना अनलिमिटेड ट्रू-5जी डेटा मिळेल. तसेच, जियो युजर्स स्क्रीनवर 4के क्लॅरिटीमध्ये मल्टीपल कॅमेरा अँगलवरून लाइव्ह मॅच बघता येईल. क्रिकेट चाहत्यांना मिळणारा शानदार अनुभव लक्षात घेऊन हे प्लॅन तयार करण्यात आले आहेत. कंपनीनं 999 रुपये, 399 रुपये आणि 219 रुपये प्लॅनसह 222 रुपये, 444 रुपये आणि 667 रुपयांच्या डेटा अ‍ॅड-ऑन पॅक्स देखील सादर केले आहेत. हे देखील वाचा: OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 4 एप्रिलला येणार भारतात, जोडीला येतायत OnePlus Nord Buds 2

3GB डेली डेटा असलेले क्रिकेट प्लॅन

999 रुपयांचा प्लॅन पाहता या रिचार्जमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह डेली 3जीबी डेटा मिळेल. तसेच, यात 241 रुपयांची किंमतीचा फ्री व्हाउचर ऑफर केला जात आहे.

399 रुपयांचा प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 3GB डेली डेटा आणि 61 रुपयांचा फ्री व्हाउचर दिला जात आहे.

219 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14 दिवसांची वैधता आणि 3GB डेली डेटा मिळतो. तसेच प्लॅनमध्ये 25 रुपयांची किंमत असलेला व्हाउचर फ्री मिळेल. हे देखील वाचा: Redmi Note 12 4G जागतिक बाजारात लाँच, Snapdragon 685 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन

डाटा अ‍ॅड-ऑन पॅक

222 रुपयांच्या डेटा पॅकमध्ये युजर्सना 50जीबी डेटा मिळत आहे. याची वैधता बेस प्लॅन इतकी असेल. 444 रुपयांचा प्लॅनमध्ये 60 दिवसांची वैधतेव्यतिरिक्त 100जीबीचा डेटा मिळतो. अखेरीस 667 रुपयांच्या डेटा पॅक बद्दल बोलायचं तर यात 90 दिवसांच्या वैधतेसह 150जीबी डेटा मिळत आहे.

The post जियोनं लाँच केले 6 क्रिकेट प्लॅन, IPL च्या चाहत्यांसाठी खास योजना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-launch-new-cricket-plans-with-3-gb-data-daily/feed/ 0
Jio युजर्ससाठी वाईट बातमी! कंपनीनं 100 रुपयांनी वाढवली सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची किंमत https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-199-postpaid-plan-gets-a-price-hike-now-priced-at-rs-299-know-full-benifits/ https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-199-postpaid-plan-gets-a-price-hike-now-priced-at-rs-299-know-full-benifits/#respond Thu, 23 Mar 2023 09:35:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19689 रिलायन्स जियोनं अलीकडेच आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्स सादर केले होते. तसेच, आता आकाश मुकेश अंबानी यांच्या Jio कंपनीनं ग्राहकांना धक्का देत आपल्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीनं एंट्री लेव्हल 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनची किंमत वाढवून 299 रुपये केली आहे. ग्राहकांना जास्त किंमतीसह जास्त डेटा देखील मिळणार आहे. पुढे तुम्हाला या […]

The post Jio युजर्ससाठी वाईट बातमी! कंपनीनं 100 रुपयांनी वाढवली सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • जियोच्या 199 रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढवण्यात आली आहे.
  • आता जियोच्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची किंमत 299 रुपये झाली आहे.
  • 299 रुपये प्लॅनमध्ये 30जीबी एकूण डेटा मिळतो.

रिलायन्स जियोनं अलीकडेच आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्स सादर केले होते. तसेच, आता आकाश मुकेश अंबानी यांच्या Jio कंपनीनं ग्राहकांना धक्का देत आपल्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीनं एंट्री लेव्हल 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनची किंमत वाढवून 299 रुपये केली आहे. ग्राहकांना जास्त किंमतीसह जास्त डेटा देखील मिळणार आहे. पुढे तुम्हाला या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सर्व बेनिफिट्सची माहिती दिली आहे.

299 रुपये झाली 199 रुपयांच्या प्लॅनची किंमत

Jio नं गुपचूप आपल्या एंट्री-लेव्हल पोस्टपेड प्लॅनची किंमत 199 रुपयांवरून वाढवून 299 रुपये केली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर देखील प्लॅन नव्या वाढलेल्या किंमतीसह लिस्ट करण्यात आला आहे. 299 रुपयांचा प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर यात आता एकूण 30जीबी डेटा मिळतो. तसेच, डेटा संपल्यावर ग्राहकांना रोज 1जीबी वापरण्यासाठी 10 रुपये द्यावे लागतील. तसेच आधी प्लॅनमध्ये 25जीबी डेटा मिळत होता. हे देखील वाचा: 108MP Camera आणि 6,000mAh battery सह Samsung नं सादर केला Galaxy M54 5G

प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड टॉक टाइम आणि डेली 100 एसएमएस ऑफर केले जात आहेत. तसेच JioTV, JioCinema, JioSecurity, आणि JioCloud सहित अ‍ॅप्सच्या Jio Suite साठी एक कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन देखील आहे. हा एक खाजगी प्लॅन आहे, ज्याचा अर्थ असा की अ‍ॅड-ऑन कनेक्शन यात मिळत नाही. इतकेच नव्हे तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळतो. हे देखील वाचा: 11 5G बँड असलेल्या Samsung Galaxy A54 आणि A34 ची विक्री सुरु; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि फीचर्स

रिलायन्स जियोनं अलीकडेच एका महिन्याच्या फ्री ट्रायलसह आपला नवीन फॅमिली प्लॅन – जियो प्लस लाँच केला होता. जियो प्लस प्लॅनमध्ये पहिल्या कनेक्शनसाठी ग्राहकांना 399 रुपये द्यावे लागतात. इतकेच नव्हे तर प्लॅनमध्ये 3 अतिरिक्त कनेक्शन जोडता येतात. प्रत्येक अतिरिक्त कनेक्शनसाठी 99 रुपयांची किंमत युजर्सना द्यावी लागेल. जियो प्लसमध्ये 4 कनेक्शनसाठी 696 रुपये (399+99+99+99) दरमहा द्यावे लागतील. प्लॅनसह 75जीबी डेटा मिळेल. 4 कनेक्शन असलेल्या फॅमिली प्लॅनमध्ये एक सिमवर दरमहा जवळपास 174 रुपये खर्च येईल.

The post Jio युजर्ससाठी वाईट बातमी! कंपनीनं 100 रुपयांनी वाढवली सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-199-postpaid-plan-gets-a-price-hike-now-priced-at-rs-299-know-full-benifits/feed/ 0
Jio चे नवीन फॅमिली पोस्टपेड प्लॅन्स लाँच; एक महिन्याचं ट्रायल फ्री https://www.91mobiles.com/marathi/jio-new-postpaid-family-plans-launch-starting-price-rs-399/ https://www.91mobiles.com/marathi/jio-new-postpaid-family-plans-launch-starting-price-rs-399/#respond Wed, 15 Mar 2023 05:27:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19489 रिलायन्स जियोच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी खुशखबर आहे कारण कंपनीनं एक महिन्याच्या फ्री ट्रायलसह जियो प्लसचे नवीन पोस्टपेड फॅमली प्लॅन्स सादर केले आहेत. या प्लॅन्ससह फ्री डेटा, कॉलिंग आणि ओटीटीचा फायदा देखील दिला जात आहे. फॅमली प्लॅनची प्रारंभिक किंमत 399 रुपये आहे. पुढे तुम्हाला आम्ही या प्लॅन्सची संपूर्ण माहिती दिली आहे. 399 रुपयांपासून प्लॅन्स सुरु रिलायन्स जियोनं […]

The post Jio चे नवीन फॅमिली पोस्टपेड प्लॅन्स लाँच; एक महिन्याचं ट्रायल फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • रिलायन्स जियोच्या पोस्टपेड फॅमली प्लॅन्सची प्रारंभिक किंमत 399 रुपये आहे.
  • प्लॅन्ससोबत फ्री डेटा, कॉलिंग आणि ओटीटीचा फायदा.
  • नवीन पोस्टपेड फॅमली प्लॅन्ससह एक महिन्याचं ट्रायल फ्री मिळेल.

रिलायन्स जियोच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी खुशखबर आहे कारण कंपनीनं एक महिन्याच्या फ्री ट्रायलसह जियो प्लसचे नवीन पोस्टपेड फॅमली प्लॅन्स सादर केले आहेत. या प्लॅन्ससह फ्री डेटा, कॉलिंग आणि ओटीटीचा फायदा देखील दिला जात आहे. फॅमली प्लॅनची प्रारंभिक किंमत 399 रुपये आहे. पुढे तुम्हाला आम्ही या प्लॅन्सची संपूर्ण माहिती दिली आहे.

399 रुपयांपासून प्लॅन्स सुरु

रिलायन्स जियोनं एक महिन्याच्या फ्री ट्रायलसह आपला नवीन फॅमिली प्लॅन – जियो प्लस लाँच केला आहे. जियो प्लस प्लॅनमध्ये आधी कनेक्शनसाठी ग्राहक 399 रुपये द्यावे लागतील. इतकेच नव्हे तर प्लॅनमध्ये 3 अतिरिक्त कनेक्शन जोडता येतील. प्रत्येक नवीन कनेक्शनसाठी 99 रुपये शुल्क आकारले जाईल. जियो प्लस मध्ये 4 कनेक्शनसाठी 696 रुपये (399+99+99+99) दरमहा द्यावे लागतील. प्लॅनसह 75जीबी डेटा मिळेल. 4 कनेक्शन असलेल्या फॅमिली प्लॅनमध्ये एक सिमला दरमहा जवळपास 174 रुपये खर्च येईल.

तसेच जे ग्राहक जास्त डेटा वापरतात ते 100 जीबी डेटा असलेला प्लॅन निवडू शकतात. यासाठी पहिल्या कनेक्शनवर 699 रुपये शुल्क आकारले जाईल आणि प्रत्येक अतिरिक्त कनेक्शनवर 99 रुपये प्रति कनेक्शन द्यावे लागतील. एकूण 3 अ‍ॅडिशनल कनेक्शन जोडता येतील.

कंपनीनं काही व्यक्तीगत प्लॅन देखील लाँच केले आहेत. यात 299 रुपयांचा प्लॅनमध्ये 30 जीबी डेटा मिळेल आणि 599 रुपयांचा प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा मिळेल. इतकेच नव्हे तर कंपनीनं नवीन फॅमिली प्लॅन- जियो प्लसमध्ये अनेक बेनिफिट्स दिले आहेत.

फ्री ट्रायल नंतर प्लॅन करता येईल कॅन्सल

जियोनं सांगितलं आहे की एक महिन्याच्या फ्री ट्रायल नंतर युजर्सना सर्व्हिस न आवडल्यास ते आपलं कनेक्शन रद्द करू शकतात आणि याबाबत त्यांना कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही.

अनलिमिटेड फ्री मिळेल 5G डेटा

जियो ट्रू 5जी वेलकम ऑफरसह अनलिमिटेड 5जी डेटा मिळेल, ज्याचा वापर संपूर्ण कुटुंब करू शकतं. यात डेटाची कोणतीही डेली लिमिट ठेवण्यात आलेली नाही. उपलब्ध नंबर्समधून तुम्ही तुमच्या आवडीचा नंबर निवडू शकता. सिंगल बिलिंग, डेटा शेयरिंग आणि नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, जियो टीव्ही आणि जियो सिनेमा सारख्या मनोरंजक प्रीमियम कंटेंट अ‍ॅप्सचा फायदा देखील मिळेल.

या युजरन्स सिक्योरिटी डिपॉजिट द्यावं लागणार नाही

जियो फायबर युजर्स, कॉर्पोरेट कर्मचारी, इतर ऑपरेटर्सचे जुने पोस्टपेड युजर्स, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआयच्या क्रेडिट कार्ड धारकांना सिक्योरिटी डिपॉजिट द्यावं लागणार नाही.

The post Jio चे नवीन फॅमिली पोस्टपेड प्लॅन्स लाँच; एक महिन्याचं ट्रायल फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-new-postpaid-family-plans-launch-starting-price-rs-399/feed/ 0
दिवस सुरु होताच डेटा संपतो? Jio चे हे प्लॅन्स देत आहेत 3GB डेली डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग https://www.91mobiles.com/marathi/jio-plans-with-3gb-data-per-day/ https://www.91mobiles.com/marathi/jio-plans-with-3gb-data-per-day/#respond Tue, 14 Feb 2023 12:30:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17806 टेलिकॉम कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) कडे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. यात 1GB, 1.5GB 2GB डेली डेटा देणारे प्लॅन्स जास्त लोकप्रिय आहेत. परंतु काही युजर्सना यापेक्षा जास्त डेटाची रोज गरज असते. अशा ग्राहकांसाठी कंपनीनं आपल्या पोर्टफोलियोमध्ये डेली 3 जीबी डेटा देणारे प्लॅन देखील जोडेल आहेत. आज आपण त्यांची माहिती घेणार आहोत. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह […]

The post दिवस सुरु होताच डेटा संपतो? Jio चे हे प्लॅन्स देत आहेत 3GB डेली डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • जियो कडे दोन 3GB डेली डेटा असलेले रिचार्ज प्लॅन्स आहेत.
  • या रिचार्जची किंमत 419 रुपये व 1199 रुपये आहे.
  • जियोच्या या दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग फ्री मिळते.

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जियो (Reliance Jio) कडे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. यात 1GB, 1.5GB 2GB डेली डेटा देणारे प्लॅन्स जास्त लोकप्रिय आहेत. परंतु काही युजर्सना यापेक्षा जास्त डेटाची रोज गरज असते. अशा ग्राहकांसाठी कंपनीनं आपल्या पोर्टफोलियोमध्ये डेली 3 जीबी डेटा देणारे प्लॅन देखील जोडेल आहेत. आज आपण त्यांची माहिती घेणार आहोत.

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 3 जीबी डेटा आणि इतर अनेक बेनिफिट्स ऑफर केले जात आहेत. जर तुम्ही देखील Jio 3GB data per day Recharge Plan शोधत असाल तर पुढे आम्ही जियोच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या यादीतील दोन प्लॅन्सची माहिती दिली आहे, जे तुम्हाला सर्वाधिक डेली डेटा देतील. हे देखील वाचा: वनप्लसच्या तोडीचा Samsung फोन लाँचसाठी तयार; Galaxy A54 5G वेबसाइटवर लिस्ट

Jio 3GB Daily Data Plan

  • Jio Rs 419 Plan
  • Jio Rs 1199 Plan

जियोचा 419 रुपयांचा प्लॅन

या रिचार्जमध्ये ग्राहकांना डेली 3 जीबी डेटा दिला जातो. प्लॅनच्या संपूर्ण वैधतेमध्ये एकूण 84GB एकूण इंटरनेट डेटा वापरता येतो. रोजचा डेटा संपल्यावर देखील ग्राहकांना मर्यादित स्पीडनं इंटरनेट वापरता येतं. कंपनी या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता देत आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. त्यामुळे तुम्ही ऑन किंवा ऑफ नेटवर्कवर अमर्याद कॉल्स करू शकता. तसेच रोज 100 एसएमए देखील मोफत मिळतात. जियोच्या 419 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये जियो अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस देखील मिळतो. हे देखील वाचा: या स्मार्टफोनच्या बजेटवर जाऊ नका; जबरदस्त गेमिंग प्रोसेसरसह Poco X5 GT येणार

जियोचा 1199 रुपयांचा प्लॅन

या रिचार्जमध्ये ग्राहकांना रोज 3GB डेटा मोफत दिला जातो. फक्त यात वैधता जास्त असल्यामुळे याची किंमत जास्त आहे. हा प्लॅन जवळपास तीन महिन्याच्या म्हणजे 84 दिवसांच्या वैधतेसह सादर करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण कालावधीत एकूण 252GB इंटरनेट डेटा ऑफर केला जात आहे. तसेच या प्लॅनमध्ये कोणत्याही नंबरवर अमर्याद बोलण्यासाठी कंपनीनं अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील दिली आहे. जोडीला रोज 100 एसएमएस मोफत मिळतात. या प्लॅनमध्ये करमणुकीची सोय देखील आहे, ज्यासाठी ग्राहक जियो अ‍ॅप्सच्या मोफत सब्सक्रिप्शनचा वापर करू शकतात.

The post दिवस सुरु होताच डेटा संपतो? Jio चे हे प्लॅन्स देत आहेत 3GB डेली डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-plans-with-3gb-data-per-day/feed/ 0
मोफत मिळवा 12GB डेटा; Jio युजर्ससाठी धमाकेदार ऑफर https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-offer-free-12gb-data-on-prepaid-recharge-plan/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-offer-free-12gb-data-on-prepaid-recharge-plan/#respond Mon, 13 Feb 2023 09:34:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17749 Valentines Day 2023 निम्मिताने टेलीकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी शानदार ऑफर घेऊन आल्या आहेत. अलीकडेच Vodafone idea च्या Valentine’s Offer नंतर आता Reliance Jio Valentine Day offer ची घोषणा करण्यात आली आहे. जियो आपल्या दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन (349 रुपये आणि 899 रुपये) सह एक्स्ट्रा डेटा आणि इतर बेनिफिट्स देत आहे आणि तेही अगदी मोफत. जर […]

The post मोफत मिळवा 12GB डेटा; Jio युजर्ससाठी धमाकेदार ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • जियोनं आपल्या ग्राहकांसाठी Valentine’s Offer सादर केली आहे.
  • जियोच्या 349 रुपये आणि 899 रुपयांच्या प्लॅनचा समावेश ऑफरमध्ये करण्यात आला आहे.
  • ही ऑफर 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत वैध राहील.

Valentines Day 2023 निम्मिताने टेलीकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी शानदार ऑफर घेऊन आल्या आहेत. अलीकडेच Vodafone idea च्या Valentine’s Offer नंतर आता Reliance Jio Valentine Day offer ची घोषणा करण्यात आली आहे. जियो आपल्या दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन (349 रुपये आणि 899 रुपये) सह एक्स्ट्रा डेटा आणि इतर बेनिफिट्स देत आहे आणि तेही अगदी मोफत. जर तुम्ही व्हॅलेन्टाईन्स डे (14 फेब्रुवारी 2023) पूर्वी तुमच्या नंबरसाठी यातील एखादा प्लॅन घेतला तर तुम्हाला टेलीकॉमसह अनेक अन्य खास बेनेफिट्स देखील मिळतील. चला जाणून घेऊया ऑफर बद्दल सविस्तर माहिती.

जियो व्हॅलेन्टाईन्स ऑफर

जियोच्या 349 रुपये आणि 899 रुपयांच्या प्लॅनसह ही व्हॅलेंटाइन ऑफर जारी करण्यात आली आहे. या व्हॅलेंटाइन ऑफर अंतगर्त ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना 12GB फ्री डेटा, McDonalds चा बर्गर, फ्लाइटवर डिस्काउंट, Ferns & Petals वरून शॉपिंग केल्यावर 150 रुपयांचे डिस्काउंट कुपन मिळत आहे. चला जाणून घेऊया या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणार बेनिफिट्स कोणते आहेत. हे देखील वाचा: 5G Phone च्या यादीत होणार Vivo T2 5G चा समावेश; स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि अँड्रॉइड 13 सह वेबसाइटवर लिस्ट

899 रुपयांचा प्लॅन

Jio चा 899 रुपयांचा प्लॅन पाहता या रिचार्जमध्ये डेली 2.5GB डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता 90 दिवस म्हणजे तीन महिन्याच्या आसपास आहे. त्यामुळे ग्राहक एकूण 225 जीबी डेटा या 90 दिवसांत वापरता येईल आणि ऑफर मधील 12जीबी डेटा मिळून 237 जीबी डेटा होईल. कंपनी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा देखील देत आहेत त्यामुळे ऑन व ऑफ नेटवर्क अमर्याद कॉलिंग करता येईल. रोज 100 फ्री एसएमएस देखील मिळतात. 899 रुपयांच्या या प्लॅनमध्ये जियो सिनेमा, जियो टीव्ही, जियो सावन इत्यादी जियो अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस देखील दिला जात आहे. हे देखील वाचा: बजेटला धक्का न लावता खरेदी करत येईल Nokia G22; स्पेसिफिकेशन्स झाले लीक

349 रुपयांचा प्लॅन

349 रुपयांचा प्लॅनमध्ये पण डेली 2.5GB डेटा दिला जात आहे. फक्त या प्लॅनमध्ये 30 दिवसांची म्हणजे महिन्याभराच्या वैधता कंपनीनं दिली आहे. महिनाभरात 75GB डेली डेटा आणि 12GB ऑफर डेटा मिळून 87GB डेटा वापरता येईल. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगमुळे कोणत्याही नंबरवर अमर्याद बोलता येईल. 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 100 फ्री एसएमएस मिळतात. तसेच रिचार्जमध्ये जियो अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस देखील उपलब्ध आहे.

The post मोफत मिळवा 12GB डेटा; Jio युजर्ससाठी धमाकेदार ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-offer-free-12gb-data-on-prepaid-recharge-plan/feed/ 0
वर्षाला 13 रिचार्ज करण्याची गरज नाही! 30 दिवस पुरतील जियोचे ‘हे’ प्लॅन, किंमत 181 पासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/jio-recharge-plans-with-30-days-validity-free-data-calling/ https://www.91mobiles.com/marathi/jio-recharge-plans-with-30-days-validity-free-data-calling/#respond Tue, 31 Jan 2023 09:29:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17364 टेलीकॉम कंपनी Reliance Jio नं अलीकडेच 30 दिवस वैधता असलेला आपला नवीन प्री-पेड प्लॅन लाँच केला होता. त्यानंतर जियो युजर्सकडे एकूण 6 असे प्री-पेड प्लॅन झाले आहेत ज्यात 30 दिवसांची वैधता मिळते. आजच्या या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला जियोच्या या 6 प्लॅनबाबत सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला 28 दिवस नव्हे तर एकूण 30 दिवसांची वैधता मिळेल. जियोचे […]

The post वर्षाला 13 रिचार्ज करण्याची गरज नाही! 30 दिवस पुरतील जियोचे ‘हे’ प्लॅन, किंमत 181 पासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Jio कडे 30 दिवसांचे एकूण पाच रिचार्ज प्लॅन आहेत.
  • Jio Rs 181, Rs 241 आणि Rs 301 प्लॅन डेटा व्हाउचर आहेत.
  • Jio नं अलीकडेच Rs 349 plan सादर केला होता, ज्यात डेली डेटा मिळतो.

टेलीकॉम कंपनी Reliance Jio नं अलीकडेच 30 दिवस वैधता असलेला आपला नवीन प्री-पेड प्लॅन लाँच केला होता. त्यानंतर जियो युजर्सकडे एकूण 6 असे प्री-पेड प्लॅन झाले आहेत ज्यात 30 दिवसांची वैधता मिळते. आजच्या या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला जियोच्या या 6 प्लॅनबाबत सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला 28 दिवस नव्हे तर एकूण 30 दिवसांची वैधता मिळेल.

जियोचे 30 दिवस वैधता असलेले प्लॅन

  • 349 रुपयांचा प्लॅन
  • 296 रुपयांचा प्लॅन
  • 259 रुपयांचा प्लॅन
  • 181 रुपयांचा प्लॅन
  • 241 रुपयांचा प्लॅन
  • 301 रुपयांचा प्लॅन

jio 5g works on 4g sim

349 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जियोच्या 349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 30 दिवसांची वॅलिडिटी मिळते. तसेच यात डेली 2.5जीबी डेटा (एकूण 75GB डेटा) मिळतो. यात फ्री कॉलिंग, डेली 100एसएमस आणि जियो अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन देखील देण्यात आलं आहे. हे देखील वाचा: सुश्मिता सेनच्या Aarya Season 3 ची शूटिंग झाली सुरु, प्रोमो देखील आला समोर

296 रुपयांचा प्लॅन

फ्री कॉलिंग आणि नो डेली डेटा लिमिट असलेला हा जियोचे एकमेव प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग करता येते. तसेच या रिचार्जमध्ये डेली 100 SMS फ्री मिळतील, जे कोणत्याही नंबरवर पाठवता येतील. तसेच, प्लॅनमध्ये जियो अ‍ॅप्स (Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि JioCloud) चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. त्याचबरोबर प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 25जीबी डेटा मिळतो.

Jio Calendar Month Plan Rs 259

रिलायन्स जियोनं गेल्यावर्षी ‘कॅलेंडर मंथ प्लॅन’ सादर केला होता. म्हणजे जर एखाद्या महिन्यात 30 दिवस असतील तर हा Jio plan 30 दिवसांची वॅलिडिटी देईल आणि जर 31 दिवसांचा महीना असेल तर रिलायन्स जियोच्या या प्लॅन प्लॅनमध्ये 31 दिवसांची वॅलिडिटी मिळेल. त्याचबरोबर प्लॅनमध्ये डेली 1.5 जीबी 4जी इंटरनेट डेटासह रोज 100 एसएमएस देखील मिळतील. तसेच जियो युजर्सना जियो अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल.

Reliance Jio Adds Over 29 Lakh Mobile Subscribers Before Ambani 5G Service

जियो डेटा व्हाउचर

181 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 30जीबी डेटा आणि 30 दिवसांची वैधता मिळेल. कॉलिंग, SMS आणि इतर कोणतेही बेनिफिट्स या प्लॅनमध्ये मिळणार नाहीत. हे देखील वाचा: Nothing Phone (2) येतोय! सीईओनी दिली माहिती; यावेळी भिडणार आयफोनशी?

241 रुपयांचा प्लॅन: हा 30 दिवसांची वैधता असलेला जियोचा डेटा व्हाउचर आहे, ज्यात 40जीबी डेटा मिळतो.

301 रुपयांचा प्लॅन: या रिचार्जमध्ये जियो 50जीबी डेटा आणि 30 दिवसांची वैधता देत आहे.

The post वर्षाला 13 रिचार्ज करण्याची गरज नाही! 30 दिवस पुरतील जियोचे ‘हे’ प्लॅन, किंमत 181 पासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-recharge-plans-with-30-days-validity-free-data-calling/feed/ 0